Daily Archives: January 15, 2020

तुलना नकोच

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना थेट ‘आज के शिवाजी’ ठरवणार्‍या पुस्तकावरून सध्या मोठा वाद उफाळला आहे. हे पुस्तक जेव्हा प्रकाशित झाले तेव्हाच असे घडणार याची अटकळ होती आणि तसेच झाले. विरोधी पक्षांना मोदींना आणि भाजपला झोडपण्यास एक आयते हत्यार मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकातील एक महान व्यक्तिमत्त्व. नरेंद्र मोदी यांची एक नेता म्हणून आज थोरवी कितीही असली तरी ... Read More »

आपल्या मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी…

ऍड. प्रदीप उमप सध्या भारतात दरवर्षी सुमारे २.६ कोटी मुलांचा जन्म होतो. त्यांना आरोग्य आणि सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी राजकीय बांधीलकी, अर्थसंकल्पीय तरतुदीत वाढ आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी या गोष्टींची गरज आहे. कुटुंबापासून दुरावलेल्या लहान मुलांच्या देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यावर युनिसेङ्गसह अनेकजण भर देतात. मुलांचे संरक्षण, पालनपोषण आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण यासाठी अशी व्यवस्था आवश्यक आहे. भारतात ... Read More »

वाघाच्या हल्ल्यात गुरे दगावलेल्यांना सरकारची मदत

>> मुख्यमंत्री मदत निधीतून दोन कुटुंबांना दिले प्रत्येकी १५ हजार रु. चे धनादेश राज्यातील अभयारण्यातील वाघाच्या हल्ल्यामुळे पशुधन गमावलेल्या व्यक्तींना अडचणीच्या वेळी मदत देण्यासाठी सानुग्रह अनुदान देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्यपाल सत्यपाल मलिक यांना काल देण्यात आली. या निर्णयानुसार मुख्यमंत्री मदत निधीतून काल गोळावली-सत्तरी येथील वाघांनी गुरे मारलेल्या विठो पावणे व लाखो जाधव यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ ... Read More »

…तो पयर्र्ंत वीज दरवाढ नाही ः वीजमंत्री काब्राल

जोपयर्र्ंत राज्यभरातील लोकांना २४ तास अखंडितपणे वीजपुरवठा करण्यास वीज खात्याला यश येणार नाही तोपर्यंत वीज दरवाढ करण्यात येणार नसल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. वीज खात्याने वेर्णे, साळगांव व तुयें अशा तीन ठिकाणी अतिरिक्त उच्च दाबाची वीज उपकेंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यापैकी वेर्णे व तुयें येथील वीज उपकेंद्रे न बांधण्याचा व केवळ साळगांव येथेच ... Read More »

सुप्रिम कोर्टाच्या वकिलांचाही सीएए, एनआरसीला विरोध

>> जंतर मंतरपयर्र्ंत काढला निर्षेध मोर्चा सीएएविरोधात देशभरात विविध विरोधी राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, ज्ञाती संघटना यांच्याकडून निषेध मोर्चे, आंदोलने केली जात असतानाच आता या कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे वकीलही रस्त्यावर आले आहेत. काल या वकिलांनी सर्वोच्च न्यायालय ते जंतरमंतर या मार्गावर निषेध मोर्चा काढला. सीएए, एनआरसी तसेच एनपी आर (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांनी हा मोर्चा ... Read More »

पर्यटन धोरण निश्‍चितीवेळी संबंधितांची मते विचारात घेणार ः मुख्यमंत्री

राज्याचे पर्यटन धोरण निश्‍चित करताना पर्यटन क्षेत्रातील उद्योजक, संस्था व नागरिकांच्या पर्यटनाबाबत सूचना , संकल्पना विचारात घेतल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले. गोवा माईल्सच्या टॅव्हल्स माईल्स या मासिकाच्या पहिल्या अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. गोवा माईल्स ही गोव्यातील पहिली ऍप आधारित टॅक्सी सेवा बंद करण्यासाठी आपणावर बर्‍याच जणांनी दबाव ... Read More »

कुंकळ्ळीत ७ मद्यधुंद तरुणांचा पोलिसांवर हल्ला ः वाहनांची तोडफोड

>> चार पोलीस जखमी; दोघां तरुणांना अटक कुंकळ्ळी येथे काल पहाटे गस्तीवरील चार पोलिसांवर सातपेक्षा जास्त तरुणांनी दारुच्या नशेत हल्ला केला व तीन पोलीस वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणी काही वेळात मयुर देसाई व शेख अब्दुल रझाक यांना पोलिसांनी अटक केली. इतर पाच जणांच्या शोधात पोलीस आहेत. कुंकळ्ळी पोलीस स्टेशनाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावरील एका घरासमोर पहाटे ३ वा. ही ... Read More »

करमळीत कचरा टाकल्याने ग्रामस्थांचा पणजी महापौर मडकईकरांना घेराव

>> पोलीस तक्रारीनंतर चार कचरावाहू ट्रक ताब्यात पणजी महापालिकेच्या पाटो येथील कचरा प्रकल्पाला आग लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी रात्रौ महापालिकेने करमळी येथे ट्रक भरून कचरा टाकणे सुरू केल्याने करमळी येथील ग्रामस्थांनी महापौर उदय मडकईकर यांना घेराव घालून जेरीस आणले. याप्रकरणी करमळी पंचायत तसेच करमळी येथील ग्रामस्थ यांनी पणजी महापालिकेविरुद्ध जुने गोवे पोलिसात दोन वेगवेगळ्या तक्रारी नोंदवल्या असल्याची माहिती करमळीचे सरपंच उत्तम ... Read More »

वाहन कायद्याची कार्यवाही केंद्राच्या निर्देशानुसार ः माविन

राज्यात नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करताना गुजरात मॉडेलचे अनुकरण केले जाणार नाही. तर, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांनी ३१ व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना काल दिली. राज्य सरकारने नवीन मोटर वाहन कायद्यातील शुल्कात बदल करू नये, असे मत ऍटर्नी जनरल ऑफ इंडिया ... Read More »

टीम इंडियाचा दारुण पराभव

>> ऑस्ट्रेलियाच्या फिंच-वॉर्नरची २५८ धावांची अविभक्त विक्रमी सलामी ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनी भारतीय भूमीवरील वनडे क्रिकेटमधील सर्वांत मोठी २५८ धावांची सलामी भागीदारी रचताना टीम इंडियाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात १० गड्यांनी पराभव केला. भारताने विजयासाठी ठेवलेले २५६ धावांचे तुटपुंजे आव्हान सहज पेलताना कांगारूंनी ७४ चंेंडू व १० गडी राखून भारताचा पराभव केला. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय ... Read More »