Daily Archives: February 1, 2020

दिलासा की धक्का?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेमध्ये नरेंद्र मोदी सरकारचा सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. देशाच्या विकास दरापासून महागाईच्या निर्देशांकापर्यंत आणि औद्योगिक उत्पादनापासून वित्तीय तुटीपर्यंत सर्व तर्‍हेचे आकडे भारतीय अर्थव्यवस्थेची अत्यंत निराशाजनक वर्तमान स्थिती दर्शवित आहेत. एकेकाळची जगातील सर्वांत गतिमान अर्थव्यवस्था मानल्या जाणार्‍या भारतीय अर्थव्यवस्थेला भले फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी होण्याचे डोहाळे लागले असले, तरी सध्याची तिची प्रत्यक्षातील स्थिती मात्र गंभीर ... Read More »

अंतरिक्ष युद्धासाठी स्पेस फोर्स

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) २०१९ मध्ये लो अर्थ ऑर्बिटमधील उपग्रहाला जमिनीवरून मारा करणार्‍या क्षेपणास्त्राद्वारे ध्वस्त करून भारताने आपल्या अंतरिक्ष युद्ध प्रणालीची मुहूर्तमेढ रोवली. आता यानंतरचे पाऊल म्हणजे स्पेस फोर्सची स्थापना करणे हेच असणार आहे. स्वतः ही निर्मिती करण्याऐवजी अमेरिकेच्या स्पेस फोर्स संकल्पनेत आवश्यक असे भारत अनुषंगीय बदल करून आपण ही कार्यप्रणाली राबवली पाहिजे. हे खर्चाचे आणि कालमान्य असेल. अमेरिकी राष्ट्रपती ... Read More »

निर्भयाच्या दोषींची फाशी लांबणीवर

निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील ४ दोषींना आज दि. १ फेब्रुवारी रोजी फाशी दिली जाणार नाही. पुढील आदेशापर्यंत त्या सर्व दोषींची ‘डेथ वॉरंटस्’ची कार्यवाही पुढे ढकलण्यात आली आहे. येथील न्यायालयाने काल हा निर्णय जाहीर केला. दोषींनी न्यायालयात शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. दरम्यान, दोषींची फाशी लांबणीवर पडली असली तरी आपली लढाई चालूच राहील असे निर्भयाच्या आईने ... Read More »

गोव्यातील ‘त्या’ विदेशीला कोरोना संसर्ग नाही ः गोमेकॉ

चीनमधून आलेल्या व कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आलेल्या ‘त्या’ विदेशी इसमाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे, असे काल गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. या विदेशी नागरिकाच्या लाळेचा नमुन्याचा पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेला अहवाल हाती आला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या २८ जानेवारी रोजी सदर ... Read More »

आर्थिक सर्वेक्षण अहवालात ६ ते ६.५% जीडीपीचा अंदाज

देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल काल संसदेत मांडण्यात आला असून त्यात अर्थ व्यवस्थेविषयी तपशीलवार आकडेवारी देण्यात आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचा वार्षिक विकासाचा दर (जीडीपी) ६ ते ६.५ टक्के राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर ५ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. पुढील वर्षी तो ६ ते ६.५ टक्के होण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षण ... Read More »

सीएएमुळे गांधीजींची इच्छापूर्ती ः राष्ट्रपती

>> संसदेत अभिभाषणावेळी विरोधकांचा आक्षेप संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने प्रारंभ झाला. यावेळी कोविंद यांनी मोदी सरकारने नुकत्याच संमत केलेल्या सिटिझन्स अमेंडमेंट ऍक्ट (सीएए) या कायद्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींची इच्छापूर्ती झाल्याचे आपल्या भाषणात नमूद केले. यावेळी विरोधकांनी आक्षेप घेत गदारोळ केला. सीएए हा कायदा एक ऐतिहासिक कायदा असल्याचे कोविंद यांनी सांगितले. यावेळी काही विरोधी सदस्यांनी ‘शेम ... Read More »

एस्मा कायदा दुरुस्तीला आयटकचा विरोध ः फोन्सेका

राज्य सरकारच्या प्रस्तावित एस्मा कायद्यातील दुरुस्ती कामगार विरोधी आहे. सरकार एस्मा कायद्यात दुरुस्ती करून कामगार वर्गाचा आवाज दडपू पाहत आहे, असा आरोप कामगार नेते ख्रिस्तोफोर फोन्सेका यांनी पत्रकार परिषदेत काल केला. राज्य सरकारने आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात एस्मा कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एस्मा कायद्यातील दुरुस्तीला मान्यता देण्यात आलेली आहे. एस्माच्या दुरुस्तीमध्ये दोषी आढळून येणार्‍या व्यक्तीच्या शिक्षेमध्ये ... Read More »

विधानसभा संकुल परिसरात जमावबंदी आदेश जारी

उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने गोवा विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर पर्वरी विधानसभा सचिवालयाच्या ५०० मीटर परिसर आणि पणजी पोलीस स्टेशन क्षेत्रात जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. हा जमावबंदीचा आदेश सोमवार ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासून लागू होणार असून विधानसभा अधिवेशन काळापर्यंत लागू राहणार आहे. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. Read More »

म्हापसा अर्बनच्या चौकशीसाठी आज म्हापशात धरणे

म्हापसा अर्बन बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करा ही मागणी धसास लावण्यासाठी बँकेच्या ठेवीदारांतर्फे सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. म्हापसा येथील बँकेच्या मुख्य कार्यालयापुढे दोन तास धरणे धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेचे खातेदार तसेच ठेवीदारांनी या धरण्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. म्हापसा अर्बन बँकेच्या कारभारावर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यास आता पाच वर्षे होत आली आहेत. ... Read More »

जमियातील शूटरला १४ दिवस प्रोटेक्टिव्ह कोठडीचा आदेश

येथील जमिया मिलिया विद्यापीठाबाहेर सीएए विरोधी मोर्चेकर्‍यांवर गुरुवारी पिस्तुलाने गोळीबार केलेल्या ‘त्या’ कथित अल्पवयीनाला काल न्यायालयाने १४ दिवसांची प्रोटेक्टिव्ह कोठडी सुनावली. अल्पवयींनासाठी असलेल्या ज्युवेनाईल जस्टिस बोर्डने वरील आदेश दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला काल दु. १२ वा. वरील बोर्डसमोर उभे करण्यात आले अशी माहिती दिल्लीचे पोलीस उपायुक्त (क्राईम) राजेश देव यांनी सांगितले. आरोपीच्या वयाची निश्‍चिती करण्यासाठी बोन ऑसिफिकेशन चाचणी करण्यासंदर्भात वैद्यकीय ... Read More »