Daily Archives: February 21, 2020

गोव्याला झटका!

म्हादई जललवादाने दिलेला अंतिम निवाडा केंद्र सरकारने राजपत्रातून अधिसूचित करावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या कर्नाटकला काल मिळालेला दिलासा हा म्हादई प्रश्नी गोव्याला फार मोठा झटका आहे. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्र्यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांना दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये, पेयजल प्रकल्पासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची पूर्वपरवानगी घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही व पर्यावरण परिणाम मूल्यांकन अधिसूचना २००६ रद्दबातलही केलेली नाही या आधीच्या पत्रातील मुद्द्यांचा सुस्पष्ट पुनरुच्चार ... Read More »

तिसर्‍या जिल्ह्याचा प्रस्ताव व्यवहार्य ठरेल?

शंभू भाऊ बांदेकर तिसर्‍या जिल्ह्यामुळे वर उल्लेखित तीन तालुक्यांचा वेगवान विकास हा एकमेव फायदा असला तरी त्यासाठी एक नवीन जिल्हा म्हणजे एक जिल्हाधिकारी, दोन-तीन उपजिल्हाधिकारी, त्यांच्या दिमतीला पन्नास-साठ कर्मचारी याचबरोबर एका जिल्ह्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय यंत्रणा तयार करावी लागेल व या सार्‍याबरोबर दोन-तीन हजार चौ.मी. जागा मध्यवर्ती ठिकाणी पाहून नवी भव्य इमारत उभारावी लागेल. हा सगळा खर्च सरकारला झेपेल? नुकतेच ... Read More »

म्हादईप्रश्‍नी गोव्याला मोठा झटका

कर्नाटक सरकारची म्हादई जल लवादाचा निवाडा केंद्र सरकारला अधिसूचित करण्यास मान्यता देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी मान्य केल्याने कर्नाटकाला दिलासा मिळाला तर गोव्याला जोरदार झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील विरोधी पक्ष आणि संघटनांनी भाजप सरकार म्हादई नदीचे रक्षण करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. म्हादई जल लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास मान्यता देणारा दिवस हा गोव्यासाठी काळा दिवस आहे, ... Read More »

जि. पं. निवडणूक पक्षीय पातळीवर लढवणार नाही

>> कॉंग्रेस विधिमंडळ गटाचा निर्णय कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीवर चर्चा करण्यात आली असून भाजपकडून निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग सुरू आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने पक्षीय पातळीवर निवडणूक लढवू नये असा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाचे नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना वैयक्तिक पातळीवर जिल्हा ... Read More »

पणजीतील कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गान

>> जिल्हाधिकार्‍यांची मान्यता उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी पणजीतील कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गावरून काढण्यास एका बैठकीत काल मान्यता देण्यात आली. मागील दोन वर्षे मिरामार ते दोनापावल या मार्गावर शहरातील कार्निव्हल मिरवणूक काढण्यात येत होती. यावर्षी कार्निव्हल मिरवणूक पाटो – पणजी ते कला अकादमी या जुन्या मार्गावरून काढण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. येथील पोलिसांनी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करून जुन्या ... Read More »

महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक आजपासून

आयसीसी महिला टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धा आजपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेसाठी दहा संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात बहुतांशी बलाढ्य संघांचा भरणा असून तुलनेने ‘ब’ गटातील संघांसाठीची वाटचाल सोपी असेल. उभय गटातील केवळ आघाडीचे दोन संघच बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील लढतीने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १.३० वाजता हा ... Read More »

नॉर्थईस्टला नमवित हैदराबादने टाळली नामुष्की

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएएल) येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर हैदराबाद एफसीने गुरुवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला ५-१ असे गारद केले. याबरोबरच हैदराबादने आयएसएल इतिहासात साखळीत निचांकी गुणांची नामुष्की टाळली. भारताचा लिस्टन कुलासो आणि ब्राझीलचा मार्सेलिनीयो यांनी प्रत्येकी दोन गोल करीत या विजयात मोलाचा वाटा उचलला. हैदराबादने १८ सामन्यांत दुसराच विजय मिळविला असून चार बरोबरी व १२ पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ... Read More »