Daily Archives: February 17, 2020

तिसर्‍या जिल्ह्याच्या निमित्ताने

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांच्या जोडीने तिसर्‍या जिल्ह्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सूचित केले आहे. गोव्याची एकूण भौगोलिक रचना पाहता हा तिसरा जिल्हा करायचा झाला तर धारबांदोडा, उसगाव, पाळी – वेळगे, मोले, कुळे आदी परिसर मिळून केला जाण्याची शक्यता दिसते. गोव्याच्या पूर्वेचा हा सारा परिसर सर्व दृष्टींनी आजवर उपेक्षितच राहिला आहे. प्रशासनापासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांच्या दृष्टीने हा ... Read More »

दिल्ली विधानसभा: जय-पराजयाचा संमिश्र कौल

ल. त्र्यं. जोशी प्रत्येक निवडणूक स्वतंत्र असते. तिचा दुसरीशी काहीही संबंध नसतो. एखाद्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले म्हणजे विधानसभेतही मिळेलच, विधानसभेत मिळाले म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थात मिळेलच याची शाश्वती नसते. हे वास्तव आपण जेव्हा स्वीकारू, तेव्हाच निवडणूक निकालांचे यथार्थ विश्लेषण होऊ शकेल. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जवळजवळ प्रत्येक नागरिक त्याचे आपापल्या परीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहे ... Read More »

धारबांदोड्यातील अपघातात एक ठार

>> तीन गंभीर जखमी, कार-मिनीबसमध्ये जोरदार धडक धारबांदोडा येथील धारेश्वरी देवस्थानाजवळ आज (रविवारी) संध्याकाळी साडेतीनच्या सुमारास कार व विंगर मिनीबसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकजण ठार तर सहाजण जखमी होण्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की, धारबांदोडा येथील धारेश्वरी देवालयाजवळ कारी व मिनीबस यांची समोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातात आमलीमोळ-चांदोर येथील नारायण देऊ नाईक (६६) यांचा मृत्यू ... Read More »

खनिज प्रदूषण रोखण्यासाठी हवा गुणवत्ता स्टेशन उभारणार

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यातील खनिज माल वाहतुकीच्या वेळी प्रदूषणाची समस्या निर्माण होऊ नये म्हणून ठिकठिकाणी हवा गुणवत्ता देखरेख स्टेशन उभारली जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाने खाण आणि खाण क्षेत्राबाहेर रॉयल्टी भरलेल्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. न्यायालयाच्या निवाड्यामुळे खाण व्यवसाय बंद आहे. खाण क्षेत्रात खाण बंदीच्या पूर्वी उत्खनन केलेले रॉयल्टी भरलेले सुमारे दीड ... Read More »

म्हापसा बसस्थानकासाठी २.९६ कोटींची निविदा

>> गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने म्हापसा बसस्थानकाच्या बांधकामासाठी २ कोटी ९६ लाख ६१ हजार ०२७ रुपयांची निविदा जारी केली आहे. राज्य सरकारकडून गेल्या कित्येक वर्षापासून म्हापसा येथे बसस्थानक उभारण्यासाठी घोषणाबाजी केली जात होती. म्हापशाचे दिवंगत आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी नवीन बसस्थानकासाठी प्रयत्न केले होते. तथापि, त्यांच्या कार्यकाळात म्हापसा बसस्थानकाच्या बांधकामासाठी निविदा जारी होऊ शकली नाही. आता, ... Read More »

केजरीवाल यांनी तिसर्‍यांदा घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त करत आम आदमी पक्षाने सलग तिसर्‍यांदा दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काल रविवारी सलग तिसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह दिल्लीच्या विकासात योगदान देणार्‍या डॉक्टर, रिक्षा चालक, ... Read More »

सीएए, कलम ३७० मागे घेणार नाही

>> वाराणशीतील जाहीर सभेत मोदींचे प्रतिपादन सीएए आणि कलम ३७० च्याबाबतीत सरकारने घेतलेला निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही असे नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी येथील जाहीर सभेत सांगितले. कलम ३७० आणि सीसीए हे आवश्यक होते. सरकारवर प्रचंड दबाव असतानाही हे निर्णय घेण्यात आले. यामुळे हे निर्णय कायम राहतील, अशी ग्वाही मोदींनी या जाहीर सभेत दिली. कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ... Read More »

राज्यात गतवर्षात ७२६ जणांना डेंग्यू

>> रूग्णांमध्ये दुप्पट वाढ; काणकोणात १३३ रूग्ण राज्यात वर्ष २०१९ मध्ये डेंग्यू रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झालेली दिसून येत आहे. आरोग्य खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या वर्षात ७२६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून वर्ष २०१८ मध्ये ३३५ रुग्ण आढळून आले होते. २०१९मध्ये काणकोणात सर्वाधिक १३३ डेंग्यूची बाधा झालेले रुग्ण आढळून आले. आरोग्य खात्याला वर्ष २०१९ मध्ये ३४१८ संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून ... Read More »

१४४ कलम तात्काळ मागे घ्या : कामत

कोणतीही गरज नसताना गोवा सरकारने राज्यात १४४ कलम लागू केलेले आहे. आपल्या अपयशांपासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी लागू केलेले हे कलम सरकारने तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. कोणतेही कारण नसताना अशा प्रकारे १४४ कलम लागू करून सरकार राज्यातील जनतेच्या मुक्तपणे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणू शकत नाही, असे कामत यांनी आपल्या निवेदनातून स्पष्ट केले ... Read More »

एटीकेला हरवित चेन्नईनची आगेकूच

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमातील महत्त्वाच्या सामन्यात चेन्नईन एफसीने एटीके एफसीवर ३-१ असा दमदार विजय मिळवित बाद फेरीच्या दिशेने सुरु असलेली आगेकूच कायम राखली. विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर मध्यंतरास चेन्नईनकडे २-१ अशी आघाडी होती. सातव्याच मिनिटाला ब्राझीलचा रॅफेल क्रिव्हेलारोने खाते उघडले. माल्टाचा आंद्रे शेम्ब्रीने (३९वे मिनिट) दुसरा गोल केला. भरपाई वेळेत लिथुआनियाचा नेरीयूस वॅल्सकीस (९०+ ४) याने लक्ष्य साधले. ... Read More »