Daily Archives: January 6, 2020

गोवा पर्यटन ः दिशा आणि दशा

प्रमोद ठाकुर गोव्यातील अनैतिक धंद्यांमुळे देश-विदेशांतील चांगले पर्यटक गोव्यात येण्याचे टाळत आहेत. राज्य सरकारने प्रथम पर्यटन धोरण निश्‍चित करून त्यानुसार कार्यवाही करण्याची गरज आहे. विदेशी पर्यटकांची संख्या पंचवीस ते तीस टक्के घटल्याचा दावा केला जात आहे. पर्यटनातील अनैतिक गोष्टींना आळाबंद घालण्याची गरज आहे. पर्यटकांची सुरक्षा, वेश्याव्यवसाय, अमलीपदार्थ यामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे.   उत्तर गोव्यातील वागातोर-हणजूण येथे सरत्या वर्षात ... Read More »

अर्थसंकल्प २०२०-२१ ः अर्थमंत्र्यांची कसरत

शशांक मो. गुळगुळे देशाला पुन्हा आर्थिक प्रगतिपथावर घेऊन जाण्याचे मोठे आव्हान अर्थमंत्र्यांसमोर आहे. या अर्थसंकल्पात आर्थिक घसरण रोखण्यासाठीच्या तरतुदी अर्थमंत्र्यांना जाहीर कराव्या लागतील.   अर्थसंकल्प २०२०-२१ ची तयारी सुरू झाली असणार. सध्या अर्थमंत्रालयाकडे विविध उद्योगांच्या संघटनांच्या मागण्यांची परिपत्रके पोहोचत असून, सर्व उद्योग-संघटनांच्या सर्व मागण्या कोणताही अर्थमंत्री पुर्‍या करू शकत नाही. सामान्य माणसापासून, सर्व क्षेत्रांतील लोकांना, उद्योजकांना अर्थसंकल्पाने आपल्याला काहीतरी द्यावे ... Read More »

बंध रेशमाचे स्वस्तिक

 मीना समुद्र नावीन्याची कास, आस, ध्यास आणि विश्‍वास यामुळे आपला येता काळ उजळून निघेल असेच त्याला मनोमन वाटत असते. म्हणून तो नववर्षाचे स्वागत करतो- असे स्वस्तिकासारखे बाहू पसरून, मनात शुभेच्छांचे स्वस्तिक रेखाटून… कोण जाणे का, पण आज राहून राहून इंदिरा संतांच्या ‘या हो सूर्यनारायणा’ या कवितेची आठवण येत आहे. उगवत्या सूर्याचं स्वागत करण्यासाठी त्यांनी अंगण सारवून त्यावर स्वस्तिक रेखाटलं आहे. ... Read More »

काश्मिरी लोककथा आणि आनंदाचा इतिहास

एडिटर्स चॉईस – परेश प्रभू दर आठवड्याला एखाद्या ताज्या ‘नॉन फिक्शन’ पुस्तकाचा परिचय या सदरातून करून दिला जातो. यावेळी निवडलेली पुस्तके मात्र वेगळी आहेत. एक आहे अस्सल काश्मिरी लोककथांचे आणि दुसरे आहे मानवी आनंदानुभवाचा आविष्कार मांडणारे!   लोकजीवनाचा हुंकार म्हणजे लोककथा. ज्या समाजातून त्या आलेल्या असतात त्या समाजाच्या जडणघडणीचे ताणेबाणे त्या कथांमधून समजतात. समाजाच्या कल्पनाशक्तीची झेप दर्शवणार्‍या, त्याच्या वृत्तिप्रवृत्तींचे प्रतिबिंब ... Read More »

कारभारी, दमानं…

तीन तिगाडा, काम बिगाडा अशी एक म्हण आहे. तिघांची तोंडे जर तीन दिशांना असतील तर काम बिघडलेच म्हणून समजावे. महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस यांच्या बाबतीत अजूनही हेच चाललेले आहे हे खातेवाटपाला लागलेल्या विलंबातून स्पष्ट झाले आहे. आधी सरकार बनवण्यासाठी चर्चांचे गुर्‍हाळ लावले गेले. शेवटी यांचे काही ठरेना हे पाहून संधी साधण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी ... Read More »

नागरिकता हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी

ल. त्र्यं. जोशी पोलिसी बळाच्या वापरालाही मर्यादा आहेत व त्या पाळायलाच हव्यात. शेवटी ज्या लोकांच्या बळावर ही मंडळी उड्या मारू इच्छिते, त्या लोकांना जागृत करणे, त्यांच्या दुष्ट इराद्यांची जाणीव करून देणे एवढेच त्यांच्या हातात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील सी.बी.आय. चौकशी हा एक भाग ठरु शकतो. म्हणून त्याचा आग्रह. गेल्या महिन्यात संसदेने पारित केलेल्या नागरिकता संशोधन कायद्याला ... Read More »

सत्तरीत सापडला मृतावस्थेत वाघ

>> हत्या झाल्याचा संशय गोळावली सत्तरी येथे काल कुजलेल्या अवस्थेत पट्टेर वाघ सापडला. गोळावली गावापासून सुमारे दीड किमी अंतरावर सिद्धेश्‍वर देवस्थानकडे म्हादई अभयारण्य क्षेत्रात हा वाघ सापडला. सापडलेला वाघ हा चार वर्षे वयाचा होता. त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. त्याचा मुत्यू आठ दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काल रविवारी सकाळी जेव्हा गोळावली गावातील लोक सिद्धेेश्वर देवाची ... Read More »

स्कीमरद्वारे पैसे काढलेल्या दोन संशयितांना अटक

म्हापसा परिसरातील विविध बॅकांच्या एटीएममधून स्कीमरचा वापर करून रक्कम काढल्याच्या संशयावरून म्हापसा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा आयव्हो पेट्रो मॅचीनोव (४७) रा. हडफडे व मिलन आयवनो दावरासकी (४५) रा. हडफडे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १ लॅपटॉप, ६ मोबाईल, २ स्क्रीमर मशीन व इतर वस्तू हस्तगत केल्या. म्हापशाचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी आपल्या सहकार्‍यांसमवेत सापळा रचला व वरील दोघांही संशयितांना ... Read More »

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची आज पणजीत बैठक

कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज सोमवार दि. ६ जानेवारी होणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल सांगितले. या बैठकीत मंगळवारी होणार असलेले एक दिवसीय विधानसभा अधिवेशन तसेच पुढे होणार असलेल्या हिवाळी अधिवेशनासंबंधीची पक्षाची रणनीती ठरवण्यात येणार आहे. आजच्या विधिमंडळ बैठकीत म्हादई प्रश्‍नावर चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोवा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्याची जी आर्थिक स्थिती बिकट झालेली आहे त्याबाबतही ... Read More »

सीएएवरून राहुल, प्रियांकांकडून दंगली

>> अमित शहा यांचा नवी दिल्लीतील मेळाव्यात आरोप राहुल आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व कायद्याबाबत जनतेची दिशाभूल करून दंगली घडवल्याचा गंभीर आरोप केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. दिल्ली येथे इंदिरा गांधी स्टेडियममध्ये भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळीमेळाव्याला संबोधित करताना शहा यांनी वरीलआरोप केला. यावेळी त्यांनी आम आदमी पक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. नागरिकत्व ... Read More »