Daily Archives: January 7, 2020

गगनभरारी

भारताची अंतरिक्ष विज्ञानाची पंढरी असलेल्या ‘इस्रो’ ने चंद्रयान – २ च्या अपयशाच्या राखेतून उठत ‘चंद्रयान -३’ आणि ‘गगनयान’ मोहिमांची घोषणा करीत नववर्षातील नवसंकल्पांची ललकार दिली आहे. आपले चंद्रयान २ चंद्रापर्यंत अगती नियोजनबरहुकूम पोहोचले, परंतु त्याच्या पृष्ठभागावर उतरताना तांत्रिक दोष निर्माण झाला आणि शेवटचे काही सेकंद असताना ते चंद्राच्या पृष्ठभागावर वेगाने आदळले आणि निकामी ठरले. त्या अपयशापासून धडा घेऊन आणि त्यानुसार ... Read More »

न्यायप्रक्रिया अधिक गतिमान हवी

देवेश कु. कडकडे (डिचोली) स्त्री विषयी विघातक संदेश देणार्‍या गोष्टींवर बंदी घालण्याचा विचार जोपर्यंत समाजात तळागाळातून रुजणार नाही, तोपर्यंत कितीही आटापिटा केला केला तरीही अखेर मानसिक आणि शारीरिक वर्चस्व प्रस्थापित करणारी विकृतीच फोफावत राहील. बलात्कार का होतात याच्या मुळाशी न जाता त्यावर फक्त तावातावाने बोलणारे अधिक आहेत. आरोपींना २४ तासांच्या आता भर चौकात फाशी द्यावे किंवा त्यांचे वकीलपत्र कोणी घेऊ ... Read More »

विधानसभेचे आज खास अधिवेशन

>> म्हादईप्रश्‍नी कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्डने दिला स्थगन प्रस्ताव गोवा विधानसभेचे खास अधिवेशन आज मंगळवार ७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता घेण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप आणि अपक्ष रोहन खंवटे यांनी म्हादई गोव्यात गाजत असलेल्या विषयावर संयुक्त स्थगन प्रस्ताव विधानसभा सचिवांकडे काल केला आहे. या खास अधिवेशनात म्हादई हा विषय गाजण्याची शक्य्ता आहे. ... Read More »

राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट ः ढवळीकर

राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट बनलेली असून महसूल वाढ कशी करावी याबाबत मंत्रिमंडळात एकवाक्यता दिसत नसल्याचे मगोचे आमदार व माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. मी एक वर्षापर्यंत सरकार विरोधात काहीएक बोलणार नसल्याचे म्हटले होते. पण आता पाणी नाकापर्यंत आलेले असल्याने गप्प राहता येणार नाही. त्यामुळे पुढील विधानसभा अधिवेशनात आपण एक विरोधी पक्षाचा नेता या नात्याने सरकारच्या ... Read More »

म्हादईप्रश्‍नी मगोपचे ११ रोजी साखळीत धरणे

मगो पक्ष येत्या ११ रोजी म्हादईप्रश्‍नी साखळी येथे धरणे धरणार आहे. साखळी येथे ज्या ठिकाणी बंधार्‍याजवळ म्हादई नदीचा संगम होत असतो त्या ठिकाणी मगो पक्ष धरणे धरणार असल्याची माहिती मगोचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. कर्नाटकने यापूर्वीच म्हादईचे २७ टक्के पाणी पळवले असल्याने गोव्यात यंदा पाणी समस्या निर्माण होणार असल्याचे ढवळीकर म्हणाले. कर्नाटकने म्हादईचे पाणी ... Read More »

वाघाच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

गोळावली सत्तरी येथे म्हादई अभयारण्यात मृतावस्थेत सापडलेल्या पट्टेरी वाघ प्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला. गोळावली सत्तरी येथे जंगलात स्थानिक नागरिकांना पट्टेरी वाघ मृतावस्थेत रविवारी आढळून आला होता. या प्रकरणी वनखात्याला माहिती देण्यात आल्यानंतर वनखात्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास कामाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप पट्टेरी वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. म्हादई ... Read More »

कॉंग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी आलेक्स रेजिनाल्डची निवड

>> कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक कॉंग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची निवड काल करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीत म्हादई, सरकारची आर्थिक स्थिती व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. म्हादईच्या प्रश्‍नावर संयुक्त स्थगन प्रस्तावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ... Read More »

नवप्रभासह ३० माध्यम संस्थांना आज योग दिवस पुरस्कार वितरण

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी मंत्रालयाने विविध माध्यमसमूहांनी गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने खास पुरवण्या, लेख, अग्रलेख याद्वारे योग विषयक जी जनजागृती केली त्याची दखल घेऊन देशातील २२ भाषांमधील एकूण ११ वृत्तपत्रे, ११ वृत्तवाहिन्या व ८ रेडिओ केंद्रे आदींची आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मानसाठी निवड केली आहे. यामध्ये मुद्रित माध्यमे (मराठी) विभागात महाराष्ट्र व गोव्यातून दैनिक नवप्रभाची ... Read More »

शेतकरी संघटनांतर्फे ८ रोजी भारत बंद

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी येत्या ८ जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली आहे. किसान संघर्ष समन्वय समितीच्या नुकत्याच झालेल्या तिसर्‍या अधिवेशनात देशातील २०८ शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला होता. हा भारत बंदचा निर्णय घेण्यात आला. शेतकर्‍यांना सरसकट देशव्यापी कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा करा, शेतकर्‍यांना पीकविम्याचे सर्वंकष संरक्षण द्या, सिंचन, दुष्काळ, पेन्शन, आरोग्य, पर्यावरण यासह सर्व मुद्द्यांचा विचार ... Read More »

भारत-श्रीलंका दुसरा टी-ट्वेंटी सामना आज

>> होळकर स्टेडियमवर धावांची बरसात अपेक्षित भारत व श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-ट्वेंटी सामना आज मंगळवारी होळकर स्टेडियमवर खेळविला जाणार आहे. पहिला सामना पावसामुळे व ओलसर मैदानामुळे रद्द करावा लागल्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील आजच्या सामन्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. आयसीसी टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक असल्यामुळेे उभय संघ संघ बांधणी करण्यात गुंतले आहेत. टीम इंडियादेखील दुसर्‍या सलामीवीराच्या शोधात आहे. ... Read More »