Daily Archives: January 8, 2020

निर्भयाप्रकरणी आरोपींना २२ रोजी फाशी

>> दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाचा निर्णय निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने काल मंगळवारी या प्रकरणातील चारही संशयितांना फाशीची शिक्षा कायम केली आहे. त्यांना आता दि. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते. या प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टाने यापूर्वीच ... Read More »

संरक्षणाची नवी दिशा

ह्या नववर्षाच्या प्रारंभीच भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन घटना घडल्या. भारताचे २८ वे लष्करप्रमुख म्हणून एक मराठी सेनानी एम. एम. नरवणे यांनी आपल्या पदाचा ताबा घेतला, तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या नवनिर्मित पदावर माजी लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत विराजमान झाले. या दोन्ही घटनांना महत्त्व आहे, कारण त्यातून संरक्षणक्षेत्रासंदर्भातील भारताच्या बदलत्या प्राधान्यांचे संकेतही जगाला ... Read More »

कठोर कायद्याची गरज

ऍड. प्रदीप उमप गेल्या दशकभरात इंटरनेटवरचे अवलंबित्व प्रचंड वाढले आहे. पण वापराबरोबरीने इंटरनेटचा गैरवापरही वाढला आहे. त्यातूनच गुन्हेगारीही बळावली आहे. आज हँकिंग हा परवलीचा शब्द बनला आहे. हॅकर्सच्या लूटमारीचा ङ्गटका अनेक भारतीयांना सोसावा लागला आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. पोलिसांसमोर हे गुन्हे रोखायचे कसे हा मोठा पेच उभा राहिला आहे. गेल्या दशकभरामध्ये भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये ८८ टक्के ... Read More »

म्हादईवरील स्थगन प्रस्ताव फेटाळला

>> विधानसभेचे एक दिवशीय खास अधिवेशन काल झालेल्या गोवा विधानसभेच्या एका दिवसाच्या अधिवेशनात म्हादई प्रश्‍नावर चर्चा व्हावी यासाठी विरोधी कॉंग्रेस, मगो व गोवा फॉरवर्ड या पक्षांनी आणलेला स्थगन प्रस्ताव सभापती राजेश पाटणेकर यांनी फेटाळून लावला. यावेळी बोलताना सभापती म्हणाले की, म्हादईचा प्रश्‍न हा आता अचानक उद्भवलेला प्रश्‍न नसून तो जुना प्रश्‍न आहे. एखाद्या अचानक उद्भवलेल्या प्रश्‍नाकडे सरकारचे लक्ष वेधायचे असेल ... Read More »

येत्या मोसमात खाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न ः राज्यपाल

राज्यातील बंद पडलेला खाण उद्योग येत्या मोसमात सुरू करता यासाठी गोवा सरकार प्रयत्नरत आहे व ते होईल अशी सरकारला आशा असल्याचे गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांनी काल गोवा विधानसभेत आपल्या अभिभाषणातून बोलताना सांगितले. खाणी सुरू करून खाणबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या खाण अवलंबितांना दिलासा देण्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणाले. काल झालेल्या एका दिवसाच्या विशेष अधिवेशनाची सुरवात राज्यपाल ... Read More »

विवाह नोंदणी दस्तऐवज ऑनलाईन

>> गोवा हे पहिले राज्य, मुख्यमंत्र्यांहस्ते उद्घाटन राज्य सरकार विवाह नोंदणी दस्तऐवज ऑन लाईन पद्धतीने उपलब्ध करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आला आहे. याप्रसंगी कायदा मंत्री नीलेश काब्राल व इतर अधिकारी उपस्थित होते. विवाह नोंदणीची ऑन लाईन पद्धतीने १९१४ ते २०१० पर्यतची प्रमाणपत्रे आता उपलब्ध करण्यात आली आहेत. ... Read More »

मंत्रिमंडळ बैठकीत म्हादई विषयावरून माविन – विश्‍वजित यांच्यात खडाजंगी

गोवा विधानसभेचे खास अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हादई या विषयावरून वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यात काल जोरदार खडाजंगी झाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हादईचा विषय लावून धरण्याचा सूर काही मंत्र्यांनी लावला. त्यावेळी वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी म्हादईच्या प्रश्‍नाला माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे जबाबदार आहेत. राणे हा म्हादईचा विषय ... Read More »

पुरस्कार ही माध्यमांच्या समाजहितकारक कार्याची घेतलेली दखल : जावडेकर

>> नवप्रभासह देशभरातील ३० माध्यम संस्थांचा दिल्लीत गौरव येथील रायसिना रोडवरील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात मुद्रित माध्यम (मराठी) विभागात दैनिक नवप्रभासह देशभरातील ३० माध्यम संस्थांना आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर हे या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून तर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मंत्रालयाचे ... Read More »

टीम इंडियाचा ट्वेंटी-ट्वेंटी आरंभ विजयाने श्रीलंकेचा

>> ७ गडी व १५ चेंडू राखून केला पराभव टीम इंडियाने दुसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा ७ गडी व १५ चेंडू राखून पराभव करत २०२० वर्षाची सुरुवात धमाकेदार विजयाने केले. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर उभय संघांसाठी दुसरा सामना महत्त्वाचा होता. श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेले १४३ धावांचे माफक लक्ष्य भारताने केवळ १७.१ षटकांत गाठताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ताशी १४५ ... Read More »

गोव्याच्या पुरुषांना रौप्य तर महिलांना कांस्य

गोव्याच्या वरिष्ठ पुरुष आणि महिला संघांनी पुदुचेरी येथे नुकत्याच झालेल्या विभाग १ राष्ट्रीय एकात्मता रस्सीखेच अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले. भारतीय रस्सीखेच महासंघाच्या सहकार्याने भारताच्या क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयातर्फे एक भारत श्रेष्ठ भारत मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गोव्याच्या पुरुष संघाने अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप संघावर मात करीत ... Read More »