ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 22, 2020

दिल्लीचा सामना

राजधानी दिल्ली सध्या थंडीने गारठलेली जरी असली, तरी येत्या आठ फेब्रुवारीला होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीची हवा मात्र तापत चालली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परवा दिमाखदार रोड शो केला, मात्र, उशीर झाल्याने त्या दिवशी ते आपला उमेदवारी अर्ज मात्र भरू शकले नव्हते. काल शेवटच्या दिवशी तो दाखल करायला गेले असता त्यांची व्यवस्थित कोंडी ... Read More »

केंद्र व राज्यांतील संघर्ष घातक

ऍड. प्रदीप उमप केंद्रीय कायद्यांवरून केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये संघर्ष सुरू होणे भारतीय संघराज्याच्या चौकटीच्या दृष्टीने हितावह नाही. केरळ पाठोपाठ पंजाब सरकारनेही सीएए कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार देणारा ठराव विधानसभेत संमत केला. छत्तीसगड सरकारने एनआयए कायद्यालाही आव्हान दिले आहे. अशा संघर्षामधून मोठा घटनात्मक पेच आणि अराजक निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकता सुधारणा कायदा (सीएए) हा सध्या देशव्यापी चर्चेचा आणि संघर्षाचा ... Read More »

पार्सेकर व अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवा

>> खाण लीज नूतनीकरणप्रकरणी लोकायुक्तांची शिफारस गोव्यातील ८८ खनिज लीजांमध्ये लाखो डॉलर्सचा भ्रष्टाचार झालेला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व दोन वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता अत्यंत घाईगडबडीत नूतनीकरण केले असा ठपका ठेवत गोव्याचे लोकायुक्त जी. के. मिश्रा यांनी पार्सेकर यांच्याबरोबरच खाण संचालक प्रसन्न आचार्य व माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांची सीबीआयमार्फत चौकशी केली ... Read More »

गोळावलीतील मृत वाघाची नखे सापडली

गोळावली सत्तरी येथे मृत झालेल्या वाघाची नखे गायब करण्याचा प्रकार घडला होता. ती वाघाची नखे काल मंगळवारी गोळावली गावातील श्री सातेरी केळबाय मंदिरात सापडली. देवस्थानचे पुजारी देवगो खोत हे सकाळी साडेनऊच्या सुमाराम जेव्हा पूजा करण्यासाठी मंदिरात आले तेव्हा त्यांना मंदिरात प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी संशयास्पद दिसले. त्याची माहिती त्यांनी वनाधिकार्‍यांना दिली. वनाधिकारी नंदकुमार परब यांच्या मार्गदर्शनाखाली वन पथकाने मंदिरात जाऊन पाहणी ... Read More »

काहीही झाले तरी सीएए मागे घेणार नाही ः शहा

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) काहीही झाले तरी मागे घेतला जाणार नाही. हा कायदा कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाच्या विरोधात नाही. त्यामुळे केवळ मुसलमानच नव्हे तर कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लखनौ येथे केले. ‘सीएए’च्या समर्थनार्थ लखनौ येथे घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. यावेळी सीएएवरून होणार्‍या हिंसाचाराला विरोधी पक्षांना जबाबदार धरले. यावेळी ... Read More »

नदालची दुसर्‍या फेरीत धडक

स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदाल तसेच महिला एकेरीतील द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत काल मंगळवारी विजयी सलामी दिली. त्यांनी सरळ सेटमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा फडशा पाडला. नदालने जागतिक क्रमवारीत ७३व्या स्थानावरील बोलिवियाच्या ह्युगो डेलियन याचा ६-२, ६-३, ६-० असा पराभव केला. हा सामना दोन तास दोन मिनिटे चालला. दुसर्‍या फेरीत नदालचा सामना अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिस याच्याशी होणार ... Read More »

गोव्यावर पराभवाचे सावट

>> रणजी करंडक क्रिकेट बिपुल शर्माचे शतक रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात गोव्याचा संघ चंदीगडविरुद्ध पराभवाच्या छायेत आहे. गोव्याच्या पहिल्या डावातील २५१ धावांना उत्तर देताना चंदीगडने आपला पहिला डाव ७ बाद ५८० धावांवर काल मंगळवारी घोषित केला. दुसर्‍या डावात गोव्याची २ बाद ८७ अशी स्थिती झाली आहे. गोव्याचा संघ अजून २४२ धावांनी पिछाडीवर असून गोव्याचे केवळ ८ गडी बाकी आहेत. ... Read More »

सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट अंतिम फेरीत

सेंट जोसेफ इन्स्टिट्यूटने मदर ऑफ मर्सी इंग्लिश हायस्कूलवरील पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर १४ वर्षांखालील मुरगाव विभागीय प्रेझिडेंट्‌स कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. वास्कोच्या एमपीटी मैदानावर हा सामना खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना सेंट जोसेफने पहिल्या डावात ९६ षटकांत २२३ धावा केल्या. त्यांच्या करण नाईक (४८) व सुजय परमाईकर (४८) यांनी उपयुक्त योगदान दिले. मर्सीकडून कुणाल बार याने ६५ धावांत ... Read More »

टीम इंडियाचा जपानवर १० गड्यांनी विजय

विद्यमान विजेत्या भारताने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत काल मंगळवारी नवोदित जपानचा १० गडी व ४५.१ षटके राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या भारताने जपानचा २२.५ षटकांत ४१ धावांत फडशा पाडला. गुगली गोलंदाज रवी बिश्‍नोई याने ४ गडी बाद करत प्रभाव पाडला. कर्णधार प्रियम गर्ग याने वापरलेल्या चारही गोलंदाजांनी गडी बाद करत विश्‍वास सार्थ ठरवला. जपानच्या एकाही फलंदाजाला ... Read More »