Daily Archives: February 24, 2020

ट्रम्प येत आहेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज २४ आणि उद्या २५ रोजी आपल्या पहिल्यावहिल्या भारत भेटीवर येत आहेत. अहमदाबाद हे या भेटीचे केंद्र असल्याने तेेथे जोरदार तयारी चालली आहे. या भेटीला उभय देशांच्या दृष्टीने निश्‍चितच अतिशय महत्त्व आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्ताकाळामध्ये भारत अमेरिकेच्या बाजूने अधिक झुकला. आज अमेरिका हा संरक्षण, ऊर्जा आदी क्षेत्रांतील भारताचा मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यातही व्यक्तिशः ... Read More »

शाहीनबागचा चक्रव्यूह

ल. त्र्यं. जोशी उद्या न्यायालयाने नागरिकता कायदा घटनाबाह्य ठरविला तर केवळ कायदाच रद्द होत नाही, मोदी सरकारलाही राजीनामा द्यावा लागेल. पण त्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची वाट तर पाहायला हवी. त्यासाठीही कुणी तयार नाही. सांसदीय लोकशाहीत हे कसे चालेल? लोकशाही म्हणजे बहुमताचे राज्य ही संकल्पनाही विरोधक बासनात बांधून ठेवू इच्छिताहेत. दिल्लीतील शाहीनबागेतील रस्ता रोको आंदोलनाने चक्रव्यूहाचे स्वरूप धारण केले आहे याबाबत दुमत ... Read More »

डोनाल्ड ट्रम्प आज भारत दौर्‍यावर

गेल्या काही दिवसांपासून भारत दौर्‍याविषयी गाजावाजा सुरू असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ड्रम्प यांचे आज सोमवार दि. २४ रोजी येथे सपत्नीक पहिल्याच भारत भेटीवर आगमन होत असून त्यांच्यासाठी गुजरातमधील जगातील सर्वात मोठ्या मोतेरा क्रिकेट स्टेडियमवरील भव्य स्वागत सोहळ्याची सज्जता झाली आहे. दरम्यान ट्रम्प यांची साबरमती आश्रमाला व्हावयाची बहुचर्चित भेटही निश्‍चित झाली आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त आशिष भाटिया यांनी या वृत्ताला दुजोरा ... Read More »

नौदलाचे लढाऊ विमान गोव्यानजीक कोसळले

>> वैमानिकाने केला स्वत:चा सुखरुप बचाव भारतीय नौदलाच्या मिग-२९ के या लढाऊ विमानाला रविवारी गोव्यात किनारी भागात अपघात होऊन विमान कोसळले. मात्र, यावेळी वैमानिकाने सुरक्षितपणे विमानातून बाहेर उडी घेण्यात यश मिळवल्याने जीवित हानी टळली. सदर विमानाने काल सकाळी १०.३० वा. कारवार येथील विक्रमादित्य या प्रशिक्षण तळावरून उड्डाण केले होते. मात्र, नंतर हे विमान गोव्यातील किनारपट्टीपासून काही अंतरावर समुद्रात कोसळले व ... Read More »

उच्च न्यायालयासह अन्य विविध न्यायालयांत ५५ हजार खटले प्रलंबित

मुंबई उच्च न्यायालयाचे गोवा खंडपीठ, जिल्हा न्यायालयांसह इतर न्यायालयात दिवाणी व फौजदारी मिळून ५५ हजार १४९ खटले प्रलंबित आहेत. न्यायालयातील प्रलंबित खटल्यांमध्ये फौजदारी २७ हजार ६६४ आणि दिवाणी २७ हजार ४८५ खटल्यांचा समावेश आहे. गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा मंत्री नीलेश काब्राल यांनी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी विचारलेल्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात ही माहिती लेखी स्वरूपात दिली आहे. मुंबई उच्च ... Read More »

सीएए विरोधक – समर्थकांत दिल्लीत संघर्ष : अलीगडमध्येही हिंसाचार

सीएए प्रश्‍नावरून काल दिल्लीसह उत्तर प्रदेशमधील अलीगड येथेही मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या. उभय ठिकाणी पोलीस व निमलष्करी दलांनी बळाचा वापर करून स्थितीवर नियंत्रण आणले. दिल्लीतील जाफ्राबाद मौजपूर येथे सीएए विरोधी व सीएए समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष उडाला. उभय बाजूंकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आल्याने अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे मौजपूर येथे तणावपूर्ण वातावरण असल्याचे सांगण्यात आले. शाहीनबाग ... Read More »

शाळकरी विद्यार्थ्यांत तंबाखूजन्य पदार्थ सेवनात वाढ

राज्यातील शालेय विद्यार्थ्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाणात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी कोटपा कायदा २००३ चे अनुपालन करून मुलांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे, असे परिपत्रक शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव (आयएएस) यांनी जारी केले आहे. आरोग्य खाते, गोवा दंत महाविद्यालयातर्फे राज्यातील विविध विद्यालयांच्या मुलांच्या दातांची तपासणी केली जात आहे. ... Read More »

भारत-बांगलादेश लढत आज

पहिल्या लढतीत भारताने ऑस्ट्रेलियासारख्या भक्कम फलंदाजी फळी लाभलेल्या संघाविरुद्ध १३२ धावांचा यशस्वी बचाव केला होता. गोलंदाजीत पूनम यादव व शिखा पांडे यांनी भेदक मारा करत आपली उपयुक्तता पुन्हा एकदा सिद्ध केली होती. शफालीचा आक्रमकता, जेमिमाचा संयम व दीप्तीच्या समयोचितपणाचे दर्शन या सामन्यात भारतीय क्रीडा रसिकांना घडले होते. वाकाची खेळपट्टी उभय संघांसाठी नवीन असल्याने या खेळपट्टीशी जुळवून घेण्याची कसरत दोन्ही संघांना ... Read More »

आफ्रिकेचा इंग्लंडला शॉक!

महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेतील धक्कादायक निकालांची मालिका रविवारीदेखील सुरूच राहिली. संभाव्य विजेत्यांच्या यादीत असलेल्या इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेकडून ६ गडी व २ चेंडू राखून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडचा डाव ८ बाद १२३ धावांत रोखल्यानंतर द. आफ्रिकेने विजयी लक्ष्य १९.४ षटकांत ४ गडी गमावून गाठले. नाणेफेक हरल्यामुळे प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळालेल्या इंग्लंडला सूर गवसला नाही. नॅट सिवरने ४१ चेंडूंत ५ चौकार व ... Read More »

विलक्षण पिता-पुत्र

डॉ. अशोक कामत शिक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि संवर्धक यासाठी अवघे जीवन वेचणारे कार्यकर्ते पुष्कळ झाले; पण सुरेश गुंडू आमोणकर हे सारे करीत असताना ज्ञानोपासक म्हणूनही कायम व्रतस्थ राहिले. त्यांच्या ‘पद्मश्री’मुळे त्या सन्मानाची सार्थकता वाढली आणि अखेरच्या देहदानामुळे सुरेशभाऊही अमर झाले!   गोमंतकाचे शैक्षणिक शिल्पकार गुंडू सीताराम आमोणकर. उत्तम शिक्षक, शिक्षण संस्थाचालक आणि नवी राष्ट्रीय पिढी घडविणारे. त्यांचे कार्य स्वीकारून ते ... Read More »