Daily Archives: February 13, 2020

कॉंग्रेसला धडा

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची वाताहत तर झालीच, परंतु कॉंग्रेसची जी काही फटफजिती झाली आहे ती काही और आहे. कॉंग्रेसच्या ६३ उमेदवारांची अनामत या निवडणुकीत जप्त झाली आहे आणि पक्षाच्या एकूण मतांची अंतिम टक्केवारी आहे अवघी ४.२६ टक्के. उमेदवाराला एकूण मतांच्या एक षष्ठमांशहून कमी मते मिळाली तरच अनामत जप्त होत असते. म्हणजे कॉंग्रेसच्या उमेदवारांना एक षष्ठमांश मते देखील मिळवता ... Read More »

बहुराष्ट्रीय कंपन्या आणि भारतीय बाजारपेठ

शैलेंद्र देवळणकर पियुष गोयल यांच्या विधानांकडे नकारात्मकतेने न पाहता त्यांनी भारतात येणार्‍या गुंतवणूकदारांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे हे लक्षात घ्यायला हवे. समतोल साधण्यासाठीची ही कसरत आहे. त्यांच्या विधानांनंतरही परकीय गुंतवणूक भारतात येणारच आहे. ऍमेझॉन ही अमेरिकेतील ई-कॉमर्समधील सर्वांत मोठी बहुराष्ट्रीय कंपनी. या कंपनीची संपत्ती जवळपास २४० अब्ज डॉलर्स इतकी आहे. जगभरातील अनेक देशांत ऍमेझॉनच्या शाखा पसरलेल्या आहेत. या कंपनीने ... Read More »

वेगळ्या वाटेचा प्रवासी

विशेष संपादकीय   बिछडा कुछ इस अदा से की रुत ही बदल गई | इक शख्स सारे शहर को वीरान कर गया ॥ ‘वेंडेल रॉड्रिक्स’… पणजीत कांपालच्या निसर्गरम्य परिसरातून जाता येताना तेथील त्याच्या विक्री दालनाची ही पाटी हमखास दिसते. ती झोकदार सहीच त्याचा ब्रँड बनून गेली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा गोमंतकीय फॅशन डिझायनर आता आपल्यात नाही. गूढ परिस्थितीत तो त्याच्या ... Read More »

वेंडेल रॉड्रिक्स यांचे निधन

>> जागतिक कीर्तीचे गोमंतकीय फॅशन डिझायनर >> कोलवाळ येथील राहत्या घरी घेतला अंतिम श्वास आंतरराष्ट्रीय ख्यातीचे फॅशन डिझायनर, पर्यावरणवादी आणि समलैंगिकचळवळीचे समर्थक सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री वेंडेल रॉड्रिक्स (५९) यांचे काल बुधवारी संध्याकाळी ५.४५ च्या सुमारास कोलवाळ येथील निवासस्थानी अकाली व आकस्मिक निधन झाले. वेंडेल यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरले आणि त्यांच्या देशविदेशातील चाहत्यांवर शोककळा पसरली. वेंडेल यांंच्या पार्थिवावर १३ फेब्रुवारीला ... Read More »

विद्यापीठ विधेयक घाईत का मंजूर केले?

>> गोवा फॉरवर्ड पार्टीकडून प्रश्‍न गोवा सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवा खासगी विद्यापीठ विधेयक २०२० घाई गडबडीत कोणतीच चर्चा न करता मंजूर करण्यामागील कारण काय, असा प्रश्‍न काल गोवा फॉरवर्ड पार्टीने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यानी या विधेयकाला मंजूरी न देता ते परत पाठवावे, अशी मागणीही लोलयेकर यांनी यावेळी केली. यासंबंधी बोलताना पार्टीचे सरचिटणीस ... Read More »

रॉयल्टी न भरलेल्या खनिजाच्या वाहतुकीस परवानगी देणार

>> राज्यात आहे रॉयल्टी न भरलेले ९.५ दशलक्ष टन खनिज सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदी लागू करण्यापूर्वी उत्खनन केलेले, तथापि, रॉयल्टी न भरलेल्या खनिजाची रॉयल्टी वसुल करून वाहतूक करण्यास परवानगी दिली जाणार आहे. राज्यात रॉयल्टी न भरलेले सुमारे ९.५ दशलक्ष टन खनिज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे राज्यातील खाण क्षेत्र, ... Read More »

शिफारशींच्या पूर्ण अभ्यासांती व्याघ्र संरक्षणावर निर्णय

>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती राज्य सरकार म्हादई अभयारण्यातील वाघांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असून केंद्रीय वन, पर्यावरण मंत्र्यालयाने नियुक्त खास दोन सदस्यीय समितीचा अहवाल अधिकृतपणे राज्य सरकारला प्राप्त झाल्यानंतर अहवालातील शिफारशीचा अभ्यास करून वाघांच्या संरक्षणासाठी योग्य निर्णय घेतला जाणार आहे. अभयारण्य क्षेत्रात गाव आणि लोकवस्तीचा समावेश आहे. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना सर्व बाजूनीं विचार केला जाणार आहे, अशी माहिती ... Read More »

मुंबई सिटीला गारद करीत एफसी गोवा आघाडीवर

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमातील महत्त्वाच्या सामन्यात संभाव्य विजेत्या एफसी गोवा संघाने मुंबई सिटी एफसीचा ५-२ असा धुव्वा उडवित गुणतक्त्यात आघाडीच्या स्थानावर मुसंडी मारली. फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर स्पेनचा शैलीदार स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याने दोन, तर ह्युगो बौमौस व जॅकीचंद सिंग यांनी प्रत्येकी एका गोलचे योगदान दिले. याशिवाय गोव्याला स्वयंगोलचाही लाभ झाला. दरम्यान, या निकालामुळे गतविजेत्या बेंगळुरू एफसीचा ... Read More »

हैदराबादची आज जमशेदपूरशी लढत

इंडियन सुपर लीगमध्ये गुरुवारी हैदराबाद आणि जमशेदपूर यांच्यात लढत होईल. त्यावेळी जी. एम. सी. बालयोगी स्टेडियमवर यजमान संघाची प्रतिष्ठा पणास लागली असेल. त्यांना कामगिरीत घसरण रोखावी लागेल. हैदराबाद संघासाठी मोसम निराशाजनक ठरला आहे. १६ सामन्यात त्यांना केवळ ६ गुण मिळवता आले आहेत. त्यांना फक्त एकच विजय मिळाला असून त्यास १३ सामने उलटले आहे. आयएसएल इतिहासातील सर्वाधिक खराब कामगिरी त्यांची ठरेल ... Read More »