Daily Archives: February 3, 2020

खरेच चालना मिळेल?

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यापुढे सन २०२०-२१ चा केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना एकमेव प्रधान उद्दिष्ट समोर होते ते म्हणजे मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे. सर्व आर्थिक आघाड्यांवरील सरकारचे अपयश लक्षात घेता जनतेच्या हाती अधिक पैसा खेळता राहिला व तिची क्रयशक्ती वाढली तरच सर्व क्षेत्रांत सध्या दिसणारी ही मरगळ हटू शकेल हे सामान्य गृहितक लक्षात घेऊन त्या दृष्टीने वेगवेगळ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या आहेत, परंतु ... Read More »

चांगल्या वाईट गोष्टींची संमिश्र पोतडी!

मुकुंद कुलकर्णी कोणत्याही अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाकडे पाहताना तटस्थ दृष्टी गरजेची असते. सकारात्मक अथवा नकारात्मक यापलीकडे जाऊनही काही गोष्टी त्यामध्ये असतात. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातही अशा काही गोष्टी आहेत. त्यांचाही विचार व्हायला हरकत नाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी २.० सरकारचा दुसरा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाचे तीन भागांत विश्‍लेषण करणे आवश्यक आहे. १) सकारात्मक किंवा ... Read More »

विधानसभेचे आजपासून अधिवेशन

>> पाच दिवस अधिवेशन, ६ रोजी अर्थसंकल्प गोवा विधानसभेच्या पाच दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवार दि. ३ फेब्रुवारीला सकाळी ११.३० वाजता प्रारंभ होणार असून अधिवेशन शुक्रवार दि. ७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गुरुवार दि. ६ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधकांनी म्हादई, सीएए दुरुस्ती, कायदा व सुव्यवस्था, सरकारची आर्थिक स्थिती, एसटी राखिवता आदी मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याची ... Read More »

चीनमधून येणार्‍यांचा भारताने व्हिसा रोखला

चीनमधून येणार्‍या नागरिकांना देण्यात येणारी ई-व्हिसा सुविधा भारताने तूर्त थांबवली आहे. करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, करोनाची लागण झाल्याने चीनमध्ये आतापर्यंत ३०४ जणांचा बळी गेला आहे. १४,५५२ लोकांना याची लागण झाली आहे आणि हा विषाणू भारत, अमेरिका, ब्रिटनसह अन्य २५ देशात पसरला आहे. दरम्यान, रविवारी भारताने चीनमधील ३२४ नागरिकांना एअर इंडिया विमानाने मायदेशी परत ... Read More »

बायंगिणी कचरा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार ः मडकईकर

बायंगिणी जुना गोवा येथील नियोजित कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या प्रश्‍नावर स्थानिकांच्या शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेणार आहे, अशी माहिती स्थानिक आमदार पांडुरंग मडकईकर यांनी स्थानिकांनी आयोजित प्रकल्पविरोधी रॅलीत बोलताना दिली आहे. बायंगिणी जुना गोवा येथे २५० टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास ना हरकत दाखला देण्यात आलेला आहे. या ठिकाणी कचरा प्रकल्प उभारण्यास नागरिकांनी विरोध केला होता. गोवा ... Read More »

निर्भयाप्रकरणी न्यायालयाने निकाल राखून ठेवला

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने राखून ठेवला. शुक्रवारी पतियाळा हाऊसने दिलेल्या फाशीच्या स्थगितीला तिहार तुरुंग प्रशासन आणि गृह मंत्रालयाने आव्हान दिले होते. दोषींना लवकरात लवकर फाशी दिली जावी अशी मागणी करणारी याचिका शनिवारी तिहार तुरुंग प्रशासनाने केली. यावरील सुनावणी रविवारी झाली. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाचे बाजू मांडणारे महाधिवक्ता ... Read More »

गोमेकॉत करोनाचे २ संशयित रुग्ण

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमधील करोनाचा संशयास्पद रुग्णाची संख्या २ झाली आहे. चीन मधून आलेल्या १४ जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या संशयास्पद रुग्णाचा रक्त तपासणी अहवाल नकारात्मक असल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर शनिवारी एका विदेशी महिलेला संशयावरून दाखल करून घेण्यात आले आहे. या महिलेच्या सोबत असलेल्या महिलेची ... Read More »

वास्कोत सीएए समर्थनार्थ महारॅली

>> आमदार, मंत्र्यांसह १५ हजारांचा सहभाग केंद्र सरकारने देशात लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ वास्को शहरात काढलेल्या महारॅलीत मुरगाव तालुक्यातून जनसागर लोटला होता. सुमारे पंधरा हजार नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. दि. ११ डिसेंबरला राष्ट्रपतींच्या संमतीनुसार लोकसभा व राज्यसभेत नागरिकत्वावर मोहर उमटवण्यात आली. याविषयी देशभर निदर्शने, समर्थनासाठी मोर्चे व निदर्शने करण्यात येत आहेत. वास्कोतही याचे पडसाद उमटले. वास्कोत ... Read More »

आवाज दाबण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न : ट्रॉजन

केंद्र सरकारने नव्याने दुरुस्त केलेल्या सीएए व एनआरसीच्या विरोधातील आंदोलन करणार्‍याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. मडगाव येथील लोहिया मैदानावर आयोजित सीएए व एनआरसीच्या विरोधात आयोजित सभेसाठी अल्पवयीनांचा वापर केल्याप्रकरणी महिला पोलिसांनी दाखल गुन्हा हा त्याचाच एक प्रकार आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला. मडगाव येथील सीएए व एनआरसी विरोधी सभेत ... Read More »

टीम इंडियाचा न्यूझीलंडला व्हाईटवॉश

>> पाचवा टी-ट्वेंटी सामना ७ धावांनी जिंकला पाचव्या व शेवटच्या टी-ट्वेंटी सामन्यात न्यूझीलंडचा ७ धावांनी पराभव करत टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ५-० असे निर्भेळ यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटीमधील भारताचा हा सलग आठवा विजय होता. भारताने विजयासाठी दिलेले १६४ धावांचे आव्हान यजमान संघाला पेलवले नाही. त्यांना २० षटकांत ९ बाद १५६ धावांपर्यंतच मजल मारता आली. जसप्रीत बुमराह सामनावीर तर ... Read More »