Daily Archives: February 18, 2020

शिस्त हवी, पण..

गेले अनेक महिने ज्याची होणार, होणार म्हणून घोषणा चालली होती, ते ‘पे पार्किंग’ अखेरीस पणजी शहराच्या मध्यवर्ती भागात लागू झाले आहे आणि लवकरच ते संपूर्ण शहरभर लागू होणार आहे. गेल्या वेळी अशाच प्रकारे महापालिकेकडून पे पार्किंग हट्टाने लागू करण्यात आले होते, परंतु अल्पावधीत संबंधित कंत्राटदाराने महापालिकेची देणी बुडवून हात वर केले आणि महापालिका मात्र हात चोळत राहिली. यावेळी मागच्या वेळच्या ... Read More »

शिवाजी महाराज आणि गोमंतक

देवेश कु. कडकडे (डिचोली) शिवाजी महाराजांमुळे जशी भारतीयांमध्ये परकीय राजवटीविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली, तशीच गोमंतकातील हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम या सर्व धर्मीयांची स्वातंत्र्यलढ्यामागील प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची होती. शिवाजी महाराज आणि गोमंतक यांचे घनिष्ठ असे नाते आहे. हेच नाते पुढे संभाजी महाराजांनी निरंतर राखले. या पराक्रमी राजांनी पोर्तुगिजांना अनेकदा आपला लष्करी हिसका दाखवला, मात्र, हा पराक्रमी आणि ... Read More »

निर्भयाच्या दोषींना ३ रोजी फाशी

निर्भया बलात्कारप्रकरणी चारही दोषींना ३ मार्च रोजी सकाळी ६ वा. फासावर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पटियाला हाऊस न्यायालयाकडून दोषींबाबत डेथ वॉरंट जारी करण्यात आले आहे. दि. ११ फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने डेथ वॉरंटमध्ये २२ जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी ... Read More »

राज्यातील जमावबंदी अखेर मागे

>> उत्तर गोवा न्यायदंडाधिकार्‍यांचा आदेश जारी लेला वादग्रस्त बनलेला जमावबंदीच्या आदेश अखेर काल मागे घेण्यात आला. उत्तर गोव्याचे न्यायदंडाधिकारी गोपाळ पार्सेकर यांनी यासंबंधी आदेश काल सोमवारी जारी केला आहे. उत्तर गोव्याच्या न्यायदंडाधिकारी आर. मेनका यांनी दि. १० फेब्रुवारी २०२० रोजी जमावबंदीचा आदेश दोन महिन्यांसाठी (६० दिवस) जारी केला होता. पश्‍चिम किनारपट्टीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तविल्याने जमावबंदीच्या आदेशामध्ये म्हटले ... Read More »

जि. पं. निवडणूक आणखी लांबणीवर टाकणे अशक्य

उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायती कुठल्याही परिस्थितीत येत्या २४ मार्चपर्यंत स्थापन कराव्या लागणार असून त्यामुळे या निवडणुकांची तारीख आणखी एकदा पुढे ढकलणे शक्य नसल्याचे काल राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. यासंबंधी अधिक माहिती देताना सूत्रांनी सांगितले की, सध्याच्या उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींची निवडणूक २५ मार्च २०१५ रोजी झाली होती. येत्या २५ मार्च रोजी या पंचायतींचा ... Read More »

गृह आधार योजनेमध्ये दुरूस्ती

>> हयात दाखला व उत्पन्न दाखल्याची सक्ती सरकारने गृह आधार योजनेमध्ये दुरुस्ती केली असून या योजनेच्या लाभार्थींना प्रत्येक वर्षी हयात दाखला आणि मामलेदारांकडून घेतलेला उत्पन्न दाखला देण्याची सक्ती करण्यात आली आहे. तसेच, लाभार्थींच्या खात्यात जमा झालेली रक्कम सलग सहा महिने न काढल्यास खात्यात जमा रक्कम संबंधित बँकेने डिमांड ड्राफच्या माध्यमातून महिला व बाल कल्याण खात्याकडे परत जमा करण्याची सूचना करण्यात ... Read More »

सरकारमधून बाहेर पडल्यावर सुदिनना म्हादई आठवली ः चोडणकर

म्हादईप्रश्‍नी कॉंग्रेस पक्षावर टीका करणारे मगो नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांना भाजपबरोबर सत्तेत असताना कधीही म्हादईची आठवण झाली नाही. मात्र, आता सत्तेतून बाहेर फेकण्यात आल्यानंतर त्यांना म्हादई आठवू लागली आहे, असा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत केला. भाजपबरोबर राज्यात सत्तेचा उपभोग घेत असताना किती वेळा म्हादईप्रश्‍नी आवाज उठवला होता हे ढवळीकर यांनी जनतेला ... Read More »

पाऊसकर खंडणीप्रकरणी एका संशयितास जामीन

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकी प्रकरणातील सहावा संशयित अल्फी साव्हियो लोबो याची येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने सशर्त जामिनावर काल सुटका केली. येथील पोलिसांनी कथित खंडणीप्रकरणी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली तरी खंडणीप्रकरणाचे गूढ अद्याप कायम आहे. संशयित अल्फी लोबो याला पंधरा हजार रुपयांची हमी आणि ७ दिवस पोलीस स्थानकावर हजर राहण्याची अट घालण्यात आली आहे. मंत्री पाऊसकर ... Read More »

राज्याच्या आर्थिक तुटीबद्दल मुख्यमंत्र्यांचे मौन ः चोडणकर

मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पातील आर्थिक तूट ही १६०० कोटी रु. एवढी असल्याचे जे म्हटलेले आहे ते खोटे असून ही तूट ४६४८ कोटी रु. एवढी असल्याचे आपण पत्रकार परिषदेत दाखवून दिलेले होते. पण त्या गोष्टीला आता कित्येक दिवस होऊन गेलेले असताना अजूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याबाबत खुलासा केला नसल्याचे काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. सरकार दर महिन्याला १०० ... Read More »

म्हापसा अर्बनवरील निर्बंध दोन महिन्यांनी वाढवले

रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बन बँकेवरील निर्बंधांना आणखीन २ महिन्याची मुदतवाढ दिली आहे. म्हापसा अर्बनवर लादलेल्या निर्बंधाची मुदत आज दि. १८ फेब्रुवारी २०२० रोजी समाप्त होत होती. म्हापसा अर्बन बँक दिवाळखोरीत काढल्यास ठेवीदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बँकेवरील निर्बंध आणखीन दोन महिन्यांनी वाढविल्याने गुंतवणूकदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. या दोन महिन्यांच्या काळात बँकेबाबत अंतिम तोडगा काढावा लागणार आहे. म्हापसा अर्बनचे ... Read More »