Daily Archives: January 2, 2020

व्यवहार्य आहे?

नव्या वर्षाच्या आगमनासरशी गोव्याशी संबंधित असलेले आणि दीर्घकाळ लटकलेले प्रश्न पुन्हा एकवार सरकारसमोर आ वासून उभे राहिले आहेत. यात सर्वांत प्रथम विषय समोर उभा आहे तो राज्यातील खाणींचा आणि दुसरा प्रलंबित विषय आहे तो म्हादईचा. येणार्‍या काळात हे दोन्ही विषय सरकारचा पिच्छा पुरवणार आहेत. खाण प्रश्नी सरकारने दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर येत्या आठ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्याकडे ... Read More »

‘डब्ल्यूटीओ’च्या मरणकळा आणि झळा

शैलेंद्र देवळणकर आयात-निर्यात सुकर होण्यासाठी भारताला अशा अनेक विभागीय व्यापार संघटनांचे सदस्यत्व घेणे येत्या काळात अनिवार्य होणार आहे. त्याखेरीज व्यापाराच्या या स्पर्धेला भारत तोंड देता येणार नाही. डब्ल्यूटीओची तंटानिवारण व्यवस्था कमालीची संकटात सापडली आहे. या सर्वांचा अत्यंत नकारात्मक आणि गंभीर परिणाम विकसनशील, गरीब देशांवर होणार आहे. आजची आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही परस्पर विरोधाभासी प्रवाहांनी भरलेली आहे. या व्यवस्थेमध्ये एकाच वेळी दोन ... Read More »

१० फुटिरांविरोधी याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी

>> कॉंग्रेसची सभापती राजेश पाटणेकरांकडे याचिका गोवा प्रदेश कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी गोवा विधानसभेच्या सभापतींसमोर एक याचिका सादर करून कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती काल केली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी गेल्या ८ ऑगस्ट २०१९ मध्ये सभापतीसमोर कॉंग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या १० आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका ... Read More »

म्हादईसाठी सरकारने पाऊल उचलावे ः राज्यपाल

>> मदत करण्याची दर्शविली तयारी आपण म्हादई संवर्धनासाठी करायचे हवे तेवढे काम केले आहे. सरकारने यापुढे म्हादईसाठी आवश्यक पाऊल उचलले पाहिजे. आपणाकडे मदत मागितल्यास आवश्यक मदत करण्याची तयारी आहे. अन्यथा, आपण या विषयावर बोलू इच्छित नाही, असे प्रतिपादन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोनापावल येथे एनआयओच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे म्हादईच्या विषयाबाबत एक नोट चिठ्ठी ... Read More »

५१ लाखांच्या ड्रग्ससह नायजेरियनास अटक

पेडणे पोलिसांनी दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री उशिरा मानशीवाडा – कोरगाव येथे केलेल्या कारवाईत एका नाजयेरियन नागरिकाकडून सुमारे ५१ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करुन त्याला अटक केली. इफेचुकवू डेव्हिड मादुकवे असे या नाजयेरियनचे नाव असून त्याला न्यायालयासमोर उभे केले असता ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पेडण्याचे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी माहिती दिली. त्यानुसार सदर ... Read More »

दोनापावलमधील अपघातात १ ठार

दोनापावल येथे ३१ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १०.१५ च्या सुमारास फॉर्च्युनर आणि हिरो होंडा मोटर सायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटर सायकल चालक शशिनारायण या युवकाचे निधन झाले. या प्रकरणी फॉच्युनरचा चालक पवन वळवईकर याच्या विरोधात पणजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक पोलिसांकडून राज्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून पहाटेपर्यंत ९७ मद्यपी वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला. याच काळात वाहतूक नियमभंग प्रकरणी १४४८ ... Read More »

नव वर्षात पेट्रोल महागले

>> विना अनुदानित सिलिंडर १९ रु. नी महागला नवीन वर्षात पेट्रोलच्या दरात प्रति लीटर ५९ पैसे एवढी वाढ झाली आहे. राज्य सरकारने व्हॅटमध्ये १ टक्के वाढ केली आहे. राज्य सरकारकडून २० टक्के व्हॅट आकारला जात होता. १ जानेवारी २०२० पासून व्हॅट २१ टक्के करण्यात आले आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरात ५९ पैसे एवढी वाढ झाली आहे. पणजीत पेट्रोलचा दर आता ७१.७३ ... Read More »

गगनयान मोहिम ः अवकाशयात्रींची निवड

इस्रोच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेसाठी चार अवकाशयात्रींची निवड करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख के. सिवन यांनी काल पत्रकारांना दिली. या अवकाश यात्रींसाठी जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून रशियात प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेद्वारा गगनयान या अंतराळ यानातून अवकाशयात्रींना किमान सात दिवसांसाठी अंतराळात २०२२ पर्यंत पाठविले जाणार असल्याची माहिती सिवन यांनी दिली. Read More »

खलाशी योजनेची समाज कल्याणकडून कार्यवाही

गोवा सरकारच्या अनिवासी भारतीय आयोगाच्या (एनआरआय) खलाशी निवृत्ती वेतन योजनेची कार्यवाही समाज कल्याण खात्याकडून केली जाणार आहे, अशी माहिती आयोगाचे संचालक ऍन्थोनी डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. आयोगाने निवृत्त खलाशांना निवृत्ती वेतन देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. तसेच निवृत्ती वेतन योजनेसाठी येणार्‍या अर्जांची छाननी करण्यासाठी खास एजन्सीची नियुक्ती केली आहे. आयोगाकडे निवृत्ती योजनेसाठी सादर करण्यात येणार्‍या अर्जांची छाननी ... Read More »

महेंद्रसिंग धोनी, विराटकडे कर्णधारपद

>> ‘क्रिकइन्फो’चा दशकातील सर्वोत्तम संघ जाहीर क्रिकइन्फो या क्रिकेटसंबंधीच्या लोकप्रिय संकेतस्थळाने मागील दशकातील आपल्या सर्वोत्तम एकदिवसीय, टी-ट्वेंटी व कसोटी संघाची घोषणा केली. वनडे व टी-ट्वेंटी संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनी याच्याकडे सोपविण्यात आले असून विराट कोहलीला कसोटीसाठी कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. २३ सदस्यीय पथकाने सर्वोत्तम खेळाडूंची निवड केली. किमान ५० कसोटी किंवा सहा वर्षे सक्रीय (कसोटी), ७५ वनडे, १०० टी-ट्वेंटी ... Read More »