ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 21, 2020

नव्या नेतृत्वाखाली भाजप

भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत्प्रकाश नड्डा यांनी काल अमित शहा यांचा पदभार स्वीकारला. अमित शहांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्षाला मिळवून दिलेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्यासाठी आपल्या मापापेक्षा मोठ्या आकाराच्या बुटात पाय घालण्यासारखीच स्थिती आज आहे यात शंका नाही. अमित शहा आणि नरेंद्र मोदी ही जोडगोळी भारतीय जनता पक्षासाठी प्रचंड लाभदायक ठरली. केवळ निवडणुकांच्याच दृष्टीने नव्हे, तर ... Read More »

देशाचे नागरिक प्रजासत्ताकाचे संरक्षक

देवेश कु. कडकडे (डिचोली) कलंकित उमेदवारांस मतदार जोपर्यंत अद्दल घडवत नाही, तोपर्यंत सदृढ गणतंत्राची कल्पनाच करता येणार नाही, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असे उद्गार काढले होते की, जर संविधानाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यश लाभू शकले नाही, तर संविधान अपयशी ठरले असे न म्हणता ते राबवणार्‍या व्यक्ती अधम निघाले आहेत असेच म्हणावे लागेल. गणतंत्र दिनानिमित्त दरवर्षी आपल्याला गण आणि तंत्र यांच्या संबंधातील ... Read More »

थायरॉइड ग्रंथीची क्रिया बिघडते तेव्हा…

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय) लहान मुलांमध्ये कावीळ (त्वचा व डोळे पिवळे होणे), तोंडाला सुज येणे, वाढ खुंटणे, यौवन उशिरा येणे, हालचाल मंद व संथ असणे, मानसिक विकास उशिरा होणे आणि इतर त्रास होतात. प्रयोगशाळेतील अहवालामध्ये टीएसएच वाढ़लेले आणि टी३ टी४ ह्यांचे प्रमाण कमी झालेले आढ़ळेल. ‘थायरॉइड ग्लँड’ ह्यालाच कंठग्रंथी, गलग्रंथी, अवटुग्रंथी, अवटुकाग्रंथी असेही म्हणतात. थायरॉइड ही ... Read More »

सूर्यनमस्कार ः श्रेष्ठ व्यायामप्रकार

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) भारतीय संस्कृतीमध्ये उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे. आज अर्घ्य जरी देता आले नाही तरी सकाळच्या कोवळ्या उन्हात १५-२० मिनिटे बसणे शक्य आहे. सूर्यनमस्कार घालणे हा सूर्योपासनेचा महत्त्वाचा पैलू आहे, ज्यावर संपूर्ण स्वास्थ्य अवलंबून आहे. व्यायाम करायचा आहे, स्वस्थ राहायचे पण वेळ नाही… त्याला एकच उत्तर म्हणजे सूर्यनमस्कार. हा बारा योगांचा संच आहे, जो ... Read More »

कुष्ठ / महाकुष्ठ भाग – २

डॉ. स्वाती हे. अणवेकर, (म्हापसा ) प्रत्यक्ष कुष्ठ हा व्याधी शरीरात उत्पन्न होण्याअगोदर काही पूर्वलक्षणे शरीरामध्ये दिसतात- जसे घाम फार येणे अथवा मुळीच न येणे, त्वचा अगदी गुळगुळीत किवा फार खरखरीत होणे, त्वचेचा वर्ण बदलणे, आग होणे, खाज येणे, सुन्नपणा असणे…… आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या त्वचारोगांचे संबोधन ‘कुष्ठ’ ह्या नावाने केले जाते. इथे कुष्ठ अर्थात कोणताही त्वचा रोग होय. ह्या मध्ये ... Read More »

भाजपच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा

>> सर्वसहमतीने निवड, अमित शहांंनी सूत्रे सोपवली भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची सर्व सहमतीने निवड झाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंह यांनी ही घोषणा केली. अध्यक्षपदासाठी खुद्द अमित शहा यांनी नड्डा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्याला सहमती असल्याने ही निवड केवळ औपचारिकता होती. संघटन कुशल असलेले ... Read More »

विल्सन गुदिन्होच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

मेरशी येथील माजी सरपंच, पंच सदस्य प्रकाश नाईक यांच्या मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या विल्सन गुदिन्हो याने अटकपूर्व जामिनासाठी येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज काल सादर केला आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मंगळवार दि. २१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. माजी सरपंच प्रकाश याचा गेल्या शुक्रवार १७ जानेवारीला राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. प्रकाश याने मृत्यूपूर्वी व्हॉट्‌अप ग्रुपवर ... Read More »

माविन यांनी राजीनामा द्यावा ः सुदिन ढवळीकर

मेरशीचे माजी सरपंच, पंच सदस्य प्रकाश नाईक संशयास्पद मृत्यू प्रकरण हे आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचा संशय येत आहे. प्रकाश याचा जमीन माफियांनी बळी घेतला आहे. या मृत्यू प्रकरणी वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो याचे बंधूचे विल्सन याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाच्या निःपक्षपाती तपासासाठी मंत्री गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री गुदिन्हो यांना ... Read More »

यशस्वी होण्यासाठी अपयशातून शिका

>> परीक्षा पे चर्चामध्ये पंतप्रधानांचा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर अपयशातून शिका असा सल्ला दिला आहे. नरेंद्र मोदी यांनी आगामी परीक्षांच्या निमित्ताने काल विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संघाचा माजी गोलंदाज अनिल कुंबळे याने वेस्ट इंडिजविरोधातील सामन्यात जखमी असूनही केलेली खेळी आणि राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मणने ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी ... Read More »

ओपा-खांडेपार येथे २६ रोजी मगोचे म्हादई बचाव आंदोलन

मगो पक्षातर्फे येत्या २६ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.३० वा. ओपा-खांडेपार येथे म्हादई आणि मांडवीच्या संगमावर म्हादई बचाव जागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केले. मगो पक्षाच्या म्हादई बचाव जागृती अभियानाचा शुभारंभ रविवारी सत्तरी तालुक्यातील उस्ते येथे ... Read More »