Daily Archives: January 10, 2020

दुःखदायक

सत्तरीतील गोळावलीच्या जंगलात नर, मादी व बछड्यांसह एकूण चार वाघांच्या अनैसर्गिक मृत्यूची घटना अत्यंत धक्कादायक आणि त्याहून कैक पटींनी दुःखदायक आहे. या व्याघ्रकुटुंबाला विष घालून मारण्यात आले असावे असा संशय वनखात्याने व्यक्त केलेला आहे आणि यापूर्वी वाघाने ज्यांची दुभती जनावरे मारून टाकली होती, त्या स्थानिक धनगर कुटुंबावर संशय घेत चौघांना ताब्यात घेतले आहे. वाघाला विष घालून मारण्याची घटना दुर्दैवी आणि ... Read More »

खाण व्यवसाय खरेच पुन्हा सुरू होईल?

शंभू भाऊ बांदेकर लवकरच गोव्यातील खाण प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाचा दिलासा मिळणारा निवाडा ऐकायला मिळाला तर आनंदच, नपेक्षा मुख्यमंत्री कुठली जादूची कांडी फिरवतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असेल, यात शंकाच नाही. आता प्रश्‍न हाच आहे की या नूतन वर्षात खाण व्यवसाय खरोखरच पुन्हा सुरू होईल का? गोवा मुक्तीदिनाच्या आधल्या दिवशी, १८ डिसेंबरला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीत केंद्रीय ... Read More »

वाघांच्या मृत्युप्रकरणी संशयितांची कबुली

>> विषप्रयोग केल्याचे मान्य, चौघांचा सहभाग म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या हत्याप्रकरणी वनखात्याने अटक केलेल्या संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून मृत वाघ, वाघीण पुरण्यात आलेली जागा दाखविली आहे. वनखात्याच्या तपास अधिकार्‍याने संशयितांना घटनास्थळी नेऊन जागेचा पंचनामा काल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आणखीन एका संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाने वाघ मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी नियुक्त केलेले ... Read More »

युद्धपातळीवर तपासकाम सुरू

म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार पट्टेरी वाघांची अज्ञातांकडून हत्या करण्याची जी घटना घडली त्या प्रकरणाचे तपासकाम जोरात चालू असून वनखात्याचे एक पथक पुरावे गोळा करण्यासह सर्व ते तपासकाम करण्यासाठी वनक्षेत्रात युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती काल अतिरिक्त विशेष मुख्य वनपाल संतोषकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात असल्याचे कुमार यांनी ... Read More »

वन कार्यालयावर कॉंग्रेसचा मोर्चा

वाघांच्या हत्येच्या निषेधार्थ काल विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथील वनखात्याच्या कार्यालयात मोर्चा नेला व अतिरिक्त विशेष मुख्य वनपाल संतोष कुमार यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन घेराव घालून वाघांच्या हत्येच्या प्रश्‍नांवरून त्यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, संकल्प आमोणकर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, युवा कॉंग्रेस अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, लालन पार्सेकर आदी पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांनी ... Read More »

गोमंतकीय वनाधिकार्‍यांकडे जबाबदारी द्या ः ढवळीकर

बिगर गोमंतकीय वन अधिकार्‍यांना गोव्याच्या वनक्षेत्राविषयीची माहिती नाही. त्यामुळे ते वनक्षेत्रात न जाता कार्यालयातच बसून राहणे पसंत करतात. त्यामुळे जे गोमंतकीय वन अधिकारी आहेत त्यांच्याकडे जास्त जबाबदारी द्यावी लागेल. खास करून जे रेंज फॉरेस्टर ऑफिसर आहेत त्यांच्याकडे जबाबदारी देण्याची गरज आहे, असे मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांनी काल प्रतिक्रया देताना सांगितले. वाघांची हत्या केलेल्यांवर कठोर कारवाई केली ... Read More »

अभयारण्यातील कुटुंबांनी स्थलांतर करावे ः मुख्यमंत्री

राज्यातील राखीव अभयारण्यात एकदम धोक्याच्या जागी राहणार्‍या कुटुंबांनी स्वयंस्फूर्तीने स्थलांतरासाठी पुढाकार घेतल्यास त्यांचे पुनर्वसन करण्याची सरकारची तयारी आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. म्हादई अभयारण्यातील वाघांच्या मृत्युप्रकरणी धनगर कुटुंबातील तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. धनगर कुटुंबीयांच्या गाय, म्हैस यांची वाघाने शिकार केलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, अभयारण्याच्या जवळ ... Read More »

पक्षी महोत्सव लांबणीवर टाका ः गोवा फॉरवर्ड

म्हादई अभयारण्यातील चार वाघांच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर वनखात्याने आगामी पक्षी महोत्सव लांबणीवर टाकावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी पत्रकार परिषदेत काल केली. वनखात्याच्या अनास्थेमुळे चार वाघांची हत्या करण्यात आली. म्हादई अभयारण्यातील वाघांचे संरक्षण करण्यात वनखाते अपयशी ठरल्याचा आरोप प्रभुदेसाई यांनी केला. अभयारण्यात वाघ, वाघीण व बछडे असल्याचे वनखात्याने लावलेल्या कॅमेर्‍यामुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वनखात्याने वाघांच्या रक्षणार्थ ... Read More »

हत्या केलेल्यांवर कडक कारवाई हवी ः इजिदोर

वाघांची हत्या केलेल्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष व उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी काल सांगितले. वाघ हे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांची हत्या किंवा शिकार केली जाणार नाही याकडे वन खात्याने खास लक्ष देण्याची गरज असल्याचे फर्नांडिस म्हणाले. वाघाचे दात व नखे तसेच कातडी व अन्य अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांच्या तस्करीसाठी वाघांची शिकार ... Read More »

९३व्या मराठी साहित्य संमेलनाचे आज उस्मानाबाद येथे उद्घाटन

आज शुक्रवार दि. १० जानेवारी रोजी ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मराठवाड्यात पंधरा वर्षांनी तर उस्मानाबाद येथे पहिल्यांदाच हे साहित्य संमेलन होत आहे. प्रख्यात कवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते आज संध्याकाळी ४ वा. संमेलनाचे उद्घाटन होणार असून हे समेलन दि. १२ जानेवारीपर्यंत चालणार आहे. संमेलनाचा मुख्य कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे त्या जागेला ... Read More »