ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 20, 2020

गरज ‘सबुरी’ची

सबका मालिक एक है असे सांगणार्‍या श्रीसाईबाबांच्या पाथरी या जन्मभूमीला महाराष्ट्र सरकारने शंभर कोटी रुपये दिल्याने शिर्डीवासीयांनी निर्माण केलेला वाद दुर्दैवी आहे. श्रद्धा आणि सबुरी या साईंनीच दिलेल्या मंत्राचा त्यांच्या भक्तमंडळीला विसर तर पडलेला नाही ना असा प्रश्‍न त्यामुळे पडतो. साईबाबांचे तीर्थक्षेत्र म्हणून आजवर शिर्डीची कीर्ती देश विदेशांत पोहोचली असली, तरी साईबाबा हे मूळचे शिर्डीचे नव्हेत हे तर सर्वज्ञात आहे. ... Read More »

मुद्देविहीन राजकारणाचा धुडगूस

ल. त्र्यं. जोशी आपले भाग्य एवढेच की, दुष्प्रवृत्तीचा नाश करण्याची अंगभूत व्यवस्था आपल्या भारतीय समाजात आहे. अंतिम विजय सत्याचाच होतो, यावर लोकांचा विश्वास आहे आणि तोच एक आशेचा तेजस्वी किरण आहे. आपण जणू त्याचीच परीक्षा पाहत आहोत. गेल्या काही वर्षांपासून देशातील राजकारणाचा तयार केला जाणारा नॅरेटीव्ह जर काळजीपूर्वक तपासला तर येथे केवळ मुद्देविहीन राजकारणाचा धुडगूस सुरु असल्याचे स्पष्टपणे दिसते. सांसदीय ... Read More »

विल्सन, ताहीरविरोधात गुन्हा दाखल

>> प्रकाश नाईक मृत्युप्रकरणी पोलिसांची कारवाई जुना गोवा पोलिसांनी मेरशी पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य प्रकाश नाईक मृत्युप्रकरणी विल्सन गुदिन्हो आणि ताहीर या दोघांच्याविरोधात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल केला. जुना गोवा पोलीस स्थानकावर प्रकाश नाईक यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने विल्सन आणि ताहीर यांच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ... Read More »

माविननी राजीनामा द्यावा : कॉंग्रेस

मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांना संशयास्पदरित्या आलेल्या मृत्युप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मंत्री माविन गुदिन्हो यांचे बंधू व्हिल्सन गुदिन्हो यांच्याविषयी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे मंत्री गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली. प्रकाश नाईक यांच्या मृत्यू प्रकरणाची निःष्पक्षपणे चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी माविन गुदिन्हो यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणे हेच योग्य ठरणार असल्याचे ... Read More »

म्हादईप्रश्‍नी संयुक्त पहाणी करण्यावर गोव्याचा भर

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक सरकारकडून कळसा येथे करण्यात येणार्‍या प्रकल्पाच्या बांधकामाची संयुक्त पाहणी करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांनी दिली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्‍नी अवमान याचिका दाखल केलेली आहे. तसेच बाराजण येथील वझराच्या कमी झालेल्या प्रवाहाची पाहणी करून सर्वोच्च न्यायालयात आणखीन एक अर्ज सादर केला आहे. केंद्र सरकारने संयुक्त पाहणी केल्याशिवाय कर्नाटकला कळसा ... Read More »

मगोपचे सत्तरीत म्हादई बचाव आंदोलन सुरू

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगोप) म्हादई बचाव आंदोलनाला सत्तरी तालुक्यातील साट्रे भागातून काल प्रारंभ करण्यात आला. या म्हादई बचाव आंदोलनानिमित्त म्हादईचे पूजन करण्यात आले. या म्हादई बचाव आंदोलनाच्या माध्यमातून गावा गावातून जनजागृती केली जाणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी आमदार नरेश सावळ, मगोपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतरांची उपस्थिती होती. जानेवारी महिन्यात म्हादईच्या ... Read More »

नागरिकत्व कायदा सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक ः सिब्बल

संसदेत मंजुरी मिळाल्यामुळे नागरिकत्व संशोधन कायदा हा सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक आहे. हा कायदा कुठलेच राज्यलागू करणार नाही असे म्हणू शकत नसल्याचे अत्यंत महत्त्वाचे विधान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केले आहे. कपिल सिब्बल यांच्या या विधानाचा कॉंग्रेसवर परिणाम होण्याची शक्यता असून त्यामुळे कॉंग्रेस पक्षासह विरोधकही बॅकफुटवर जाण्याची शक्यता आहे. केरळ लिटरेचर फेस्टिव्हल ... Read More »

म्हापशातील अपघातात तरुणाचा मृत्यू

घाटेश्‍वरनगर म्हापसा येथील उतरणीवर झालेल्या अपघातात म्हापशातील सनद रमेश मोरजकर (२०) या एकतानगर येथे रहाणार्‍या युवकाचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनद हा आसगाव येथील डीएमसी महाविद्यालयाकडून दुचाकीवरून उतरणीवरून जात असताना त्याचा तोल गेला. त्यामुळे दुचाकीसह त्याने बाजूल्या कुंपणाला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. त्यानंतर त्याला बांबोळी येथे गोमेकात नेले. ... Read More »

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर शिर्डीतील बेमुदत बंद मागे

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादातून पुकारण्यात आलेला बेमुदत शिर्डी बंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेचेआश्‍वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आला. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सोमवारी मुंबईत शिर्डी व पाथरीकरांची बैठक बोलावली आहे. परभणीतील पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. त्याला आव्हान देत शिर्डीकरांनी काल रविवारपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. ... Read More »

रेल्वे दुपदरीकरणास कासावलीवासीयांचा विरोध

>> अधिकार्‍यांची पहाणी, सरकारने नकार दिल्यास प्रकल्प दुसरीकडे नेण्याची तयारी कासावलीतील नागरिकांनी घरे पाडण्यात येणार असल्यामुळे रेल्वे दुपदरीकरणास विरोध दर्शवला. त्यामुळे काल पहाणी करण्यासाठी आलेले दक्षिण पश्‍चम रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी, स्थानिकांना जर दुपदरी रेल्वेमार्ग नको असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्याने आम्ही दुपदरीकरणाचे काम हाती घेत आहोत, जर उद्या राज्य सरकारला दुपदरी ... Read More »