Daily Archives: January 3, 2020

महागाईचे चटके

नववर्षाच्या सुरवातीलाच महागाईने अलगद डोके वर काढले आहे. जनता जेव्हा उत्साही, उत्सवी मूडमध्ये असते तेव्हा हळूच तिच्या खिशाला चाट लावली तर ते चट्‌कन लक्षात येत नाही हा गुरूमंत्र आजवर बहुतेक सरकारे आणि सरकारी आस्थापने अंमलात आणताना दिसतात. या नववर्षाच्या प्रारंभीही केंद्र आणि राज्य सरकारने तेच केले आहे. रेल्वेने आपले तिकीट दर मोठ्या प्रमाणात वाढवले. तेल कंपन्यांचे इंधनाचे आणि स्वयंपाकाच्या गॅसचे ... Read More »

सरले ते अस्वस्थ वर्ष. नववर्षही तसेच?

शंभू भाऊ बांदेकर गेले वर्ष जसे गोव्याला अस्वस्थ वर्ष म्हणून गेले, तसेच जर खाणप्रश्‍न आणि म्हादईचा प्रश्‍न या वर्षात सुटला नाही, तर हे वर्ष ही अस्वस्थ वर्ष म्हणूनच गोवेकरांना अस्वस्थ करून टाकेल, अशी भीती वाटत आहे. देव करो नि हे दोन्ही प्रश्‍न मार्ग लागोत… डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपला की, आपल्याला वेध लागतात ते नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे. व्यक्तिगत जीवनात ... Read More »

सीएए समर्थनार्थ आज भाजपची रॅली

भारतीय जनता पक्षातर्फे आज शुक्रवार ३ जानेवारी रोजी संध्याकाळी पणजी शहरात केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ भव्य रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. भाजपच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर जे.पी. नड्डा ... Read More »

कॉंग्रेसचे आंदोलन सीएएविरुद्ध नसून शरणार्थींच्या विरोधात

>> पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल सीएए कायद्याविरोधात आंदोलन करणार्‍या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी सीएएविरोधात नव्हे, तर पाकिस्तानविरोधात आंदोलन करावे असा सल्ला मोदी यांनी येथे एका सभेत बोलताना दिला. कॉंग्रेस पक्ष पाकिस्तानविरोधात नव्हे तर तेथून भारतात आलेल्या शरणार्थींविरुद्ध आंदोलन करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी यांनी कॉंग्रेस पक्षाला टीकेचे लक्ष्य बनविताना म्हटले की विरोधक ... Read More »

गोव्याच्या ज्वलंत समस्यांवर नड्डा यांनी स्पष्टीकरण द्यावे

>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी >> केंद्र सरकारची भूमिका गोव्याच्या विरोधात भाजपच्या सीएए समर्थनार्थ आयोजित रॅलीला उपस्थित राहणार्‍या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यातील म्हादई, खाण बंदी, पर्यटन, रोजगार, आर्थिक स्थितीबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी गोवा प्रदेश समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केली. केंद्र सरकारच्या सीएएला देशभरातून विरोध होत असल्याने भाजपला सीएएचे समर्थन करण्यासाठी सभा ... Read More »

लोटलीतील सोसायटीकडून ३९ कोटी रु. चा गैरव्यवहार

>> पोलिसात तक्रार दक्षिण गोव्यातील लोटली येथील व्हिजनरी क्रेडिट सोसायटीने ३९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार ७३ गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हा विभागाकडे काल केली आहे. या सोसायटीमध्ये गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी आर्थिक गुन्हा विभागाकडे तक्रार करून याप्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सोसायटीमध्ये सुमारे २ हजार लोकांनी गुंतवणूक केलेले सुमारे ३९ कोटी रुपये अडकून पडले आहेत. ठेवीची ... Read More »

महाराष्ट्र, प. बंगालच्या चित्ररथांचे प्रस्ताव केंद्राने नाकारल्याने वादंग

>> सीएएच्या विरोधामुळे डावलल्याचे आरोप येथे होणार्‍या यंदाच्या प्रजासत्तात दिन सोहळ्यातील चित्ररथ संचलनात महाराष्ट्र व प. बंगाल या राज्यांचे चित्ररथ दिसणार नाहीत. त्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याने वादंग निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या राज्यांचे प्रस्ताव नामंजूर केले आहेत. या दोन्ही राज्यांनी सीएए कायद्याला विरोध दर्शविल्याने त्यांचे प्रस्ताव नामंजूर केल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आतापर्यंत सहा वेळा या ... Read More »

मडगाव घाऊक मासळी बाजारात अडथळा आणणार्‍यांवर कारवाई होणार

घाऊक मासळी बाजार व एसजीपीडीएच्या किरकोळ बाजारालगत व आत बेकायदेशीरपणे वस्तूंची विक्री करुन अडथळा आणणार्‍यांवर शुक्रवारपासून कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिकारी, मडगांव नरगपालिकेचे मुख्याधिकारी व फातोर्डा पोलिसांना दिले. काल सकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी घाऊक व किरकोळ मासळी बाजाराला भेट देवून पहाणी केली. त्यांनी घाऊक विक्रेते, एजंट रापणकार यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, ... Read More »

बंगळुरू-एफसी गोवा चुरशीची लढत आज

इंडियन सुपर लीगचा (आयएसएल) पुढील टप्पा आजपासून सुरु होत असून गतविजेता बंगळुरू एफसी आणि एफसी गोवा हे तुल्यबळ संघ शुक्रवारी येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर आमनेसामने येत आहेत. गोवा आघाडी वाढविण्याचा, तर बंगळुरू पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न करेल. या दोन संघांमध्ये पाच गुणांचा फरक आहे, बंगळुरू जिंकून तो दोन गुणांवर आणण्याचा प्रयत्न करेल. उभय संघांमधील पहिला सामना गोव्याने जिंकला. त्यानंतर बंगळुरूने ... Read More »

धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला जेतेपद

>> जीएफए अंडर-१४ प्रथम विभाग लीग धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्‌स क्लबचा ११-० असा धुव्वा उडवित गोवा फुटबॉल संघटना आयोजित १४ वर्षांखालील प्रथम विभाग लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. फातोर्डा येथील ऍस्ट्रो टर्फ मैदानावर झालेल्या या सामन्यात धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला मोठ्या विजयासह जेतेपदही मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलताना तोपोन मिर्ज, स्वॅवेल फुर्तादो आणि शाविर मोहम्मद यांनी हॅट्‌ट्रिक नोंदविल्या. तोपोन ... Read More »