ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 24, 2020

सुदृढ लोकशाहीसाठी

संसद अथवा विधिमंडळ आणि न्यायपालिका ही भारतीय लोकशाहीची दोन स्वतंत्र, सन्माननीय अंगे आहेत आणि त्यांनी एकमेकांच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू नये असा सर्वसाधारण संकेत आहे. मात्र, अलीकडच्या काळात अशा हस्तक्षेपाची गरज सतत निर्माण होताना दिसते आहे आणि देशातील राजकारणाचा घसरता दर्जा हेच त्याचे प्रमुख कारण आहे. कोणत्याही पदावरील व्यक्तीने त्या पदाचा सन्मान राखणे, त्यासाठी निःस्पृहता, निष्पक्षता, सारासार विवेक आदी मूल्यांचे पालन ... Read More »

गोव्याला पर्यटन धोरण अत्यावश्यक

शंभू भाऊ बांदेकर आपला गोवा पोर्तुगिजांच्या हुकूमशाही जोखडातून मुक्त झाला व गोव्याला विचारस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याबरोबर स्वैराचाराचे स्वातंत्र्य तर मिळाले नाही ना, असा प्रश्‍न मनात उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पोर्तुगीज अमदानीत पोलीसांवर हात उगारणे तर सोडाच, पण पोर्तुगीज नव्हे तर स्थानिक पोलिसांनी देखील डोळे वटारले तर लोकांना जरब बसायची. राज्याचे पर्यटन धोरण निश्‍चित करताना पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, संस्था व नागरिकांच्या ... Read More »

वित्त आयोगाकडे आर्थिक पॅकेजची मागणी

>> राजकीय पक्षांनी घेतली भेट; खाण, पर्यटनासाठी मदतीची विनंती राज्यात दोन दिवसाच्या दौर्‍यावर आलेल्या १५ व्या वित्त आयोगाकडे राज्यातील प्रमुख भाजप, कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड या प्रमुख राजकीय पक्षांनी खाण बंदी, पर्यटन घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याला खास आर्थिक पॅकेज आणि विकास प्रकल्पाच्या कामांसाठी भरीव निधी देण्याची विनंती निवेदनाद्वारे काल केली. एन. के. सिंग यांच्या अध्यक्षतेखालील १५ वा वित्त आयोगाचा दोन दिवसीय गोवा ... Read More »

विल्सन गुदिन्होचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

>> प्रकाश नाईक मृत्युप्रकरण मेरशी येथील माजी सरपंच प्रकाश नाईक यांच्या अनैसर्गिक मृत्युप्रकरणातील एक संशयित आरोपी विल्सन गुदिन्हो याचा अटकपूर्व जामीन अर्ज उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने काल फेटाळला. त्यामुळे जुना गोवा पोलिसांना संशयित विल्सन याला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जुना गोवा पोलिसांनी मयत प्रकाश नाईक यांच्या अनैसर्गिक मृत्युप्रकरणी मंत्री मावीन गुदिन्हो यांचे बंधू विल्सन गुदिन्हो आणि ... Read More »

६ जैव संवेदनशील विभाग गोव्यासाठी अधिसूचित

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने गोव्यातील सहा जैव-संवेदनशील विभाग अधिसूचित केले आहे. त्यात भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय पार्क, म्हादई वन्यजीव अभयारण्य, नेत्रावळी वन्यजीव अभयारण्य, खोतीगाव वन्यजीव अभयारण्य, बोंडला वन्यजीव अभयारण्य आणि डॉ. सलिम अली पक्षी अभयारण्याचा समावेश आहे. या जैव संवेदनशील विभागात हाती घेतल्या जाऊ शकणार्‍या उपक्रमाबाबत माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. या अधिसूचनेच्या कार्यवाहीवर ... Read More »

नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी होणार असलेला गोव्याचा चित्ररथ. Read More »

मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची घेतली अर्थसंकल्पपूर्व बैठक

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याची अर्थसंकल्पपूर्व खास बैठक काल घेतली. या बैठकीला मुख्य सचिव परिमल राय, सचिव, आयएएस, आयपीएस, आयएङ्गएस आणि राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून आगामी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या ६ फेब्रुवारी २०२० रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून मिळाली आहे. आगामी वर्ष २०२० – २०२१ या ... Read More »

जिल्हा पंचायत निवडणूक कॉंग्रेस स्वबळावर लढणार

कॉंग्रेस पक्षाने दोन्ही जिल्हा पंचायतींच्या ४० जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १० जागांसाठी समविचारी पक्षांना पाठिंबा देणार आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीतील महिला, ओबीसी, एसटी प्रभागाच्या राखवितेमध्ये पारदर्शकता ठेवावी, अशी मागणी चोडणकर यांनी यावेळी केली. सत्ताधारी गटाकडून निवडणुकीच्या वेळी विरोधकांची कोंडी करण्यासाठी प्रभाग राखविता ... Read More »

विधानसभा अंदाजपत्रक समितीची अध्यक्ष सरदेसाईंनी घेतली बैठक

गोवा विधानसभेच्या अंदाजपत्रक समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल घेतली. आर्थिक वर्ष २०१९-२० मधील विविध खात्यांना मंजूर निधी आणि खर्च केलेल्या निधी, प्रलंबित निधी याबाबत सविस्तर माहिती येत्या ५ फेब्रुवारी रोजी आयोजित बैठकीत सादर करण्याची सूचना संबंधित अधिकार्‍यांना करण्यात आली आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष सरदेसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. गोवा विधानसभेची पोस्ट बजेट पुनरावलोकनासंबंधी ... Read More »

सीएएला मनसेचा पाठिंबा ः राज ठाकरे

>> मनसेचा मुंबईत महामेळावा नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीलाही आपला पूर्ण पाठिंबा आहे असे सांगत मुंबई येथे झालेल्या मनसेच्या महामेळाव्यात राज ठाकरेंनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोर मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही केली. यावेळी राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांची मनसेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, यावेळी मनसेच्या झेंड्यातही बदल करण्यात आला ... Read More »