Daily Archives: February 7, 2020

राजकीय सूडाचा वास

भारतीय जनता पक्षाचे नेते प्रेमानंद म्हांबरे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काल पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना भल्या पहाटे अटक केली. नंतर ते जामिनावर मुक्त झाले, परंतु ज्या प्रकारे रातोरात ही कारवाई झाली ती भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान सरकारच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. जरी या अटकेला म्हांबरे यांनी केलेल्या फौजदारी तक्रारीचा आधार असला तरी या कारवाईला राजकीय सूडाचा ... Read More »

‘मूकनायक’ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने…

शंभू भाऊ बांदेकर बाबासाहेबांची नियतकालिकाची कल्पना शाहू महाराजांना आवडली. तात्काळ त्यांनी या कामासाठी अडीच हजारांचा धनादेश बाबासाहेबांच्या स्वाधीन केला. त्यानंतर काही दिवसांतच बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ या पक्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. ती तारीख होती ३१ जानेवारी १९२०. म्हणून बाबासाहेबांच्या वैचारिक जागरणाचे औचित्य साधून ‘मूकनायक’चा शताब्दीमहोत्सव अनेक ठिकाणी पार पडला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दीन-दलित, शोषित-पीडित व वंचितांचे कैवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब ... Read More »

सर्वस्पर्शी

विशेष संपादकीय राज्याच्या आर्थिक मर्यादांचे पूर्ण भान असलेला, सरकारच्या खर्चावरील मर्यादांची प्रांजळ कबुली देणारा, परंतु तरीही सर्वसामान्यांना झळ पोहोचवणारी करवाढ न करता राज्याच्या उत्पन्नाच्या सुयोग्य विनियोगाचा इरादा स्पष्ट करणारा सर्वस्पर्शी अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मांडलो. मागील अर्थसंकल्पातील बरीचशी कामे अद्याप पूर्ण व्हायची आहेत याचाही विसर त्यांना पडलेला दिसला नाही. ती पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याचा पुनरुच्चार ठायीठायी दिसून आला. ... Read More »

विरोधकांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प

>> रोहन खंवटे अटक प्रकरणी निषेध नोंदवणार्‍या विरोधी आमदारांना सभापतींनी मार्शलकरवी बाहेर काढले राज्याच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवूनही समाजाच्या विविध घटकांना सामावून घेण्याची ग्वाही देणारा, २१०५६.३५ कोटी खर्चाचा व ३५३.६१ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सादर केला. राज्याची वित्तीय तूट २.१ टक्क्यांवर गेली असल्याची कबुलीही त्यांनी यावेळी दिली, मात्र मद्य, जमीन रुपांतरण शुल्क, मुद्रांक शुल्क ... Read More »

आमदार रोहन खंवटे यांना अटक व सुटका

विरोधकांना मार्शलकरवी बाहेर काढले >> विधानसभेत प्रचंड गदारोळ >> कामकाज चार वेळा तहकूब   माजी महसूलमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांची भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांबरे यांना केलेल्या कथित मारहाण व धमकी प्रकरणी पोलिसांनी काल पहाटे सभापतींच्या अनुमतीनंतर अटक करून नंतर जामिनावर सुटका केली. या घटनेचे तीव्र पडसाद काल विधानसभेत उमटले. विरोधकांनी जोरदार गदारोळ माजवल्याने चार वेळा कामकाज तहकूब करावे ... Read More »

विधानसभेचे कामकाज तब्बल चार वेळा तहकूब

भाजपचे प्रवक्ते प्रेमानंद म्हांंबरे यांना मारहाण केल्याच्या खोट्या आरोपाखाली पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी अटक केल्याच्या कारणावरून काल विरोधी आमदारांनी गोवा विधानसभा सभागृहात गोंधळ घालून सभापतींनी आमदार रोहन खंवटे यांना अटक करण्यास पर्वरी पोलिसांना कशी परवानगी दिली, असा सवाल सभापतींना केल्याने विधानसभेचे कामकाज काल सभापतींनी चार वेळा तहकूब केले. त्यामुळे काल विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्या व शून्य तासाला कोणतेही ... Read More »

दबावामुळे कारवाई केलेली नाही ः सभापती

अपक्ष आमदार रोहन खंवटे अटक प्रकरणी दबावाखाली कोणतीही कृती केली नाही, असे स्पष्टीकरण सभापती राजेश पाटणेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिले. प्रेमानंद म्हांबरे धमकी प्रकरण विधानसभेच्या आवारात घडलेले आहे. पोलीस खात्याकडून या प्रकरणी चौकशी केली जात आहे. विधानसभेत घडलेल्या या प्रकरणाची फुटेज उपलब्ध आहे. पोलिसांनी फुटेज मागितलेली नाही. पोलिसांनी फुटेज मागितल्यास त्यांना उपलब्ध केली जाईल. या घटनेचे आमदार प्रतापसिंह राणे ... Read More »

न्याय मिळेपर्यंत कामकाज रोखण्याचा विरोधकांचा इशारा

आमदार रोहन खंवटे यांच्यावर मारहाणीची खोटी तक्रार पोलिसात नोंदवून त्यांना अटक करण्यात पोलिसांना भाग पाडलेले भाजपचे पदाधिकारी प्रेमानंद म्हांंबरे यांना ताबडतोब अटक करण्यात यावी. अन्यथा आम्ही विधानसभचे कामकाज होऊ देणार नाही, असे काल विरोधी आमदारांनी पर्वरी येथे विधानसभा परिसरात संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, आमदार रोहन खंवटे यांच्यावर भाजपच्या पदाधिकार्‍याने मारहाणीची तक्रार करण्याची ... Read More »

सुकूर येथील सभेत सरकारच्या कृतीचा निषेध

>> समर्थकांचा खंवटेना पाठिंबा माजी महसूलमंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांना अटक केल्या प्रकरणी पर्वरी मतदारसंघात वातावरण तापले असून या कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी निषेध सभा घेत पाठिंबा व्यक्त केला आहे. काल सकाळी धोनवाडा, सुकूर येथील श्री वेताळ चावडेश्वर देवस्थानच्या प्रांगणात आयोजित निषेध सभेत सुमारे पाचशेपेक्षा जास्त खंवटे समर्थकांनी सरकार आणि सभापतींचा निषेध केला. यावेळी साल्वादोर दु मुंदचे सरपंच संदीप ... Read More »

बोनस गुणासह गोव्याची नागालँडवर मात

गोव्याने नागालँडचा २२९ धावांसह पराभव करीत प्लेट गट रणजी सामन्यात काल बोनस गुणासह आकर्षक विजय मिळविला. गोव्याचा हा यंदाच्या स्पर्धेतील सहावा विजय ठरला. सोविमा येथील नागालँड क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात आला. पहिल्या डावात नागालँडला १७६ धावांवर गारद करीत गोव्याने १४२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. प्रत्युत्तरात गोव्याने आपला दुसरा डाव ४ बाद २२१ धावांवर घोषित करीत नागालँडसमोर ३६४ धावांचे विजयी ... Read More »