Daily Archives: February 6, 2020

आज काय संकल्प?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज आपल्या सरकारचा सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. गेले दहा महिने त्यांच्या सरकारचे चाललेले कार्य हे मुख्यत्वे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घालून दिलेल्या कृतिकार्यक्रमाबरहुकूम होते. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेली बहुतेक सारी विकासकामेही पर्रीकर सरकारच्या कार्यकाळातच आखली गेलेली दिसतात. यावेळी प्रथमच डॉ. सावंत यांना स्वतःच्या कल्पनेतून आपला अर्थसंकल्प मांडण्याची संधी लाभलेली आहे, साहजिकच गोमंतकीय ... Read More »

पाकिस्तान ‘व्हाईट’, भारतासाठी ‘वाईट’

शैलेंद्र देवळणकर उरी, पुलवामावरील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करण्यासाठी जबरदस्त प्रयत्न सुरु केले होते. एफएटीएफ या संस्थेने पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे यासाठीही भारत प्रयत्नशील होता. पण या संघटनेने पाकिस्तानला व्हाईट लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला असून एक प्रकारे त्यांना क्लीन चिटच दिली आहे. हा भारतासाठी मोठा धक्का आहे. फिनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्स अर्थात एफएटीएफ ही फ्रान्स ... Read More »

श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट स्थापन

>> पंतप्रधान मोदींची लोकसभेत माहिती अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला असे पंतप्रधान म्हणाले. हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. अयोध्येचे ... Read More »

घरगुती वीज दरवाढीला विरोधी पक्षांचा विरोध

संयुक्त वीज नियमन आयोगाच्या जनसुनावणीच्या वेळी वीज खात्याच्या वीज बिल आकारणीच्या स्लॅबच्या पद्धतीमध्ये बदल करून घरगुती वीज दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यात आला आहे. वीज बिल आकारणीमध्ये नवीन बदल करून मागील दाराने घरगुती वीज दरवाढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप संयुक्त विरोधी पक्षाच्या वतीने आयोगाच्या अध्यक्षांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे. संयुक्त वीज नियमन आयोगाचे अध्यक्ष एम. ... Read More »

अधिवेशनात आज अर्थसंकल्प

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२० रोजी राज्य विधानसभेत २०२० – २०२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेच्या वर्ष २०१९ च्या पावसाळी अधिवेशनात दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तयार केलेल्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले होते. मुख्यमंत्री ... Read More »

वन्यप्राण्यांना अन्नपाणी मिळण्याची अभयारण्यांत व्यवस्था करू

>> मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही म्हादई अभयारण्यातील चार वाघांची हत्त्या करण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील वनक्षेत्रात असलेल्या वाघांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने आवश्यक ती सगळी उपाययोजना केलेली आहे. लवकरच सर्व अभयारण्यात टेहाळणी मनोरे उभारण्यात येणार आहेत. तसेच वाघांसह अन्य वन्यप्राण्यांना अभयारण्यात आवश्यक ते पाणी व खाद्य मिळावे यासाठीही पावले उचलण्यात येणार आहेत. वन्यप्राणी खाद्यासाठी मानवी वस्तीत शिरू नयेत यासाठी वनक्षेत्रात फळझाडांची संख्या वाढवण्यात ... Read More »

म्हादईप्रश्‍नी कोणतीही तडजोड नाही ः मुख्यमंत्री

>> राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार ठरावावर चर्चा म्हादई प्रश्‍नी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. म्हादईचे पाणी काही प्रमाणात वळविण्यात आले त्यामुळे पाण्याच्या प्रवाहावर काही परिणाम झाला आहे. जलस्रोत खात्याकडून म्हादईवर देखरेखीसाठी कृती दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हादई प्रश्‍नी लवाद आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. तसेच म्हादई प्रश्‍नी पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठविण्यात आलेले आहे. म्हादईबाबत कुठलाही ... Read More »

म्हादई प्रश्‍न सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत पंतप्रधानांसमोर मांडावा ः दिगंबर कामत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हादईचा प्रश्‍न सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्याची गरज आहे. तसेच, कर्नाटकाच्या हालचालीवर देखरेख ठेवण्यासाठी कृती दलाची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शन ठरावावरील चर्चेत बोलताना काल केली. म्हादईच्या प्रश्‍नावर खास अधिवेशन घेऊन ठराव संमत केल्यास मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे हात आणखीन मजबूत होऊ शकतात, असेही कामत ... Read More »

हैदराबादचा धुव्वा उडवित गोव्याची आघाडी

ह्युगो बौमास आणि फेरॅन कोरोमीनास यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी दोन गोलांच्या जोरावर एफसी गोवाने हैदराबाद एफसीचा ४-१ असा धुव्वा उडवित हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात गुणतक्त्यात आघाडी घेतली. बुधवारी नेहरू स्टेडियमवर गोव्याने हैदराबादचा ४-१ असा धुव्वा उडविला. मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा यांना क्लब व्यवस्थापनाने निरोप दिल्यानंतरही गोव्याने हा निकाल साध्य केला. त्यांच्या कार्यकाळात आत्मसात केलेल्या आक्रमक खेळाचे प्रदर्शन गोव्याने ... Read More »

न्यूझीलंडच्या विजयात टेलरचे शतक

रॉस टेलरचे शतक तसेच हेन्री निकोल्स व कर्णधार टॉम लेथम यांच्या अर्धशतकांच्या बळावर यजमान न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात काल बुधवारी टीम इंडियाचा ४ गडी व ११ चेंडू राखून पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेले ३४९ धावांचे विशाल लक्ष्य यजमानांनी ४८.१ षटकांत ६ गडी गमावून गाठले. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ व मयंक अगरवाल या नव्या ... Read More »