ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: January 16, 2020

गद्दार

आपल्या देशात गद्दारांची कधीच कमी नव्हती. पोरसाच्या विरुद्ध अलेक्झांडरला मदत करणारा राजा अंभी असो, पृथ्वीराज चौहानाच्या विरुद्ध महंमद घोरीची मदत करणारा जयचंद असो, रायगडच्या पाडावात मोगलांना साह्य करणारा सूर्याजी पिसाळ असो, अथवा बंगालच्या सिराज उद दौला नबाबाच्या विरुद्ध ब्रिटिशांना मदत करणारा आणि त्यांच्या वसाहतवादाला भारतात पाय रोवू देणारा मीर जाफर असो, वेगवेगळ्या काळामध्ये अशा फितुरांनी आणि गद्दारांनी दगाबाजी केली आणि ... Read More »

इराण – अमेरिका तणाव का निवळला?

शैलेंद्र देवळणकर आखातातील भारतीयांकडून भारताला दरवर्षी ४० अब्ज डॉलर्स इतके परकीय चलन मिळते. पण संघर्ष किंवा अस्थिरतेच्या काळात यावरही परिणाम होतो. त्यामुळे आखातातील अस्थिरता भारतासाठी नेहमीच धोक्याची राहिली आहे. अमेरिका-इराणने सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे सध्या तरी युद्धाचा भडका उडण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. ही बाब भारताच्या पथ्यावर पडणारी आहे. दोन वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने २०१५ मध्ये इराणसोबत केलेल्या अणुकरारातून माघार घेण्याचा ... Read More »

कुंडईत ट्रकच्या धडकेत १ ठार

मानसवाडा-कुंडई येथे काल सकाळी सव्वा आठच्या सुमारास एका मालवाहू ट्रकला झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. मालवाहू ट्रक कुंडई मानसवाडा येथील उतरणीवरून खाली उतरत असताना रस्त्याच्या बाजूला गेल्याने दुकानांना आदळल्यामुळे परिसरातील दोन-तीन दुकानांचेही नुकसान झाले आहे. या घटनेची फोंडा पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती अशी की, एमएच-०९ सीयू-१९१९ या क्रमांकाचा मालवाहू ट्रक फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होता. ... Read More »

कांपाल स्टेडियमला पर्रीकरांचे नाव देण्याची मागणी

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी समविचारी नागरिकांसमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील निवासस्थानी भेट घेऊन कांपाल येथील इनडोअर स्टेडियम संकुलाला दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याची मागणी काल केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कांपाल स्टेडियमला पर्रीकर यांचे नाव देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती आमदार मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कांपाल येथे स्टेडियमच्या ... Read More »

दिल्लीतील बैठकीनंतर वाहन कायद्याविषयी गोव्यात प्रस्ताव

नवी दिल्ली येथे गुरुवार १६ जानेवारी २०२० रोजी राज्यांच्या वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबत विविध राज्यातील वाहतूक मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर राज्यात नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे, असे वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. केंद्र सरकारने वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्याच्या उद्देशाने नवीन मोटर वाहन कायद्यात दंडाच्या रक्कमेत ... Read More »

पंचायत खात्याचे वादग्रस्त परिपत्रक अखेर मागे

राज्यातील पंचायत क्षेत्रातील चारपेक्षा जास्त सदनिका, निवासी किंवा व्यावसायिक इमारत प्रकल्पाच्या बांधकाम परवाना आणि निवासी परवान्यासाठी थेट गटविकास अधिकार्‍याकडे अर्ज करण्याची सक्ती करणारे परिपत्रक वाढत्या विरोधामुळे अखेर मागे घेण्याची पाळी पंचायत खात्यावर आली आहे. विरोधी कॉंग्रेस पक्षाने पंचायत खात्याच्या या परिपत्रकामुळे पंचायतीच्या अधिकारावर गदा आणली जात असल्याची टिका केली होती. तसेच, राज्यातील काही पंचायतीचे सरपंच, पंच सदस्यांनी परिपत्रकाबाबत नापसंती व्यक्त ... Read More »

सर्व आघाड्यांवरील अपयशामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ः कॉंग्रेस

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार असंवेदनशील बनले आहे. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. कॉंग्रेस पक्षांकडून जनतेच्या हिताचे अनेक प्रश्‍न उपस्थित केले जातात. परंतु, सरकारकडून या प्रश्‍नांची दखल घेतली जात नाही. खाण बंदी, म्हादई, बेरोजगारी, पर्यटनाला उतरती कळा, आर्थिक घसरण व इतर विषयावर भाजप सरकार अपयशी ठरल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा प्रदेश ... Read More »

निर्भया प्रकरणातील दोषींना २२ रोजी फाशी होणार नाही

निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी आरोपींना येत्या २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार नाही. कारण या प्रकरणातील चार आरोपींपैकी एक असलेल्या मुकेश सिंग याने कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या डेथ वॉरंटला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या संदर्भात आरोपीच्या वकिलाने युक्तीवाद केला की, राष्ट्रपतींनी दया याचना अर्ज फेटाळल्यानंतरही त्याला नियमानुसार १४ दिवसांचा अवधी मिळतो. यामुळे ... Read More »

विधानसभेवर आदिवासी समाजाला चार जागांचे आरक्षण आवश्यक

>> आदिवासी कल्याण मंत्री गावडेंची माहिती गोवा विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील आदिवासी समाजासाठी कायद्यानुसार चार जागा राखीव ठेवण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. आदिवासी समाजातील नागरिकांच्या उटा या संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो पणजी येथे भेट घेऊन आदिवासी समाजाला विधानसभा निवडणुकीत आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात आदिवासी ... Read More »

‘हिटमॅन’ ठरला ‘आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर’

>> दीपक चहर व कर्णधार कोहलीचीही पुरस्कारांसाठी निवड टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ म्हणून परिचित असलेल्या विस्फोटक फलंदाज रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०१९सालचा सर्वोत्कृष्ट वनडे क्रिकेटपटू (आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर) म्हणून निवड केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार कर्णधार विराट कोहली आणि युवा नवोदित गोलंदाज दीपक चहरलाही पुरस्कार घोषित झाले आहेत. रोहित शर्माने विस्फोटक फलंदाजी करताना २०१९ साली वनडे क्रिकेटमध्ये ... Read More »