Daily Archives: February 19, 2020

नाहक उमाळे

डेबी अब्राहम या ब्रिटीश महिला खासदाराचा ई – व्हिसा रद्द करून तिची मायदेशी परत पाठवणी करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावरून काही घटकांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न सध्या चालवलेला दिसतो. खरे तर कोणत्याही देशासाठी आपले सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा ही परमोच्च अशी गोष्ट असते आणि तशी ती असायला हवी. मात्र, क्षुद्र पक्षीय राजकारणापोटी आणि आपला राजकीय कंडू शमविण्यासाठी अशा प्रकारचे वाद उकरून ... Read More »

पर्यायी नशेची भयावह पावले

ऍड. प्रदीप उमप डिचोलीमध्ये एक अल्पवयीन मुलगा नशेत आढळल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून नुकताच व्हायरल झाला. देशातील युवा पिढीच नव्हे, तर लहान मुलांमध्येही पर्यायी नशेचे व्यसन ज्या वेगाने पसरत चालले आहे, तो समाज आणि सरकारसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. परंतु वाममार्गाने भरपूर कमाई करण्यासाठी युवा पिढीला व्यसनाच्या दुनियेत ढकलणार्‍यांच्या समोर कायदा आणि सुव्यवस्था हतबल झालेली दिसते. नशेच्या परंपरागत स्रोतांच्या विरोधात जागरूकता मोहिमा ... Read More »

गावांना शहरी दर्जाची अधिसूचना मागे

>> अधिसूचनेला होता ग्रामपंचायतींचाही विरोध राज्यातील ५६ गावांना शहरी दर्जा देणारी वादग्रस्त बनलेली आणखीन एक अधिसूचना काल मागे घेण्यात आली आहे. महसूल खात्याने गोवा भू महसूल संहिता १९६८ अंतर्गत राज्यातील ५६ गावांना शहरी दर्जा देण्याची अधिसूचना जारी केली होती. राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांतून गावांना शहरी दर्जा देण्यास विरोध करण्यात येत आहे. विरोधी पक्षांकडूनसुद्धा गावांना शहरी दर्जा देण्यास विरोध केला जात ... Read More »

डिफेन्स स्टडीज संस्थेला मनोहर पर्रीकर यांचे नाव

नवी दिल्लीस्थित इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज ऍण्ड ऍनालिसिस या संस्थेचे नाव बदलताना केंेद्राने या संस्थेचे मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स ऍण्ड ऍनालिसिस असे नामकरण केले आहे. दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांनी केंद्रात संरक्षण मंत्री असताना दिलेल्या योगदानाची दखल घेऊन वरील संस्थेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. हल्लीच मरणोत्तर पद्मभूषण हा किताब देऊन गौरवण्यात आलेल्या मनोहर पर्रीकर यांचे नाव इन्स्टिट्यूट ... Read More »

२१ एप्रिल रोजी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात गोवा सरकारने खाण बंदीच्या निर्णयाच्या फेरविचारार्थ दाखल केलेली याचिकेवर वेदांत खाण कंपनीच्या याचिकेसोबतच २१ एप्रिल २०२० रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारी २०१८ रोजी एका आदेशाद्वारे दुसर्‍या टप्प्यातील ८८ खाण लीजांचे नूतनीकरण रद्द करून खाण बंदीचा आदेश जारी केली आहे. १६ मार्च २०१८ पासून खाणबंदी लागू झाली आहे. राज्यात खाण बंदीमुळे आर्थिक व रोजगाराची समस्या ... Read More »

वीज दरवाढीवरून विरोधकांची नाहक टीका

>> वीजमंत्री; आज श्‍वेतपत्रिका जारी करणार राज्यात आगामी तीन महिन्यांसाठीची वीज दरवाढ नाममात्र असून कमीत कमी युनिटमागे केवळ ३ पैसे एवढी वाढ झालेली आहे. विरोधकांकडून वीज दरवाढीवरून नाहक टीका केली जात आहे. राज्यातील मागील सहा तिमाहीतील (अठरा महिने) वीज बिलाच्या दरासंबंधी श्वेतपत्रिका आज बुधवारी जारी केली जाणार आहे, अशी माहिती वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल केली. संयुक्त वीज नियमन आयोगाकडून ... Read More »

राज्यात अमली पदार्थांची गंभीर समस्या : कामत

अमली पदार्थांचे सेवन केलेल्या एका किशोरवयीन मुलाचा वायरल झालेला व्हिडिओ पाहून राज्यात अमली पदार्थांची समस्या ही केवढी गंभीर बनली आहे ते परत एकदा स्पष्ट झाले आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल एका निवेदनातून म्हटले आहे. अमली पदार्थांच्या या भस्मासुराविरुद्ध लढा देण्यासाठी आता राज्यातील सर्व लोकांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा देण्याची गरज आहे, वेळ निघून जाण्यापूर्वी हे काम हाती ... Read More »

फेणीवरील करात सवलत देण्याचा विचार ः मुख्यमंत्री

अबकारी खात्याला मद्यावरील अबकारी कर वाढीवर फेरविचार करण्याची सूचना करण्यात आली आहे. सरकार फेणीवरील करात सवलत देण्यावर विचार करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील मद्य विक्रेत्यांच्या एका शिष्टमंडळाला काल दिली. राज्यातील मद्य विक्रेत्या संघटनेच्या एका शिष्टमंडळाने आल्तिनो पणजी येथे सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेटी घेतल्यानंतर संघटनेचे दत्तप्रसाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. ... Read More »

अजमल कसाबला हिंदू ठरवण्याचा होता डाव

>> राकेश मारिया यांच्या पुस्तकातून खुलासा मुंबईवर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडल्या गेलेल्या लष्कर ए तोयबाचा अतिरेकी अजमल कसाब याला हिंदू ठरवण्यात येणार होते. त्यामुळे कसाबला जर हल्ल्याच्यावेळीच मारून टाकण्यात आले असते तर जगाने त्यावेळी हिंदू दहशतवाद असे या हल्ल्याला मानले असते असा खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे. अजमल कसाब हा हिंदू ... Read More »

एफसी गोवाची आज जमशेदपूरविरूद्ध लढत

>> अग्रस्थान पक्के करण्यासाठी हवी केवळ बरोबरी इंडियन सुपर लीगमध्ये येथील जे. आर. डी. टाटा क्रीडा संकुलात बुधवारी जमशेदपूर एफसी आणि एफसी गोवा यांच्यात लढत होत आहे. गोव्याला एक गुण मिळाला तर त्यांचे अग्रस्थान नक्की होईल. त्यामुळे एएफसी चॅम्पियन्स लीग मधील त्यांचे स्थान सर्वप्रथम नक्की होईल. गोवा हरला तर मात्र एटीके संघाला संधी मिळेल. त्यासाठी एटीके संघाला अखेरच्या सामन्यात बंगळुरु ... Read More »