ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 17, 2020

संघर्ष नव्हे, सहकार्य!

राज्यातील पंचायतक्षेत्रांमधील २०० मीटरपेक्षा अधिक जागेतील अथवा चार सदनिकांपेक्षा अधिक क्षमतेच्या गृहप्रकल्पांसाठी बांधकाम परवाने आणि वास्तव्य दाखला देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींकडून काढून घेऊन गटविकास अधिकारी, पंचायत संचालक आणि शेवटी सरकार म्हणजेच पर्यायाने स्वतःकडे घेण्याचा पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांचा प्रयत्न सर्व थरांतून झालेल्या विरोधामुळे फसला आणि अल्पावधीत हे वादग्रस्त परिपत्रक मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली. आपण केवळ पंचायतींना कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूक करण्यासाठीच ... Read More »

व्याघ्र हत्येची चौकशी निःपक्षपातीपणे व्हावी

शंभू भाऊ बांदेकर व्याघ्रहत्येची चौकशी शीघ्रगतीने तर कराच, पण त्याचबरोबर ती चौकशी निःपक्षपातपणे होणे फार महत्त्वाचे आहे. या गोव्यातील एकूणच प्रकरणाचे सारे पडसाद देशभर पसरणार आहेत, याची दक्षता घेणे आवश्यक होऊन बसले आहे. सध्या गोवा सरकार बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू करणे व सर्वपक्षीय ‘म्हादई बचाव’ आंदोलनाला योग्य वळण देऊन कर्नाटकपासून म्हादईचा बचाव करणे या दोन समस्यांमध्ये व्यग्र असतानाच ... Read More »

मोप विमानतळ बांधकामाचा मार्ग मोकळा

>> प्रकल्पाच्या ईसी निलंबनाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून मागे सर्वोच्च न्यायालयाने काल मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकरणी निवाडा देताना या प्रकल्पासाठीचा पर्यावरणविषयक दाखला (ईसी) निलंबित करण्याचा आपला निर्णय काल मागे घेतला. त्यामुळे मोप येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे बंद पडलेले बांधकाम नव्याने सुरू करण्यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्याचे ... Read More »

जि. पं. निवडणूक म. गो. स्वबळावर लढणार

मगो पक्षाच्या काल पणजीत झालेल्या केंद्रीय समिती व कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हा पंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच पक्षाची घटना अत्यंत जुनी असल्याने नवी घटना तयार करण्याचा तसेच ३० मार्चनंतर पक्षाची नवी केंद्रीय समिती निवडण्याचाही ठराव संमत करण्यात आल्याचे पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. विविध धर्म व जातींच्या लोकांना पक्षात सहभागी करून घेता यावे यासाठी ... Read More »

जि. पं. निवडणुका १५ मार्च रोजी

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० जागांसाठी येत्या १५ मार्च २०२० रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिसूचना पंचायत सचिव संजय गिहीर (आयएएस) यांनी काल जारी केली. गोवा राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही पंचायतीच्या प्रत्येकी २५ जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. ही निवडणूक पक्षीय पातळीवर घेतली ... Read More »

खनिज डंपविषयक सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण

सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील खाण बंदीपूर्वी उत्खनन करून खाण क्षेत्र आणि खाण क्षेत्राबाहेर साठवून ठेवलेल्या खनिज मालाच्या वाहतुकीसंदर्भातील एका याचिकेवरील निवाडा काल राखून ठेवला आहे. याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १६ मार्च २०१८ पासून खाणबंदी लागू केली होती. त्यापूर्वी म्हणजेच १५ मार्च २०१८ पूर्वी उत्खनन करून काढलेले खनिज आणि खाण क्षेत्राबाहेर साठवून ठेवलेल्या खनिज मालाच्या वाहतुकीबाबतच्या खाण मालकांच्या याचिकेवरील ... Read More »

सोशल मिडियावरील ‘ती’ जाहिरात बनावट ः वन खाते

वन खात्यात वनरक्षकांच्या ५४३ पदांच्या भरतीबाबत सोशल मिडियावर फिरणारी जाहिरात बनावट आहे, असे वन खात्याने जाहीर केले आहे. वनखात्यामध्ये वनरक्षकांच्या भरतीबाबत एक जाहिरात सोशल मिडियावर फिरत आहे. या जाहिरातीमध्ये वन खात्यात नवीन ५४३ वनरक्षकांची भरतीसाठी अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये वनरक्षकांचे वेतन व इतर माहिती देण्यात आलेली आहे. वन खात्याने वनरक्षकांच्या भरतीबाबत कुठल्याही प्रकारची जाहिरात प्रसिद्ध केलेली ... Read More »

डीएसपी दविंदर सिंगचे पदक प्रशासनने घेतले परत

दहशतवाद्यांना मदत करीत असल्याच्या आरोपावरून अलिकडेच अटक करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीर पोलीस खात्यातील पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) दविंदर सिंग याला या आधी देण्यात आलेले शेर-ए-काश्मीर शौर्य पदक जम्मू-काश्मीर प्रशासनाने काढून घेतले आहे. या बाबतचा आदेश प्रदेशाचे प्रधान गृह सचिव काब्रा यांनी काल जारी केला. वरील आरोपामुळे अटक झाल्यानंतर सेवेतून निलंबित केलेल्या दविंदर सिंग याच्याकडून पोलीस खात्याला डाग लागल्याचे जम्मू-काश्मीर प्रशासनाने म्हटले आहे. ... Read More »

काश्मीरात प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट उधळला ः ५ अतिरेकी ताब्यात

जम्मू-काश्मीर पोलिसांनी काल जैश-ए-महंमदच्या ५ दहशतवाद्यांना अटक केली. येत्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान दहशतवादी कारवाया करण्याचा या दहशतवाद्यांचा इरदा होता असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांच्याजवळील मोठ्या प्रमाणातील दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांची नावे ऐजाझ अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारूरू गोजरी व नासिर अहमद मीर अशी आहेत. दरम्यान मध्य काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. के. बिर्डी ... Read More »

केंद्रीय करारातून धोनीला वगळले!

>> खलील अहमद, दिनेश कार्तिक व अंबाती रायडूलादेखील स्थान नाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी काल गुरुवारी जाहीर केली. या यादीत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह डावखुरा जलदगती गोलंदाज खलील अहमद, यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तसेच मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू या मागील केंद्रीय करारात स्थान असलेल्या खेळाडूंना बाहेरचा ... Read More »