Daily Archives: February 14, 2020

स्वच्छ भारत

राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्याच्या दिशेने अनेक महत्त्वपूर्ण निवाडे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. काल दिलेल्या अशाच एका निवाड्यात सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षांना आपल्या उमेदवारांवरील फौजदारी गुन्ह्यांचा तपशील त्यांना उमेदवारी दिल्यापासून ४८ तासांच्या आत संकेतस्थळांवरून जाहीर करण्याचे आणि ७२ तासांच्या आत निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन वर्षांपूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी गुन्हे असलेल्या राजकारण्यांना निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करायचा असेल ... Read More »

‘कोरोना’च्या उच्चाटनासाठी काही भरीव करा ना!

शंभू भाऊ बांदेकर श्‍वसनाचा त्रास होणे, ताप, कफ, धाप लागणे आणि श्‍वासोच्छ्वास मंदावणे ही या विषाणूंमुळे होणार्‍या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. अधिक गंभीर रुग्णांमध्ये संसर्गामुळे न्यूमोनियाही होऊ शकतो. शिवाय गंभीर आणि तीव्र स्वरूपाचे श्‍वसनविषयक त्रास आणि मूत्रपिंड निकामी होत शेवटी मृत्यू असे परिणाम दिसून येतात, चीनमध्ये कोरोनाच्या विषाणूंचे थैमान चालूच असून या विषाणूंचा संसर्ग झाल्याने मृतांची संख्या हजाराच्या घरात पोचली ... Read More »

दहा पक्षबदलू आमदारांना बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत

गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांना अपात्रताप्रकरणी त्यांची बाजू मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत काल दिली. सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणी एक निवाडा दिल्यानंतर गोवा विधानसभेच्या सभापतींनी प्रलंबित आमदार अपात्रता याचिकांवर सुनावणीच्या प्रक्रियेला गती दिली. गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कॉंग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दहा आमदारांच्या विरोधात ... Read More »

झेडपी निवडणूक तारीख बदल अधिसूचना जारी

राज्यातील जिल्हा पंचायत (झेडपी) निवडणुकीच्या बदलण्यात आलेल्या नवीन तारखेची अधिसूचना पंचायत खात्याचे सचिव संजय गिहार यांनी सरकारी पत्रकात काल जारी केली आहे. राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० जागांसाठी १५ मार्च २०२० रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. राज्यातील प्रमुख उत्सव शिमगोत्सव जिल्हा पंचायत निवडणुकीच्या काळात येत असल्याने निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. राज्य ... Read More »

उमेदवारांच्या गुन्हेगारीची माहिती वेबसाईट, वर्तमानपत्रात द्यावी

>> सुप्रिम कोर्टाचे राजकीय पक्षांना निर्देश राजकारणाचे गुन्हेगारीकरण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत असल्याबाबतची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने काल सर्व राजकीय पक्षांना निर्देश दिले आहेत की त्यांनी निवडणुकांसाठी निवड केलेल्या उमेदवारांविरूद्ध प्रलंबित असलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांची माहिती वेबसाईटवर अपलोड करावी. तसेच अशा उमेदवारांची निवड आपण का केली त्याची कारणेही सर्व राजकीय पक्षांनी या वेबसाईटवर अपलोड करावी अशी सूचनाही न्यायालयाने केली ... Read More »

वेंडल रॉड्रिक्स यांच्यावर कोलवाळ येथे अंत्यसंस्कार

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर, पर्यावरणवादी पद्मश्री वेंडल रॉड्रिक्स यांच्या पार्थिवावर शेकडो चाहत्यांच्या उपस्थितीत कोलवाळ येथे काल अंत्यसंस्कार करण्यात आले. कोलवाळ येथील निवासस्थानी वेंडल यांचे बुधवारी संध्याकाळी आकस्मिक निधन झाले. वेंडल यांच्यावर अंतिम संस्कार करण्यापूर्वी कोलवाळ येथील सेंट फ्रान्सीस ऑफ आसीस चर्चमध्ये खास प्रार्थना सभा पार पडली. स्थानिक नागरिकांबरोबर राजकीय, फॅशन, उद्योग, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून वेंडल यांना श्रद्धांजली ... Read More »

सहकारी बँका, पतसंस्थांना ओटीएस लागू करण्याच्या खात्याकडून सूचना

सरकारने राज्यातील सर्व पतसंस्था, सहकारी बँका व इतर सोसायट्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी एक वेळ कर्जफेड योजना (ओटीएस) लागू करण्याची सूचना केली आहे. राज्यातील अनेक सहकारी क्रेडिट व इतर सोसायट्यांना कर्जाची थकबाकी वाढत असल्याने एनपीएच्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील सहकार क्षेत्रातील पतपुरवठा करणार्‍या एनपीएचा आकडा सुमारे ४०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राज्यातील गोवा अर्बन, डिचोली अर्बन, मडगाव, गोवा राज्य सहकारी, ... Read More »

दोन महिन्यांच्या जमावबंदी आदेशामुळे पर्यटनावर परिणाम होणार ः कॉंग्रेस

उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी दोन महिन्यांसाठी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित स्थळ नसल्याचा संदेश जगभर पसरणार आहे. राज्यातील पर्यटनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सीएए विरोधात आवाज उठविणार्‍यांची मुस्कटदाबी करण्यासाठी या आदेशाचा वापर केला जाऊ शकतो, असा आरोप कॉंग्रेस पक्षाचे माध्यम विभागाचे संयोजक ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला. पश्‍चिम किनारपट्टीवर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून व्यक्त ... Read More »

मंत्री पाऊसकर खंडणीप्रकरणी पाचव्या संशयितास अटक

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकी प्रकरणी पाचव्या संशयिताला पणजी पोलिसांनी काल अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश गडियारी (गुजरात) असे अटक केलेल्या पाचव्या संशयिताचे नाव आहे. मंत्री पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकी प्रकरणी यापूर्वी चार जणांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मंत्री पाऊसकर यांच्याकडे ३ कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली होती. खंडणीची रक्कम ... Read More »

मिझोरमला नमवून गोवा उपांत्यपूर्व फेरीत

>> आगामी मोसमात खेळणार एलिट विभागात चार दिवसीय सामन्यात गोव्याने मिझोरमचा दोन दिवसात फडशा पाडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्लेट गटात ९ सामन्यांतून ५० गुण घेत गोव्याने अव्वल स्थान मिळविले. त्यामुळे आगामी २०२०-२१ मोसमासाठी गोव्याची प्लेट गटातून एलिट गटात उन्नती झाली आहे. पुढील मोसमात गोव्याचा संघ ‘एलिट सी’ गटात खेळताना दिसेल. कोलकाता येथील सीसीएफसी मैदानावर गोव्याने ... Read More »