Daily Archives: February 15, 2020

पेराल ते उगवते!

बागा – कळंगुट येथील एका आलिशान हॉटेलमध्ये चाळीस जणांच्या जमावाने घुसून जो काही धुडगूस घातला तो प्रकार अतिशय गंभीर आहे आणि सरकारच्या गृह खात्याने या गुंडगिरीच्या घटनेची अतिशय गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे. या जमावाने अतिशय पूर्वनियोजीतरीत्या हा हल्ला चढवल्याचे एकूण घटनाक्रमावरून दिसते. पहाटे तीनच्या सुमारास हा दांडगटांचा जमाव हॉटेलमध्ये घुसला. मुख्य दरवाजा बंद करून त्यांनी आत धुडगूस घालून दहशत ... Read More »

स्वदेशी ‘अग्नि’ ची दहशत!

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) काही दिवसांपुर्वी अग्नि-२ या क्षेपणास्राचे परीक्षण झाले. या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्राची भीती शेजारी देशांना वाटणेही साहाजिक आहे. कारण आता रात्रीच्या अंधारात केल्या जाणार्‍या हल्ल्यांना सक्षमपणे तोंड देण्यास भारत समर्थ झाला आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाची ही प्रगती उत्तरोत्तर वाढत जाणे आवश्यक आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय संरक्षण उत्पादन प्रदर्शन भारतात भरवण्यात आले होते. एक विकसित होणारे संरक्षण सामग्रीचे उत्पादनकेंद्र म्हणून ... Read More »

राज्यात तिसर्‍या जिल्ह्याचा प्रस्ताव ः मुख्यमंत्री

राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. गोव्याच्या विकासात तिसर्‍या जिल्ह्यामुळे मोठी भर पडणार आहे. येत्या वर्षभरात तिसर्‍या जिल्ह्याचा आराखडा तयार केला जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धारबांदोडा येथे काल केली. धारबांदोडा तालुक्यातील प्रमुख सरकारी इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित राय, पंचायतीचे ... Read More »

नदी परिवहनमधील गैरकारभाराची चौकशी व दोषींवर कारवाई करावी

>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी सरकारने नदी परिवहन खात्यातील गैरव्यवहार व मनमानी कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. नदी परिवहन खात्यातील एका अधिकार्‍याची दक्षता समितीमार्फत सुरू करण्यात आलेली चौकशी पूर्ण करावी, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली. नदी परिवहन खात्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आल्याचे ऑडिट तपासणीमध्ये स्पष्ट झाले ... Read More »

झेडपी निवडणुका २० एप्रिलनंतर घ्याव्यात

>> मार्चमधील परीक्षांकडे ढवळीकरांनी वेधले लक्ष गोवा सरकारने जिल्हा पंचायत निवडणुकांचा सगळा घोळच केलेला असून या निवडणुका २२ फेब्रुवारी रोजी घेण्याऐवजी आता सरकारने २० एप्रिलनंतरच घ्याव्यात अशी मागणी काल मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी परिषदेत केली. सरकारने प्रथम या निवडणुका १५ मार्च रोजी घेण्याचे ठरवले होते. नंतर कार्निव्हल व शिगम्यामुळे सरकारने या निवडणुका २२ मार्च रोजी घेण्याचा निर्णय ... Read More »

पुलवामा ः तपास फलनिष्पत्तीवरून विरोधकांचे सरकारवर टीकास्त्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला काल एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर या विषयावरून विरोधक व भाजप यांच्यात शाब्दीक चकमकीच्या फैर्‍या झडू लागल्या आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजपवर तोफ डागताना पुलवामा हल्ल्याचा लाभ कोणाला झाला असा सवाल उपस्थित केला. तर प्रत्युत्तरात सत्ताधारी भाजपने राहुल गांधी हे लष्करे तैयबा व जैश ए महंमद यासारख्या दहशतवादी संघटनांचे समर्थक असल्याचा आरोप केला. यासंदर्भात कॉंग्रेसला ... Read More »

सेरूला कोमुनिदाद उपसमितीच्या फेरनिवडणुकीचा आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सेरूला कोमुनिदाद उपसमितीची निवडणूक नव्याने घेण्याचा आदेश कोमुनिदाद प्रशासकांना काल दिला. सेरूला कोमुनिदादच्या ३ मार्च २०१९ रोजी निवडणूक घेण्यात उपसमितीच्या निवडणुकीला प्रशासकीय लवादासमोर आव्हान देण्यात आले होते. या निवडणुकीसाठी ३७५ जणांनी नोंदणी केली होती. उपसमितीची निवड करण्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले होते. मतमोजणीच्या वेळी मतांची संख्या जास्त आढळून आली. प्रशासकीय लवादाने सदर निवडणूक रद्द ... Read More »

नॉर्थईस्टला नमवित ओडिशाने आशा राखल्या

मॅन्यूएल ओन्वू आणि पेरेझ ग्युडेस यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर ओडिशा एफसीने नॉर्थईस्ट युनायटेडचा २-१ अशा गोलफरकाने पराभव करीत हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. शुक्रवारी येथील कलिंगा स्टेडियमवर ओदीशाने नॉर्थईस्ट युनायटेड एफसीला २-१ असे हरविले. मध्यंतराची एका गोलची पिछाडी भरून काढत ओडिशाने दुसर्‍या सत्रात पारडे फिरविले. मार्टिन चॅव्हेजच्या गोलमुळे नॉर्थईस्टने मध्यंतरास १-० अशी आघाडी ... Read More »

थायलंडला नमवित भारत उपांत्य फेरीत

>> आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद भारतीय पुरुष संघाने ०-२ अशा पिछाडीवरून दमदार पुनरागमन करताना थायलंडचा ३-२ असा पराभव करीत आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली. मनिला-फिलिपिन्स येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील या विजयामुळे भारतीय संघाने पदकही निश्‍चित झाले आहे. भारतीय संघाची उपांत्य फेरीत आता दोन वेळच्या विजेत्या इंडोनेशियन संघाशी गाठ पडणार आहे. भारताचे स्टार शटलर्स किदाम्बी श्रीकांत आणि ... Read More »

गोमंतकीय संस्कृतीचे रक्षणकर्ते छ. शिवाजी महाराज

सचिन मदगे पोर्तुगिजांना नाईलाजाने आपल्या धर्माच्या आवडत्या धोरणास लगाम घालावा लागला. यासाठीचा पाया गोव्यात पहिल्यांदा घातला तो शिवाजी महाराजांनी. त्यासाठी गोव्याच्या भूमीत शिवरायांची शिवजयंती मोठ्या दिमाखात आणि थाटात साजरी झालीच पाहिजे.   पोर्तुगिजांनी सन १७६३ आणि १७८५ च्या दरम्यान सौंधेकर, पेशवे आणि सावंतवाडकरांकडून आजच्या गोव्यातील बारा तालुक्यांपैकी आठ तालुके- पेडणे, डिचोली, सत्तरी, धारबांदोडा, फोंडा, सांगे, केपे आणि काणकोण- ताब्यात घेऊन ... Read More »