Daily Archives: February 4, 2020

दिल्लीची लढत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीतील पहिल्या जाहीर सभेतून तेथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगूल फुंकला. येत्या शनिवारी, आठ जानेवारीला होणार्‍या निवडणुकीतून दिल्लीतील आम आदमी पक्षाचे शासन पायउतार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने प्रयत्नांची शर्थ चालवलेली आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आम दिल्लीवासीयांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी मोफत वीज, पाणी, मोहल्ला क्लिनिक, महिलांना ... Read More »

ज्याचे जळते, त्यालाच कळते!

देवेश कु. कडकडे (डिचोली) सात वर्षांचा न्यायालयीन लढा देऊन निर्भयाच्या मातापित्यांनी जो न्याय मिळवला तो केवळ तिच्या एकट्याचाच लढा नव्हता तर संपूर्ण देशाचा होता. अशावेळी गुन्हेगारांना माफ करण्याची मागणी करणे ही सार्‍या देशवासीयांची केलेली थट्टाच आहे. समाज हा विविध स्वभावाच्या व्यक्तींनी एकत्र गुंफलेला एक समूह आहे. ‘जगा आणि जगू द्या’ हे सूत्र प्रत्येक व्यक्तीने अंगिकारले तर समाजात शांतता आणि सुव्यवस्था ... Read More »

माध्यान्ह आहाराचे कंत्राट यापुढेही स्वयंसहाय्य गटानांच

>> मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत स्पष्ट निर्वाळा राज्यातील विद्यालयांना माध्यान्ह आहार योजनेखाली जे अन्न पुरवले जाते ते पुरवण्याचे कंत्राट यापुढेही राज्यातील स्वयंसाहाय्य गटांकडेच राहील. चांगले व दर्जेदार अन्न पुरवण्याच्या नावाखाली ‘अक्षय पात्र’ किंवा अन्य कुणालाही ते कंत्राट दिले जाणार नसल्याचे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल गोवा विधानसभेत सांगितले. ज्या स्वयंसेवी गटांचे पैसे देण्यात आलेले नाहीत ते लवकर देण्याची सोयही ... Read More »

सीएए समर्थनार्थ विधानसभेत ठराव

>> ठराव मांडणारे गोवा पहिले राज्य, ढवळीकरांव्यतिरिक्त विरोधकांचा सभात्याग गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल सीएए समर्थनार्थ ठराव मांडण्यात आला. हा ठराव मांडणारे देशातील गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे हा ठराव पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मांडला. बाबूश हे अल्पसंख्याक समाजाचे आहेत. त्यांनी हा ठराव मांडला ही वैशिष्ट्यपूर्ण घटना मानली जाते. गोवा विधानसभेत नागरिकत्व कायद्यात दुरूस्ती करणार्‍या ... Read More »

सीएए समर्थनपर ठराव मांडण्यावरून गोंधळ

नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत मांडून तो संमत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव काल बाबुश मोन्सेरात यांनी विधानसभेत मांडला. त्यावेली विरोधकांनी त्याला जोरदार विरोध करत सभागृहात गोंधळ घातला. सभापती राजेश पाटणेकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत जाऊन ‘शेम, शेम’ अशा घोषणाही दिल्या. गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी या ठरावाला आक्षेप घेतला. सीएएवर ... Read More »

मडगावात दोन मजुरांचा खून; एक गंभीर

>> संशयितास १२ तासांत अटक मडगाव एसजीपीडीए बाजारालगत वालंकिणी बारसमोर रविवारी मध्यरात्री दन मजुरांचा डोक्यात दगड घालून व दारुच्या बाटलीने खून झाला. यात तिसरा मजूर गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अर्जुन मारुती काझीदोनी (३२) या तरुणाला अटक केली. या प्रकरणात रवी (२०) व भीम (३०) या दोघांचा खून झाला असून सुनील सावंत (४५) हा गंभीर जखमी झाला आहे. ... Read More »

पाऊसकर खंडणीप्रकरणी आणखी एकास अटक

सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर खंडणीसाठी धमकी प्रकरणी मुंबई येथील मनीष मनसुखभाई शहा (४३) याला पणजी पोलिसांनी काल अटक केली. मंत्री पाऊसकर यांना खंडणीसाठी धमकीप्रकरणी आत्तापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. मंत्री पाऊसकर यांना ३ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी फोन करण्यात येत होते. मंत्री पाऊसकर यांनी खंडणीचे पैसे नेण्यासाठी आपल्या बंगल्यावर संशयितांना बोलाविले होते. महाराष्ट्रातील तिघे जण खंडणीचे पैसे नेण्यासाठी ... Read More »

खाजगी वनक्षेत्राच्या नावाखाली प्रचंड घोटाळा : सरदेसाई

खासगी वनक्षेत्राच्या नावाखाली सध्या प्रचंड मोठा घोटाळा चालू असल्याचा आरोप काल माजी वनमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला विधानसभेत केला. त्याची चौकशी करण्यासाठी सभागृह समिती स्थापन केली जावी, अशी मागणीही सरदेसाई यांनी यावेळी केली. खासगी वनक्षेत्र पूर्वीपेक्षा कितीतरी कमी दाखवण्यात आल्याने आपण वनमंत्री असताना जो अहवाल फेटाळला होता त्या अहवालाला आता सरकार अंतिम ... Read More »

नदालला पछाडत जोकोविच अव्वल

ऑस्ट्रेलियन ओपन विक्रमी आठव्या वेळेस जिंकलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने काल सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. त्याने स्पेनच्या राफेल नदाल याला दुसर्‍या स्थानी ढकलले आहे. मागील वर्षी ४ नोव्हेंबरला नदालने जोकोविचला पछाडत पहिला क्रमांक आपल्या नावे केला होता. अव्वल स्थानावरील आपल्या २७६व्या आठवड्याची सुरुवात जोकोविचने केली. मागील दहा पैकी नऊ मोसमात (२०११-१६, २०१८-२०) ... Read More »

आयसीसी टी-ट्वेंटी क्रमवारी लोकेश राहुल द्वितीय

भारताच्या लोकेश राहुल याने आयसीसी टी-ट्वेंटी क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका ५-० अशी जिंकलेल्या भारतीय संघाचा राहुल अविभाज्य घटक होता. या मालिकेत राहुलने २२४ धावा केल्या होत्या. राहुलने सहाव्या स्थानावरून प्रगती करत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान मिळविले. रोहित शर्माने तीन क्रमांकांची उडी घेत दहावे स्थान आपल्या नावे केले आहे. श्रेयस अय्यर (+ ६३, ५५वे स्थान), मनीष पांडे ... Read More »