Daily Archives: January 14, 2020

निषेधार्ह दंडेली

कर्नाटक सरकारकडून सीमाभागातील मराठी भाषक जनतेची चाललेली गळचेपी आणि दडपशाही नवी नाही. तेथील सरकारे आणि सत्ताधारी पक्ष बदलले, तरीही ही दडपशाही थांबताना दिसत नाही. रविवारी बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोन मराठी साहित्य संमेलनांना आधी परवानगी नाकारून आणि नंतर महाराष्ट्रातून आलेल्या साहित्यिकांना रोखून, अटक करण्याची धमकी देऊन परत पाठवून जो काही प्रकार कर्नाटक पोलिसांनी – पर्यायाने तेथील सरकारने ... Read More »

जोती-सावित्री एक विचारधारा

देवेश कु. कडकडे (डिचोली) सावित्रीबाईंनी समाजाला दिलेले आचार, विचार, त्यांनी जपलेली संस्कृती, संस्कार, माणुसकी आत्मसात करणे हे आजच्या समाजासाठी आवश्यक आहे. जोती-सावित्री होत्या म्हणून आजच्या स्त्रिया समाजात स्वावलंबी बनून मोठ्या निर्धाराने विद्याविभूषित, उच्च पदस्थ होऊन देशाची सेवा करतात आणि सार्वजनिक क्षेत्रात मानाने जगतात. जानेवारी महिना हा नव्या वर्षाच्या सुरुवातीचा महिना अशी ओळख असण्याबरोबर विविध कारणांसाठी महत्त्वाचा आहे. या महिन्यात भारताच्या ... Read More »

भाजप जि. पं. निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविणार

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांची माहिती जिल्हा पंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे, अशी माहिती भाजपचे नवे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेल्या तानावडे यांनी काल संध्याकाळी मिरामार येथील दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्याबरोबर पणजीचे आमदार बाबुश मोन्सेर्रात हेही हजर होते. यावेळी ... Read More »

देशपातळीवर एनआरसी अनावश्यक : नितिश कुमार

>> बिहारात लागू करणार नाही बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी देशपातळीवर एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स) अनावश्यक असल्याचे काल स्पष्ट प्रतिपादन केले. एनआरसी लागू करण्याला काही औचित्यच नसल्याचा दावा त्यांनी केला. ही बाब त्यांनी विधानसभेच्या पटलावर स्पष्ट केली. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी विधानसभेत त्याआधी आपल्या भाषणावेळी मागणी केली होती की मुख्यमंत्री कुमार हे केंद्र व राज्य सरकारातील घटक पक्षाचे ... Read More »

पणजीत कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग लागल्याने नुकसान

>> जेसीबी, अर्थमुव्हर व अन्य यंत्रसामुग्री भक्ष्यस्थानी पणजी महापालिकेच्या पाटो येथे हिरा पेट्रोल पंपच्यामागे असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला काल सकाळी आग लागली. या आगीत या कचरा प्रक्रिया प्रकल्पातील एक जेसीबी, एक ‘अर्थ मुव्हर’ यांच्यासह तेथे असलेली अन्य यंत्र सामुग्री भक्ष्यस्थानी सापडली. पणजी अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन आग विझवण्याचे काम हाती घेतले. आग कचर्‍याला लागल्याने ती विझवण्याचे ... Read More »

परिपत्रक काढण्यासाठी मंत्री गुदिन्होंचा पंचायत संचालकांवर दबाव ः कॉंग्रेस

>> प्रकल्प परवान्यांच्या पंचायतींच्या अधिकारावर गदा पंचायत क्षेत्रात येणार्‍या नव्या प्रकल्पांना परवाने देण्याचे पंचायतींना असलेले अधिकार काढून घेऊन ते अधिकार पंचायत मंत्री या नात्याने आपणाकडे यावेत यासाठीचे परीपत्रक काढण्यास पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी पंचायत संचालकांवर दबाव आणून हे परिपत्रक काढण्यास भाग पाडले होते असा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. गोवा राजीव गांधी पंचायतीराज संघटनेने बोलावलेल्या ... Read More »

‘त्या’ पुस्तकाशी संबंध नसल्याचा भाजप माध्यम प्रमुखांचा दावा

>> ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’वरून वाद ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाशी भाजपचा कोणताही संबंध नाही. ते एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. त्या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिले आहे असा खुलासा भाजपचे राष्ट्रीय माध्यम सहप्रमुख डॉ. संजय मयुख यांनी केला आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे. ... Read More »

पंतप्रधान मोदी, अमित शहांकडून सीएएप्रश्‍नी जनतेची दिशाभूल ः सोनिया

कॉंग्रेस पक्षाने काल सीएएविरोधात येथे आयोजिलेल्या विविध विरोधी पक्षांच्या बैठकीत २० विरोधी पक्षांनी सहभाग घेऊन या कायद्याला प्रखर विरोध दर्शविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएए कायद्यासंदर्भात देशातील जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळी कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला. लोकांना सुरक्षा पुरविणे व सुशासन या अनुषंगाने मोदी सरकार सपशेल उघडे पडल्याचा दावा त्यांनी केला. सीएए, एनआरसीवरून देशभरात ... Read More »

भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे आज

>> टीम इंडियासमोर संघ निवडीचा पेच भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मंगळवारी मुंबई येथे खेळविला जाणार आहे. कसोटी क्रिकेट गाजवलेला ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेनचे संभाव्य वनडे पदार्पण व भारतासमोर असलेला सलामीचा पेच यामुळे या मालिकेचा शुभारंभी सामना गाजण्याची शक्यता आहे. तुलनेने कमकुवत श्रीलंकेविरुद्धची टी-ट्वेंटी मालिका गाजवल्यानंतर तुल्यबळ ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारताला सोपी जाणार नाही. जोश हेझलवूड, ... Read More »

सायना-सिंधू आमनेसामने ?

इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा आजपासून खेळविली जाणार आहे. या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत भारताची स्टार दुकली सायना नेहवाल व पी.व्ही. सिंधू आमनेसामने येण्याची दाट शक्यता आहे. पाचवी मानांकित सिंधू जपानच्या अया ओहोरी हिच्याविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे तर सायनासमोर जपानच्याच सायाका ताकाहाशी हिचे आव्हान असेल. दोघी भारतीयांनी पहिल्या फेरीचा अडथळा पार केल्यास दुसर्‍या फेरीत त्यांना एकमेकांविरुद्ध झुंजावे लागणार आहे. सायनाविरुद्ध ... Read More »