Daily Archives: February 22, 2020

एक सोपस्कार

होणार, होणार म्हणता म्हणता अखेर राज्यातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्या. त्यामुळे आता राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असल्याने आधीच ढेपाळलेले प्रशासन येत्या महिनाभर ठप्प होईल. जिल्हा पंचायत हा खरे म्हणजे ग्रामपंचायती आणि विधानसभा यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा. महाराष्ट्रासह काही मोठ्या राज्यांमध्ये तर पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदाही कार्यरत असतात. गोव्यामध्ये मात्र जिल्हा पंचायती ह्या केवळ पंचायतराज ... Read More »

लेसर शस्त्रांच्या आगमनाची नांदी

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) लेसर किरणे सोडणारी शस्त्रे केवळ चित्रपटात दिसल असली, तरी प्रत्यक्षात अशी शस्त्रे विकसित करण्याचे प्रयत्न जगात अनेक ठिकाणी सुरू आहेत. या किरणांच्या अचूक मार्‍याबद्दल आणि परिणामकारकतेबद्दल शस्त्रनिर्मिती करणार्‍या कंपन्यांना खात्री असली, तरी या शस्त्रांविषयी तज्ज्ञांना अनेक शंका आहेत. आगामी काळात लेसर शस्त्रे वापरात येतात का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्याला लेसर किरणे ङ्गेकणारी शस्त्रास्त्रे ... Read More »

जि. पं. निवडणूक २२ मार्च रोजी

>> सविस्तर कार्यक्रम जाहीर, आचारसंहिता लागू >> मतपत्रिकेद्वारे मतदान, २३ मार्च रोजी मतमोजणी राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत काल जाहीर केला. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी २२ मार्च २०२० रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दि. २७ ... Read More »

म्हादई जललवादाच्या अहवालासाठी केंद्र सरकारकडून मुदतवाढ अधिसूचित

म्हादई जललवादाचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी लवादाला केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने १९ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसे बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२० च्या भारत सरकारच्या राजपत्रात अधिसूचित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव टी. राजेश्वरी यांच्या सहीनिशी भारत सरकारच्या १९ फेब्रुवारी २०२० च्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार येत्या १९ ऑगस्टपर्यंत लवादाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यास ... Read More »

म्हादईप्रश्‍नी स्थगितीसाठी लवकरच याचिका ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारने म्हादई लवादाचा निवाडा अधिसूचित केल्यानंतर कर्नाटकला म्हादई नदीवर कोणतेही काम सुरू करण्यास मान्यता मिळू नये यासाठी येत्या तीन – चार दिवसात सर्वोच्च न्यायालयात स्थगितीसाठी याचिका सादर केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सर्वोच्च न्यायालयाने म्हादई लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास मान्यता दिली म्हणून म्हादई प्रश्‍नी कर्नाटकाचा विजय झाला असे कुणीही समजू ... Read More »

टीम इंडियाची विश्‍वचषकात विजयी सलामी

>> भारताचा विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय अनुभवी लेगस्पिनर पूनम यादवने घेतलेले चार बळी व गोमंतकीय शिखा पांडेने ३ बळी घेत दिलेल्या तोलामोलाच्या साथीमुळे टीम इंडियाने टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेत काल शुक्रवारी विजयी सलामी दिली. भारताने विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. भारताने विजयासाठी दिलेले १३३ धावांचे आव्हान यजमानांना पेलवले नाही. त्यांचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत ११५ धावांत संपला. १३३ ... Read More »

बंगळुरू-एटीके लढत आज

इंडियन सुपर लीगमध्ये शनिवारी येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर एटीके आणि बंगळुरू एफसी यांच्यात लढत होत आहे. गतविजेत्यांविरुद्ध दुहेरी वर्चस्वाच्या निर्धाराने एटीके खेळेल, तर बंगळुरू घरच्या मैदानावर सरस ठरण्यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे तीव्र चुरस अपेक्षित असेल. डिसेंबरमधील लढतीत एटीकेने बंगळुरूला १-० असे हरविले होते. त्यावेळी एटीकेने सुरवातीपासून वर्चस्व राखले होते. दोन्ही संघांचे बाद फेरीतील स्थान यापूर्वीच नक्की झाले आहे. त्यामुळे दोन्ही ... Read More »

स्वयंसेवी संस्थांचे योगदान

 अनुराधा गानू (आल्त-सांताक्रूझ, बांबोळी) समाजातील लोकांनी समाजातीलच गरजू, गरीब लोकांच्या मदतीसाठी चालवलेल्या संस्था म्हणजेच एनजीओ. पण त्या चालवण्यासाठी, कार्यरत ठेवण्यासाठी आपल्याच समाजातील दानशूर व्यक्तींची जितकी गरज आहे त्याहीपेक्षा जास्त गरज सेवाभावी वृत्ती असणार्‍या आणि अशा गरजू लोकांसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन तळमळीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांची आहे. एन्.जी.ओ. म्हणजे नक्की काय? तर नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच बिगर सरकारी स्वयंसेवी संस्था. समाजातल्याच ... Read More »

कथा मुलाची, व्यथा आईची

 नीना नाईक ‘कॉलेज सुरू झाल्यापासून तो फक्त दोन-तीन दिवस आला होता’. आता मी अश्रू थांबवू शकले नाही. पोरगं हातातून गेलं हे ठळक दिसलं… तिरमिरत घरी आले. ऑफिसात कळवले तब्येत खराब आहे. तो रुममध्ये होता. आज सकाळपासून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ऍडमिशनसाठी खास नव्हती. दररोज उसळणारी गर्दी पाहता आज उसंत मिळेल असे वाटले होते. आज सर्व पसारा आटपायचा असा विचार करत ड्रॉवर ... Read More »

नागरी सेवा परीक्षा ः गोव्यातील तरुणांना आव्हान (civil services examination)

–  प्रा. नागेश सु. सरदेसाई गेल्या साठ वर्षांच्या इतिहासात फक्त १ किंवा २ गोवेकर तरुण आय.ए.एस. किंवा आय.पी.एस. बनू शकलेले आहेत. आता बदलत्या काळात ही संख्या वाढेल अशी आशा आहे. प्रयत्न कायम ठेवा आणि यश पदरात पाडून घ्या. देशाची सेवा करण्याची ही एक सुंदर संधी आहे. दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोग, नवी दिल्ली या संविधानिक यंत्रणेमार्फत वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात. ... Read More »