ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 18, 2020

मोपा हवाच

मोपा विमानतळाच्या कामामध्ये सतत आडकाठी आणणार्‍या विघ्नसंतोषी लोकांच्या प्रयत्नांना सध्या सर्वोच्च न्यायालयाने या विमानतळाच्या बांधकामाला सशर्त का होईना, परंतु अनुमती दिल्याने तूर्त लगाम बसला आहे. गेली जवळजवळ वीस वर्षे मोपा विमानतळाचा नियोजित प्रकल्प या ना त्या कारणाने रोखण्यासाठी काही विशिष्ट घटक सातत्याने प्रयत्न करीत आले. दाबोळी विमानतळ अपुरा पडत असल्याचे आणि पर्यायी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गोव्याला किती निकड आहे हे स्पष्ट ... Read More »

विस्मरणात गेलेली चकमक

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सकाळी अंदाजे साडे सात वाजता चिनी पोस्टच्या उत्तरेला तैनात चिनी लाईट मशीनगननी नाथू ला वर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. नाथू ला पोस्ट अगदी खुली असल्याने आणि अशा प्रकारच्या चिनी उत्तराची अपेक्षा नसलेल्या, खुल्यात वावरणार्‍या ७२ भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली. यानंतर नाथू ला जवळच असलेल्या चो ला मध्येही तेथे तैनात असलेल्या गोरखा युनिटची चीनशी चकमक झाली. ... Read More »

वाघ मृत्यूप्रकरणी संशयितांची सशर्त जामीनावर सुटका

गोळावली-सत्तरी येथील चार वाघांच्या मृत्यूप्रकरणी अटक झालेल्या चार संशयितांची काल येथील सत्र न्यायालयाने सशर्त जामीनावर सुटका केली. या प्रकरणी अटक झालेले गोळावली येथील मालो पावणे, विठो पावणे, ज्योतिबा पावणे व भिरो पावणे यांना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. काल याप्रकरणी सुनावणी झाली. संशयितांतर्फे यावेळी ऍड. यशवंत गावस यांनी बाजू मांडली. संशयितांना प्रत्येकी १५ हजार रु. च्या वैयक्तिक जामिनावर सोडण्यात ... Read More »

महात्मा गांधींचे स्थान ‘भारत रत्न’पेक्षाही श्रेष्ठ

>> सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘भारत रत्न’ पुरस्कार देण्यात यावा यासाठी मागणी करणारी एक जनहीत याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली न्या. बी. आर. गवई व न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर यावरील सुनावणी झाली. ‘महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत आणि नागरिकांच्या हृदयात त्यांचे स्थान उच्च असे आहे. त्यासाठी त्यांना औपचारिक पुरस्कार देण्याची गरज ... Read More »

पंच आत्महत्या ः सखोल चौकशीची मागणी

मेरशी पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच प्रकाश नाईक यांनी केलेल्या आत्महत्येची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पार्टीने केली आहे. प्रकाश नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी वॉट्‌स ऍप ग्रुपसह विविध मित्रांना मेसेजेस पाठवून विल्सन गुदिन्हो व ताहीर या व्यक्ती आपली सतावणूक करीत असल्याचे म्हटले होते. तसा संदेश त्यांनी आपल्या बहिणीलाही पाठवला होता, असे सांगून या प्रकरणाचा सखोल तपास ... Read More »

मेरशीचे पंच प्रकाश नाईक यांचा संशयास्पद मृत्यू

मेरशीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य प्रकाश नाईक काल सकाळी त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. प्रकाश नाईक याच्या अंगावर बंदुकीच्या गोळीच्या जखमा आढळून आलेल्या आहेत. पोलिसांकडून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रकाश नाईक यानी मृत्यूपूर्वी आपल्या व्हॉट्‌अप ग्रुपवरील मित्रांना एक संदेश पाठविला आहे. त्यात दोघा व्यक्तींकडून होणारी सतावणूक सहन न ... Read More »

निर्भयाचे आरोपी आता १ फेब्रुवारीस फासावर

निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील सर्व चारही आरोपींना आता २२ जानेवारी ऐवजी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वा. फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीतील न्यायालयाने काल त्यांची डेथ वॉरंटस काल नव्याने जारी केली. दरम्यान, राष्ट्रपती कोविंद यांनी आरोपी मुकेश याचा दया अर्ज फेटाळला. या प्रकरणातील मुकेश कुमार सिंग या आरोपीने आपली फाशीची शिक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी एक याचिका येथील अतिरिक्त ... Read More »

पणजीतील पे पार्किंगची कार्यवाही लांबणीवर पडणे शक्य

पणजी महानगरपालिकेच्या पे पार्किंग निविदेतील बोली रकमेच्या ५० टक्के रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा करण्याच्या अटीमुळे पे पार्किंगच्या कार्यवाहीमध्ये तूर्त अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पे पार्किंगसाठी ठेकेदाराने दीड कोटी रुपयांची बोली लावलेली आहे. त्याला ५० लाख रुपयांची सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या पार्श्‍वभूमीवर निविदेबाबत अंतिम निर्णय घेण्याचा ... Read More »

व्यापार्‍यांशी करारपत्र काम प्रलंबित राहिल्याने मनपा बैठकीत नाराजी

पणजी महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या काल घेण्यात आलेल्या बैठकीत नवीन मार्केटमधील व्यापार्‍यांसोबत करारपत्र करण्याचे काम लांबणीवर टाकण्यात येत असल्याने तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली. मार्केटमधील व्यापार्‍यांशी करारपत्रे करण्याचे आश्‍वासन दिले जाते. तथापि करारपत्र निश्‍चित केल्यानंतर पुन्हा त्यात बदल करणे अयोग्य असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. या पार्श्‍वभूमीवर मार्केटच्या विषयावर चर्चा करण्यासाठी येत्या ५ फेब्रुवारीला खास बैठक घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. मार्केटमधील ... Read More »

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात

>> धवन, कोहली, राहुलची अर्धशतके; मालिकेत १-१ बरोबरी लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शमीसह गोलंदाजांच्या सूत्रबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने दुसर्‍या वनडेत ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव करीत ३ लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. भारताकडून मिळालेल्या ३४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला सर्व गड्यांच्या मोबदल्यात ३०४ धावांपर्यंत मजल मारता आली. स्टीव्ह स्मिथने एकतर्फी झुंज देताना ... Read More »