ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 23, 2020

निव्वळ शिफारस

ज्यांच्या कार्यकाळात आपली गोव्याच्या लोकायुक्तपदी नियुक्ती झाली, त्या माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर, तसेच तत्कालीन खाण सचिव व खाण संचालकांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदवावा व सरकारने खाण लीज नूतनीकरण प्रकरण सीबीआयकडे द्यावे अशी शिफारस गोव्याचे लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी गोवा फाऊंडेशनने दाखल केलेल्या तक्रारीवरील आपल्या निवाड्यात केली आहे. गोव्याचे लोकायुक्त पद हे मुळातच दात नसलेल्या कागदी वाघासारखे आहे. ... Read More »

चीनच्या धोक्याचे वर्ष!

शैलेंद्र देवळणकर चीनच्या सार्वभौमत्त्वासाठी एक इंचही जमीन कुणाला देणार नाही, अशी गर्जना शी जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदी दुसर्‍यांदा निवड झाल्यानंतर केली होती. त्यामुळे आर्थिक आघाडीवर सध्या मरगळ आल्यामुळे चीन मवाळ भूमिका घेईल अशा भ्रमात कोणीही राहता कामा नये. उलट २०२० हे वर्ष भारतासाठी चीनकडून धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. जपान, इंडोनेशियाप्रमाणे चीन भारतालाही लक्ष्य करण्याची शक्यता आहे. २०२० हे वर्ष भारत – ... Read More »

खाण लीजप्रकरणी विचाराअंती निर्णय ः मुख्यमंत्री

गोव्यातील ८८ खाणींच्या लीज नूतनीकरण प्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व दोघा अधिकार्‍यांवर गोवा सरकारच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने एफआयआर नोंद करावा, अशी शिफारस लोकायुक्तांनी केलेली असली तरी अजून एफआयआर नोंद करण्यात आलेला नाही. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एफआयआर नोंद करावा की नाही याचा निर्णय अभ्यासांती घेण्यात येणार असल्याचे काल स्पष्ट केले. पूर्ण विचारांती आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, ... Read More »

मुख्यमंत्री सावंत यांचे खाण व्यवसायाला प्राधान्य ः लोबो

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे या घडीला राज्यातील बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्याला प्राधान्य असल्याची माहिती काल बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलताना दिली. खाणी सुरू होण्यास अजून थोडा विलंब होऊ शकतो. त्यामुळे यापूर्वीच ज्या खनिजाचे उत्खनन झालेले आहे त्याची तसेच डम्पची विक्री सुरू करू दिली जावी यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलेला आहे. न्यायालयाने ... Read More »

१५ वा वित्त आयोग आज गोवा भेटीवर

१५ वे वित्त आयोग आज गुरुवार दि. २३ आणि उद्या शुक्रवार दि. २४ जानेवारीला गोव्याला भेट देऊन राज्य सरकार, वरिष्ठ अधिकारी आणि व्यापार, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांच्यासमवेत आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी येणार आहेत. वित्त आयोग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करणार आहे. तसेच मंत्री, आमदार तसेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधींशी चर्चा ... Read More »

अपात्रता याचिकांसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सूचना स्वागतार्ह

>> सभापती राजेश पाटणेकर यांची प्रतिक्रिया >> येत्या अधिवेशनात ८१४ प्रश्‍न आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा सभापतींकडून काढून घेऊन त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची जी सूचना सर्वोच्च न्यायालयाने संसदेला केलेली आहे, तिचे आपण स्वागत करीत आहोत, अशी प्रतिक्रिया गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांनी काल व्यक्त केली. खरोखरच संसदेने तसा निर्णय घेतला, तर विधानसभा सभापतींवर आमदारांच्या अपात्रता याचिकांच्या हाताळणीवरून ... Read More »

मंत्री पाऊसकर खंडणीप्रकरणी मुख्य संशयिताचा शोध सुरू

येथील पणजी पोलिसांकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांच्याकडून तीन कोटी रुपयांची खंडणी वसुलीच्या प्रयत्न प्रकरणी मंत्री पाऊसकर यांना खंडणीसाठी फोन कॉल्स केलेल्या व्यक्तीची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. संशयिताकडून मंत्र्याला फोन कॉल करणार्‍या व्यक्तीची माहिती मिळालेली नाही. केवळ त्याचा फोन नंबर मिळालेला आहे. गोव्यातील मंत्र्याकडून दिला जाणारा ऐवज घेऊन येण्याची सूचना कॉल करणार्‍या व्यक्तीने केली. एवढीच माहिती अटक ... Read More »

विल्सन गुदिन्होच्या जामीन अर्जावर आज निवाडा

मेरशी येथील माजी सरपंच प्रकाश नाईक यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणातील एक संशयित आरोपी विल्सन गुदिन्हो याच्या अटकपूर्व जामिनावर उत्तर गोवा जिल्हा न्यायालय गुरूवारी निवाडा देणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील दुसरा संशयित ताहीर याचा शोध घेण्यास पोलिसांना यश प्राप्त झाले नाही. जुने गोवा पोलिसांनी मयत प्रकाश नाईक यांच्या मृत्युप्रकरणी मंत्री मावीन गुदिन्हो यांचे बंधू विल्सन गुदिन्हो आणि ताहीर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त ... Read More »

धिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप आमदारांची बैठक

>> अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ फेब्रुवारीपासून गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असले तरी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे नेमक्या कुठल्या दिवशी राज्य विधानसभेत आपले अंदाजपत्रक सादर करतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे काल सूत्रांनी स्पष्ट केले. राज्य विधानसभा अधिवेश ३ फेब्रुवारी रोजी सुरु होणार असून ते ७ फेब्रुवारीपर्यंत चालू राहणार आहे. दरम्यान, आगामी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ... Read More »

म्हादईचे वळवलेले पाणी गोव्यात आणल्यास राजकीय संन्यास

>> सुदिन ढवळीकरांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान म्हादईचे गोव्यातील अस्तित्त्व टिकवून ठेवण्यासाठी कर्नाटक आणि केंद्र सरकारने जर न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून म्हादई ही गोव्याची आहे, असे गोवा सरकारला लेखी दिले आणि कर्नाटक सरकारला दिलेले परवाने रद्दबातल करताना कर्नाटकने आतापर्यंत वळवलेले सत्तावीस टक्के पाणी पुन्हा गोव्याकडे वळते केले, तर आपण राजकीय संन्यास घेईन, असे माजी उपमुख्यमंत्री तथा मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ... Read More »