Daily Archives: January 11, 2020

बेफिकिरी भोवली

गोळावली व्याघ्र हत्या प्रकरणी गरीब धनगरांनाच जबाबदार धरून राज्याचे वन अधिकारी आपली जबाबदारी झटकू पाहात असल्याचे दिसते आहे. वास्तविक जेव्हा एखाद्या वनक्षेत्रामध्ये मनुष्य आणि वन्य जीव यांच्यात संघर्ष निर्माण होतो, तेव्हा काय करायचे यासंबंधीचे धोरण सुनिश्‍चित केलेले असते. वाघांच्या मनुष्यवस्तीतील प्रवेशाबाबत तर असे अत्यंत सुस्पष्ट धोरण केंद्र सरकारच्या राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकारिणीने आठ वर्षांपूर्वीच तयार केलेले आहे आणि सर्व राज्यांच्या ... Read More »

महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सुलेमानीच्या हत्येनंतर इराणमध्ये राष्ट्रपतींपासून सेनाध्यक्षांपर्यंत सर्वांनी अमेरिकेला कठोर उत्तर देऊ असा इशारा दिला आहे. आपणावर काहीही किटाळ येऊ नये या उद्देशाने शत्रूंवर इतरांद्वारे हल्ले करवणे हे इराणचे मूलभूत भौगोलिक व राजकीय धोरण आहे. इराण हा इराक आणि लिबीयाप्रमाणे सामरिकदृष्ट्‌या कमकुवत नसल्यामुळे त्याच्याशी सर्वंकष युद्ध अमेरिका व दोस्त राष्ट्रांसाठी अतिशय महागडे ठरेल. इराकमध्येे इराणचे अमेरिका विरोधी गनिमी ... Read More »

वाघ हत्याप्रकरणी आणखी एकास अटक

>> एकूण ५ संशयित ताब्यात, केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण पथकाची भेट सत्तरी तालुक्यातील चार वाघांच्या मृत्यू संदर्भात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यांना वाळपई प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयातून चौकशीसाठी सात दिवसांचा रिमांड देण्यात आलेले आहे. दरम्यान केंद्रीय वन व पर्यावरण खात्याच्या निर्देशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काल गोळावली भागातील अनेक ठिकाणी भेटी देऊन या संदर्भात ... Read More »

बायंगिणीतील कचरा प्रकल्पास पर्यावरण दाखला मंजूर ः लोबो

गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने बायंगिणी ओल्ड गोवा येथील नियोजित २५० क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला पर्यावरण दाखला मंजूर केला आहे. येत्या पाच महिन्यांत कचरा प्रकल्पाबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी काल दिली. बांयगिणी ओल्ड गोवा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याला जनसुनावणीच्या वेळी स्थानिक नागरिकांनी विरोध ... Read More »

भाजप प्रदेशाध्यक्षांची उद्या होणार निवड

भाजपच्या नव्या राज्य प्रदेशाध्यक्षाची निवड उद्या रविवार दि. १२ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी आज शनिवारी दुपारी २ ते ४ या दरम्यान, भाजपच्या पणजीतील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील, असे पक्षाचे संघटनात्मक निवडणूक प्रभारी गोविंद पर्वतकर यांनी काल पत्रकार परिषदेतून बोलताना सांगितले. नव्या अध्यक्षांची निवड एकमताने व्हावी अशी पक्षाच्या नेत्यांची इच्छा आहे. मात्र, एकमत होऊ न शकल्यास उद्या अध्यक्षपदासाठी निवडणूक ... Read More »

दीड कोटींच्या जुन्या नोटा पोळेे चेकनाक्यावर जप्त

>> केरळमधील ५ जणांना अटक काणकोणच्या पोलिसांनी पोळे चेक नाक्यावर गुरूवार दि. ९ रोजी रात्रौ ९च्या दरम्यान घातलेल्या एका छाप्यात गोव्यातून कासरकोड-केरळ येथे जाणारी केए १४ यू ३३३० ही चारचाकी गाडी अडवून त्यातील १ कोटी ४८ लाख रु.च्या चलनात नसलेल्या जुन्या नोटा जप्त केल्या. या कारवाईत अब्दुल कन्नूर (४४), सलीम रेहमान (३३), रजाक मोहम्मद (४५), अब्बू बक्कर अब्दूल्ला (२५), युसूफ ... Read More »

उत्खनन केलेल्यातील ३९८ क्युबिक रेती पुन्हा नदीत

>> उच्च न्यायालयात सरकारची माहिती राज्यातील बेकायदा रेती उत्खनन प्रकरणातील सुमारे ३९८ क्युबिक मीटर रेती गुरुवारपर्यंत पुन्हा नदीच्या पात्रात टाकण्यात आली आहे, अशी माहिती सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात काल दिली. राज्यातील बेकायदा रेती उत्खनन प्रकरणी सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने सरकारने बेकायदा रेती प्रकरणी कडक कारवाईचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले आहेत. रेती उत्खनन करण्यासाठी ... Read More »

दिल्लीतील चोरट्यास मांद्रे येथे अटक

गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने दिल्लीतील अट्टल चोरट्याला आगरवाडा मांद्रे येथील एका गेस्ट हाउसमध्ये काल अटक केली असून त्याच्याकडून ५ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. संशयित मुकेश शर्मा (३४) याचा १४ चोर्‍यांमध्ये सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळून आले आहे. त्याच्याकडे चार मंगळसूत्र, ३ सोन साखळ्या, १ लॉकेट अशा सोन्याचा ऐवज आढळून आला आहे. Read More »

२०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणार्‍यांना दरवाढीचा फटका?

>> स्लॅब रद्द करण्याचा प्रस्ताव वीज खात्याने राज्यात २०० युनिटपेक्षा जास्त विजेचा वापर करणार्‍या घरगुती ग्राहकांना वीज बिल दर आकारणीतील सवलत (टप्पा – स्लॅब) रद्द करण्याचा प्रस्ताव संयुक्त वीज नियमन आयोगाकडे सादर केला आहे. ही सवलत रद्द झाल्यास आपोआप विजेच्या दरात वाढ न करता सुद्धा घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीला तोंड द्यावे लागणार आहे. वीज खात्याच्या या प्रस्तावावर ५ फेब्रुवारी २०२० ... Read More »

मराठी साहित्य संमेलनाचे उस्मानाबादमध्ये उद्घाटन

उस्मानाबाद येथे काल ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रख्यात कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते झाले. संमेलनाच्या उद्घाटनाला जाऊ नका अशी धमकी त्यांना देण्यात आली होती. मात्र तरीही त्यांनी उद्घाटन केले. मात्र यावेळी संमेलनात कुठेच विरोध दिसून आला नाही. मात्र महानोर यांना धमकी देण्यात आल्याने सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली होती. यावेळी ९२ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ... Read More »