Daily Archives: February 5, 2020

देशाला संदेश

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल गोवा विधानसभेने पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव विरोधकांच्या अनुपस्थितीत परवा संमत केला. अशा प्रकारचा ठराव आणणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपमध्ये अलीकडेच डेरेदाखल झालेले अल्पसंख्यक आमदार बाबुश मोन्सेर्रात यांनी हा ठराव मांडला आणि त्याच्या समर्थनार्थ गोव्यातील भाजपचे अल्पसंख्यक आमदार ... Read More »

बालगुन्हेगारीचे आव्हान

ऍड. प्रदीप उमप पूर्वीच्या काळात परिस्थितीने हतबल झालेली आणि सामाजिक अन्यायाला बळी पडलेली मुले गुन्हेगारीकडे वळत, आता मात्र गुंडांकडून लहान मुलांना गुन्ह्यांसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. गेल्या काही महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगार सहभागी असल्याचे निदर्शनास आले आहे. बालगुन्हेगारीविषयक कायद्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘जाव, उस आदमी का साइन ले के आओ’ हा संवाद तुम्हाला कोठेतरी ऐकल्यासारखा ... Read More »

खाण घोटाळा : अहवाल येताच नोटिसा बजावणार

>> विधानसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही खाण घोटाळ्यासंबंधीचे नऊ खटले सध्या चालू असून कुठल्या खाण कंपनीकडून सरकारला किती पैसे द्यायचे आहेत, त्यासंबंधीचा अहवाल चार्टर्ड अकाऊटंट तयार करीत आहेत. महिनाभरात ते आपला अहवाल सरकारला सादर करणार आहेत. हा अहवाल हाती येताच सर्व संबंधित कंपन्यांना वसुलीसाठी नोटिसा पाठवण्यात येणार असल्याची ग्वाही खाणमंत्री प्रमोद सावंत यांनी काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला गोवा विधानसभेत दिली. खाणी सुरू करण्यासाठी ... Read More »

विधानसभेत अत्यावश्यक सेवा देखभाल विधेयक सादर

>> ‘एस्मा’तील शिक्षा व दंडात वाढीची तरतूद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्य विधानसभेत गोवा अत्यावश्यक सेवा देखभाल (दुरूस्ती) विधेयक २०२० काल सादर केले. या विधेयकाच्या माध्यमातून एस्मा कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या रक्कमेत वाढ करण्याची तरतूद आहे. या विधेयकाच्या माध्यमातून एस्मा कायद्यातील कलम ४, ५ आणि ६ मध्ये दुरूस्तीचा प्रस्ताव आहे. एस्माच्या काळात संप करणार्‍याला सहा महिन्यांची शिक्षा तीन वर्षांपर्यंत ... Read More »

‘करोना’बाबत सरकार गंभीर ः आरोग्यमंत्री

राज्य सरकार करोनाबाबत गंभीर असून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारने सुचविलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जात आहे. केंद्र सरकारकडे थर्मल स्कॅनर उपलब्ध करण्याची विनंती करण्यात आली आहे. करोनाबाबत जनजागृतीसाठी शिक्षण खाते, अंगणवाडी कर्मचार्‍यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व ... Read More »

सरकारची वाटचाल प्रकाशातून अंधाराकडे ः ढवळीकर

>> अभिभाषणावरील आभाराच्या चर्चेत विरोधकांची टीका विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावरील दुसर्‍या दिवशीच्या चर्चेच्या वेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. सरकारची वाटचाल प्रकाशाकडून अंधाराकडे सुरू आहे, अशी टीका मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली. तर, सरकारकडे कुठलेही धोरण नसल्याने दिशाहीन कारभार सुरू असल्याची टीका गोवा ङ्गॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली. कर्नाटकने म्हादईचे २७ टक्के पाणी वळविले ... Read More »

टीम इंडिया विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत

> > उपांत्य लढतीत पाकिस्तानचा १० गड्यांनी दारुण पराभव   यशस्वी जैसवालचे नाबाद शतक  दिव्यांश सक्सेनाचे अर्धशतक – सुशांत, बिश्‍नोई, त्यागीचा प्रभावी मारा भारताने एकतर्फी ठरलेल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा १० गडी व ८८ चेंडू राखून पराभव करत १९ वर्षांखालील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे किरकोळ लक्ष्य टीम इंडियाने ३५.२ षटकात एकही गडी न गमावता ... Read More »

गोव्यासमोर आज हैदराबादचे आव्हान

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) एफसी गोवा संघासमोर बुधवारी हैदराबाद एफसीचे आव्हान असेल. सर्जिओ लॉबेरा यांच्या अनुपस्थितीत गोवा नेहरू स्टेडियमवर आपली मोहिम पुढे नेईल. त्यांचे लक्ष आघाडी घेण्यावर असेल. आघाडीवरील स्थानामुळे एएफसी चँपीयन्स लीग गटात प्रवेश मिळणार असल्यामुळे गोवा या शर्यतीत पिछेहाट होऊ नये म्हणून प्रयत्न करेल. गोवा क्लब व्यवस्थापनाने लॉबेरा यांना निरोप दिला आहे. क्लिफर्ड मिरांडा यांची हंगामी प्रशिक्षक ... Read More »