Daily Archives: February 12, 2020

केलेल्या कामांचा विजय

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने अपेक्षेनुरूप दिल्लीत भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकवार झाडले आहे. मतदारांनी पुन्हा एकवार केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाच्या जनताभिमुख कामगिरीला जोरदार पाठबळ दर्शवलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराची सारी भिस्त केवळ नरेंद्र मोदींवर राहिली होती. केंद्रातील मोदी सरकारच्या काश्मीर, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, राममंदिर, आदी कामगिरीवर भर देत ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर व्हावी असा आटोकाट ... Read More »

बालमृत्यू आणि असंवेदनशीलता

ऍड. प्रदीप उमप एकीकडे भारत निर्यातीत प्रगती करत आहे, जागतिक पातळीवर तरूणांचा देश म्हणून ओळखला जात आहे, आर्थिक विकास अधिक उंचीवर नेण्याचे स्वप्न आपण पहात असताना बालकुपोषणाचे ग्रहण काही सुटता सुटत नाहीये. भारतात दरवर्षी मृत्युमुखी पडणार्‍या बालकांच्या संख्येत वाढ होत आहे. भारताने १९९२ मध्ये आंतरराष्ट्रीय बाल अधिकार करारावर सह्या जरूर केल्या आहेत, पण त्याचे आपल्याला महत्त्वच वाटत नाही. मध्यंतरी, राजस्थानमधील ... Read More »

दिल्लीत सलग तिसर्‍यांदा केजरीवाल सरकार

>> विधानसभेच्या ७० पैकी ६२ जागांवर विजय; भाजप, कॉंग्रेसचे घडवले पानिपत दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत विविध एक्झिट पोलनी केलेली भाकिते अखेर खरी ठरली. एकूण ७० जागांपैकी ६२ जागा जिंकत अरविंद केजरीवाल यांचे सरकार दिल्लीत सलग तिसर्‍यांदा सत्तेवर आले. अतिशय प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत कॉंग्रेसबरोबरच भाजपाचेही पानिपत झाले. भाजपच्या वाट्याला नाममात्र ८ जागा आल्या. तर कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे भाजपच्या ... Read More »

वीज खात्याकडून शुल्क वाढीची अधिसूचना जारी

>> वीज ग्राहकांना लवकरच बसणार दरवाढीची झळ वीज खात्याने जानेवारी ते मार्च २०२० या तीन महिन्यांसाठीचे नवीन वीज बिल शुल्क दर अधिसूचित केले आहे. या नवीन वीज बिल शुल्क दरांमुळे ग्राहकांना वीज दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे. वीज खात्याचे मुख्य वीज अभियंता रघुवीर केणी यांनी नवीन वीज बिल शुल्कासंबंधीची सूचना १० फेब्रुवारी २०२० च्या सरकारी पत्रकात जारी केली आहे. राज्यात ... Read More »

शिक्षण संचालक राव यांनी कॉंग्रेस पदाधिकार्‍यांची माफी मागावी

>> विरोधी पक्षनेते कामत ः पोलीस तक्रारीचा इशारा सरकारी प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना चालू महिन्यांचे वेतन मिळण्यास विलंब झाल्याच्या प्रश्‍नावरून शिक्षण संचालक वंदना राव यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये गेलेल्या कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांना ‘माझ्या केबिनमधून चालते व्हा’ (गेट आऊट) असे सांगणार्‍या वंदना राव यांनी विनाविलंब कॉंग्रेस पदाधिकार्‍यांची माफी मागावी, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ... Read More »

जुने कर्ज फेडण्यासाठी सरकार काढतेय नवीन कर्ज ः चोडणकर

सरकार मागील कर्ज फेडण्यासाठीच नवी कर्जे काढीत असल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी २०२०-२१ वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना दिलेली आकडेवारीही चुकीची असल्याचा दावा त्यांनी केला. या अर्थसंकल्पातील आर्थिक तुटीसंबंधीची मुख्यमंत्र्यांनी दिलेली आकडेवारी चुकीची असून ती जाणीवपूर्वक चुकीची दिली असण्याची शक्यताही नाकारता येणार नसल्याचे ते म्हणाले. अर्थसंकल्पातील ... Read More »

म्हादई अभयारण्य व्याघ्र अभयारण्य घोषित करण्याची केंद्राची शिफारस

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याने म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या मृत्यूप्रकरणी नियुक्त द्वितीय सदस्यीय चौकशी समितीने म्हादई अभयारण्य व्याघ्र अभयारण्य घोषित करण्याची शिफारस केली आहे. या द्वितीय सदस्यीय समितीच्या सदस्यांनी गोळावली-सत्तरी भागाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिकांशी चर्चा करून समस्या, माहिती जाणून घेतली होती. या समितीने आपला चौकशी अहवाल केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालयाला सादर केला आहे. सीमा निश्‍चित ... Read More »

एफसी गोवा-मुंबई सिटी आज आमनेसामने

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये बुधवारी एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी हे संघ आमनेसामने येत आहेे. गोव्याला रोखण्याच मुुंबाईचा निर्धार असेल. गोव्याने सलग तीन सामने जिंकले आहेत. सर्जिओ लॉबेरा यांना हटवून क्लबने क्लिफर्ड मिरांडा यांना प्रशिक्षक केले. अचानक झालेला बदल संघावर नकारात्मक परिणाम करीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील सामन्यात गोव्याने हैदराबादला ४-१ असे नमविले होते. गोव्याचे ३३ गुण आहेत. ... Read More »

न्यूझीलंडकडून टीम इंडियाचा व्हाईटवॉश

तिसर्‍या व शेवटच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा ५ गडी व १७ चेंडू राखून पराभव करत मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. टी-ट्वेंटी मालिकेतील व्हाईटवॉशचा वचपा किवी संघाने एकदिवसीय मालिकेतील झंझावाती कामगिरीने काढला. भारताने विजयासाठी दिलेले २९७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ५ गडी गमावून गाठले. कॉलिन डी ग्रँडहोमने केवळ २८ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५८ ... Read More »