Daily Archives: February 8, 2020

कालापव्यय

निर्भया अत्याचार प्रकरणातील आरोपींची फाशी दिवसेंदिवस लांबणीवर पडत चालली आहे. गेली आठ वर्षे तिचे कुटुंबीय न्यायासाठी दारोदार भटकत आले. देशभरातील प्रसारमाध्यमांनी तिला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला, नागरिकांनी जागोजागी निदर्शने केली, न्यायालयांमध्ये प्रदीर्घ काळ लढा चालला, अखेरीस सहापैकी चार गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ठोठावली गेली, त्यावर फेरविचार याचिका झाल्या, राष्ट्रपतींपर्यंत दयेच्या याचिका गेल्या, त्या फेटाळल्या गेल्या. पुन्हा आरोपींकडून न्यायालयामध्ये धाव घेतली ... Read More »

विकृत राजकीय झळ

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) जनतेचा उत्स्फूर्त उठाव म्हणणार्‍यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. या चळवळीला वैचारिक, भावनिक व सक्रीय पाठींबा देणार्‍यांपाशी पैशाची अजिबात वानवा नाही. त्यांच्या मागे अनेक माध्यमांचेही भक्कम पाठबळ आहे. या चळवळीचा खरा नेता कोण हे जरी सिद्ध झालेले नसले तरी त्यामागे राष्ट्र विघातक शक्ती उभ्या आहेत यात शंकाच नाही. मागील काही दिवसात भारत स्फोटक, राष्ट्र विभाजक/विघटक झळीनी अक्षरश: ... Read More »

विरोधकांचा दुसर्‍या दिवशीही गोंधळ

>> विधानसभेत खंवटेप्रकरणाचे पडसाद, कामकाज तहकूब पर्वरीचे आमदार रोहन खंवटे याना अटक करण्यास सभापती राजेश पाटणेकर यांनी कसलीही चौकशी न करताच परवानगी दिल्याच्या प्रश्‍नावरून काल शुक्रवारी विरोधकांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला गोंधळ घातला. त्यामुळे सभापती पाटणेकर यांनी काल दुपारी १२.३० वाजेपर्यंत विधानसभेचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे प्रश्‍नोत्तराच्या तासाला कोणतेही कामकाज झाले नाही. काल सकाळी ११.३० वा. सभापती पाटणेकर यांनी सभागृहाचे कामकाजद सुरू ... Read More »

रोहन खंवटे अटकप्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा ः विरोधकांची मागणी

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना अटक प्रकरणी विधानसभेत न्यायासाठी आवाज उठविणार्‍या विरोधी गटातील १० आमदारांनी अखेर राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन आमदार अटक प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय देण्याची मागणी काल केली. दरम्यान, या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्‍वासन राज्यपालांनी आमदारांना दिले आहे. विधानसभेत सभापतींकडे विरोधी गटातील आमदारांनी या अटकप्रकरणी योग्य न्याय देण्याची मागणी केली. परंतु, विरोधी आमदारांच्या मागणीची योग्य ... Read More »

वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत ः कृषिमंत्री

वन्यप्राण्यांमुळे ज्या शेतकर्‍यांच्या शेतीचे नुकसान होत आहे अशा शेतकर्‍यांना कृषी खाते सर्व ती मदत देते. वन्यप्राण्यांना शेतकर्‍यांच्या शेतीत घुसता येऊ नये यासाठी शेतीला कुंपण घालण्यासाठी सरकार अनुदान देत असल्याची माहिती कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल विधानसभेत दिली. प्रश्‍नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्या सांगे मतदारसंघातील नुने, नेत्रावळी, कुमारी, भाटी आदी गावातील शेतकर्‍यांच्या शेतीची रानटी प्राण्यांनी नासाडी करून टाकलेली ... Read More »

मोपाच्या बांधकामासाठी मुदतवाढ

>> राज्य सरकारने मोपा विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यासाठी २० महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सप्टेंबर २०२० मध्ये विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जीएमआर कंपनीला देण्यात आले होते. मोपा विमानतळाबाबत सर्वोच्च न्यायालयातील पर्यावरण संबंधीच्या याचिकेमुळे अनेक महिने काम बंद ठेवावे लागले. त्यामुळे राज्य सरकारला बांधकाम पूर्ण करण्याच्या मुदतीत वाढ करावी लागली आहे. गेल्या १६ जानेवारी ... Read More »

महालेखापालांच्या अहवालात सरकारी खात्यातील अंदाधुंदी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी महालेखापालाचा (सीएजी ) मार्च २०१८ पर्यंतचा अहवाल राज्य विधानसभेत काल सादर केला. सरकारी विविध खात्यातील अंदाधुंदी, गैरकारभारामुळे झालेल्या नुकसानाचा पाढा अहवालात वाचण्यात आला आहे. जलस्रोत खात्याने योग्य सर्वेक्षण न करता अंदाजे ३०.६७ कोटी रुपये खर्चून तिलारीचा कालवा बांधला आहे. सात वर्षे हा कालवा वापराविना पडून राहिल्याने १०.९४ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ... Read More »

सरकारी कर्मचार्‍यांसाठी आता बायो मेट्रिक मशीनचा वापर

राज्य सरकारच्या अनेक कार्यालयातील सरकारी कर्मचारी कामावर वेळेवर रुजू होत नसल्याचे आढळून आले आहे. या पार्श्‍वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागाच्या प्रमुखांना अ, ब व क गटातील सरकारी कर्मचार्‍याच्या वक्तशीरपणा आणण्यासाठी बायो मॅट्रिक मशीनचा वापर करण्यासंबंधी एक परिपत्रक २८ जानेवारी २०२० रोजी जारी केले आहे. सरकारी कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने सरकारी कामकाजावर विपरित परिणाम होत आहे. लोकांची कामे ... Read More »

टीम इंडियाला विजय गरजेचा!

>> न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आज भारत व न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळविला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान न्यूझीलंडने १-० अशी आघाडी घेतली असून आव्हान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला कोणत्याही परिस्थितीत आज विजय मिळवावा लागणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारून दिली होती. परंतु, गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करणे शक्य झाले नव्हते. ... Read More »

नॉर्थईस्ट-ब्लास्टर्समध्ये नीरस गोलशून्य बरोबरी

हिरो इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) सहाव्या मोसमात शुक्रवारी येथील इंदिरा गांधी ऍथलेटीक स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी यांच्यातील लढत नीरस खेळामुळे गोलशून्य बरोबरीत सुटली. नॉर्थईस्टचे गोल करण्याच्या आघाडीवरील अपयश कायम राहिले. नॉर्थईस्टला नॉर्थईस्टला १४ सामन्यांत केवळ नऊ गोल करता आले आहेत. ब्लास्टर्सचा हा आकडा २३ असला तरी त्यांना २७ गोल पत्करावे लागले आहेत. दोन्हीसंघांच्या बाद फेरीच्या आशा ... Read More »