Daily Archives: January 4, 2020

धडक कारवाई

इराणचा वरिष्ठ लष्करी कमांडर कासिम सुलेमानी आणि पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस किंवा पीएमफ या लढाऊ संघटनेचा नेता अबु महदी यांचा बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका क्षेपणास्त्र हल्ल्यात अमेरिकेने काल खात्मा केला. इराणविरुद्ध गेले काही महिने सतत दंड थोपटत आलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नववर्षातील ही धडक कारवाई मध्यपूर्वेमध्येच नव्हे, तर जगामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी आहे. या कारवाईला इराण कशा प्रकारे प्रत्युत्तर ... Read More »

सीडीएस निवडीतून काय साधले?

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) केंद्रीय मंत्रिमंडळाने चीङ्ग स्टाङ्ग ऑङ्ग डिङ्गेन्स या बहुचर्चित आणि बहुप्रलंबित पदासाठी अखेर निवृत्त लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांची निवड केली आहे. पण सुब्रह्मण्यम समितीने शिङ्गारस केलेले पद आणि आताचे पद यामध्ये अधिकारात्मक पातळीवर ङ्गरक आहे. आताचे सीडीएस पद हे ङ्गोर स्टार जनरल असणार आहे. त्यांना संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी संरक्षण सचिवांमार्ङ्गतच जावे लागणार आहे… मे,२०१९ मध्ये दुसर्‍यांदा ... Read More »

शरणार्थींना सन्मानाने जगण्यासाठी सीएए

>> पणजीतील भव्य जाहीर सभेत भाजप नेते जे. पी. नड्डा यांचा दावा पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश या देशांतून धार्मिक छळाला कंटाळून भारतात आलेल्या हिंदू, बौद्ध (ख्रिस्ती), जैन आदी धर्मांतील लोकांना भारतात आश्रय मिळावा व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठीच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा संसदेत संमत केला असल्याचे भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी काल पणजीतील आझाद ... Read More »

रस्ता कर कपातीमुळे ५२ कोटी महसूल बुडाला

>> मगो ः सवलत कोणाच्या फायद्यासाठी दिली? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आर्थिक समस्या भेडसावत असताना वाहतूक खात्याने रस्ता करात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय घेऊन सरकारचा ५० ते ५२ कोटी रुपयांचा महसूल बुडविला आहे, असा आरोप महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला. राज्य सरकारने आर्थिक समस्येमुळे मागील नऊ महिन्यात २ हजार कोटीचे ... Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्षांची निवड लवकरच

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी भाजपच्या गाभा समिती, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत घेतलेल्या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षाच्या नावावर काल प्राथमिक चर्चा काल केली. माजी आमदार दामू नाईक, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपच्या नूतन प्रदेशाध्यक्षाची निवड येत्या आठ ते दहा दिवसात केली जाणार आहे. राष्ट्रीय ... Read More »

सीएएविरोधी भूमिकेसाठी केरळची ११ राज्यांना पत्रे

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ११ राज्यांच्या भाजपेतर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वादग्रस्त सीएए कायद्यासंदर्भात केरळप्रमाणेच भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे. देशाची एकता, धर्मनिरपेक्षता व लोकशाही वाचविण्यासाठी असे पाऊल उचलावे असे आवाहन त्यांनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहे. केरळ विधानसभेत गेल्या मंगळवारी सीएए कायदा रद्द करण्याची मागणी करणारा संमत करण्यात आला आहे. बिहार, प. बंगाल, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य ... Read More »

ट्रम्प यांच्या आदेशावरुन इराणच्या गार्डस् प्रमुख सुलेमानीची हत्या

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन काल शुक्रवारी अमेरिकेने इराकच्या बगदाद शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्यारेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचा जनरल कासिम सुलेमानी हा ठार झाला. पेंटागॉनने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून अमेरिकेच्या या आक्रमक कारवाईमुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या कारवाईचा बदला घेतला जाईल असा इशारा इराणने दिला आहे. मेजर जनरल कासिम सुलेमानी हा इराणच्या सर्वोच्च अशा इस्लामिक ... Read More »

छेत्रीच्या गोलांमुळे बेंगळुरूची गोव्यावर मात

कर्णधार सुनील छेत्रीनी नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर बेंगळुरू एफसीने आघाडीवरील एफसी गोवा संघाला २-१ नमवित हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी सहाव्या मोसमातील महत्त्वपूर्ण विजय मिळविला. कर्णधार सुनील छेत्री याने खाते उघडल्यानंतर निर्णायक गोलही केला. ह्युगो बुमूस याने दोन मिनिटांत बरोबरी साधून दिल्यानंतर आक्रमक शैलीच्या गोव्याला आणखी गोल करता आले नाहीत. श्री कांतीरवा स्टेडियमवर मध्यंतरास गोलशून्य बरोबरीची कोंडी होती. पुर्वार्धात ... Read More »

ऑस्ट्रेलिया सुस्साट; लाबुशेनचे शतक

नवोदित मार्नस लाबुशेन याने ठोकलेले चौथे कसोटी शतक व स्टीव स्मिथच्या २८व्या कसोटी अर्धशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ३ बाद २८३ अशी भक्कम स्थिती गाठली आहे. दिवसअखेर लाबुशेन १३० धावांवर खेळत असून २२ धावा करून मॅथ्यू वेड त्याला साथ देत आहे. सामन्यातील पहिली धाव घेण्यासाठी ३९ चेंडू खेळलेल्या स्मिथने लाबुशेनसह १५६ धावांची भागीदारी रचली. शतकापासून मात्र ... Read More »

अभिमान हवा, दुराभिमान नको!

 सरिता नाईक (फातोर्डा-मडगाव) मन संकुचित होऊ देऊ नका. ते इतके विशाल असू दे की त्यात सर्व धर्म सामावून जातील. जे जे चांगले असेल ते ते ग्रहण करावे, वाईट सोडून द्यावे. कुठल्याही धर्मग्रंथात वाईट शिकवण दिलेली नाही. मग द्याल ना सर्वांना नवीन सौरवर्षाच्या शुभेच्छा? नुकतीच नवीन सौर वर्षाची सुरुवात झाली. हा दिवस सर्वच धर्माचे लोक उत्साहात साजरा करतात. पूर्वसंध्येपासूनच धुमधाम सुरू ... Read More »