Daily Archives: January 13, 2020

सोईस्कर दिब्रिटो

उस्मानाबादेत झालेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आपल्या अध्यक्षीय भाषणातून संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लेखकाला हुजर्‍याची भूमिका पार पाडायची नसते, तर द्रष्ट्याची भूमिका पार पाडायची असते’ असे खडे बोल साहित्यिकांना सुनावताना देशातील अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी, माध्यम स्वातंत्र्य, हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल, अशा अनेक विषयांना स्पर्श करत मराठी भाषेच्या भवितव्यापासून पर्यावरण रक्षणापर्यंत नानाविध विषयांचा उहापोह केला. अर्थात, देशातील विद्यमान परिस्थितीबाबतची ... Read More »

डाव्यांच्या वैफल्याचा एल्गार…

ल. त्र्यं. जोशी आता जर आपण हालचाल केली नाही तर काही खरे नाही या निष्कर्षाप्रत कॉंग्रेस व डावे आले. त्यातच त्यांना नागरिकता कायद्यासंबंधी भ्रम पसरविण्याची संधी मिळाली. तीच पुढे रेटण्याचा त्यांचा प्रयत्न आहे व तोच गेल्या काही दिवसांत देशात निर्माण करण्यात आलेल्या विद्वेषाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. या निमित्ताने गेल्या सहा वर्षांत प्रथमच मोदींपुढे हे आव्हान आले आहे. संसदेने मंजूर केलेला ... Read More »

आता ३० आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य

>> भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन गोवा विधानसभेच्या वर्ष २०२२ मध्ये होणार्‍या निवडणुकीत भाजपचे ३० पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले. येथील गोमंतक मराठा समाज सभागृहात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवडणुकीनिमित्त आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदासाठी केवळ सदानंद शेट तानावडे यांचा ... Read More »

सेरुला कोमुनिदाद जमीन घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी सेरुला कोमुनिदाद जमीन घोटाळा प्रकरण सरकारने चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशकडे सोपवावे, अशी मागणी काल कॉंग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत केली. या कोमुनिदादीतील वझरीकर कुटुंबियांच्या आफ्रामेंत जमिनीचे रोहन खंवटे हे महसूल मंत्री असताना अवघ्या एका महिन्यात म्युटेशन करण्यात आले होते अशी माहितीही डिमेलो यांनी यावेळी दिली. अर्जुन वझरीकर यांच्या नावावर ही आफ्रामेंत जमीन ... Read More »

पाकमधून शरण आलेल्यांचाही भारतावर हक्क : अमित शहा

>> चार महिन्यांत राम मंदिर उभारणार : ममता बॅनर्जी, कॉंग्रेसवर जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीएएवरून काल कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्हाला जेवढा विरोध करायला असेल तेवढा करा. आम्ही सर्व लोकांना नागरीकत्व देऊनच शांत बसणार अशा शब्दात शहा यांनी कॉंग्रेसला ठणकावले. तसेच भारतावर जेवढा आम्हा सर्वांचा अधिकार आहे तेवढाच तो पाकिस्तानातून शरण आलेल्या हिंदू, शीख, बौध्द व ख्रिश्‍चन ... Read More »

सीएए विरोधात मुस्लिमांची वास्कोत रॅली

केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात वास्कोत मुस्लिम बांधवानी काल भव्य रॅली काढून प्रखर विरोध दर्शविला. संसदेत हे विधेयक मंजुर झाल्यापासून वास्कोतही या कायद्याविरोधात तीव्र पडसाद उमटले आहेत. मुस्लिम बांधवानी केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आजपर्यंत तीन वेळा निदर्शने करून प्रखर विरोध दर्शविला. काल शेकडो मुस्लिम बांधवानी येथील मुरगाव नगरपालिकेकडून एफएल गोम्स मार्गे रॅली काढून सीएए विरुध्द ... Read More »

सीएए : गांधींजींच्या म्हणण्याचे आमच्याकडून पालन : मोदी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जे सांगितले होते त्याचेच आम्ही पालन करीत आहोत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी काल सीएएसंदर्भात एका जाहीर सभेत बोलताना केला. सीएए हा कायदा नागरीकत्व देणारा असून नागरिकत्व काढून घेणारा नाही. हा कायदा विचारपूर्वक तयार केला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र विरोधकांकडून याविषयी संभ्रम निर्माण केला जात आहे. कोलकात्यातील बेलूर मठाला भेट देऊन मोदी यांनी ... Read More »

ब्लास्टर्सकडून एटीकेला पुन्हा पराभवाचा धक्का

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर केरला ब्लास्टर्सने माजी विजेत्या एटीके एफसीला एकमेव गोलच्या जोरावर धक्का दिला. दुसर्‍या सत्रात मध्य फळीतील हालीचरण नर्झारी याने केलेला गोल निर्णायक ठरला. मोसमाच्या प्रारंभी ब्लास्टर्सने घरच्या मैदानावर एटीकेला गारद केले होते. त्यानंतर ब्लास्टर्सने कोलकात्यामध्येही बाजी मारली. एटीकेसाठी हा निकाल धक्कादायक ठरला. १२ सामन्यांत त्यांचा हा तिसराच पराभव असून सहा विजय ... Read More »

भारतीय महिला संघाची घोषणा

>> टी-ट्वेंटी क्रिकेट विश्‍वचषक ऑस्ट्रेलियात २१ फेब्रुवारीपासून खेळविल्या जाणार्‍या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकासाठी बंगालची नवोदित फलंदाज रिचा घोष हिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. हरियाणाच्या १५ वर्षीय शफाली वर्मा हिला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले असून तीन आपला पहिलाच विश्‍वचषक खेळणार आहे. रिचा हिने महिला चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात २६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३६ धावांची खेळी केली ... Read More »

निर्भया कांडाच्या निकालाने बलात्कारी वृत्ती थांबेल काय?

–  दत्ता भि. नाईक तसे पाहता या घटनेला नऊ वर्षे लोटली. गुन्हा इतका निर्घृण व त्याचबरोबर स्पष्ट असूनही हा खटला रेंगाळला. सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यानंतर यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली. १२ डिसेंबर २०१९ रोजी तीही फेटाळली. तरीही नक्की फाशी केव्हा देणार याबद्दल अजूनही उत्सुकता होतीच. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी घडलेल्या सामूहिक बलात्कार, खून, अपहरण, चोरी व मारहाण ... Read More »