Daily Archives: January 1, 2020

नवीन वर्षा, तुझ्या स्वागता..

गतसालाचे स्मरण जागता दाटुन येते मनामध्ये भय पान नवे हे यात तरी का असेल काही प्रसन्न आशय… कवयित्री शांताबाई शेळक्यांनी आपल्या कवितेत विचारलेला हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येक नववर्षाच्या सुरवातीला नक्कीच येत असतो. नववर्षाच्या ताटामध्ये काय वाढले असेल याचे कुतूहल, उत्सुकता बाळगून आणि सरत्या वर्षासरशी मिटलेल्या पानातल्या कटुगोड आठवणी, विषाद मागे ठेवून नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सज्ज होत असतो. आम्ही ... Read More »

‘टिकटॉक’ चा शॉक!

ऍड. प्रदीप उमप टिक टॉक हे लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग ऍप सुरक्षित नसल्याचे अमेरिकेत दाखल झालेल्या एका खटल्यातून समोर आले आहे. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनीही या ऍपवर आक्षेप घेतला असून, चीनच्या परराष्ट्र धोरणास अनुकूल व्हिडिओ प्रसारित केल्याचा आणि प्रतिकूल व्हिडिओ सेन्सॉर केल्याचा आरोप टिक टॉकवर पूर्वीच झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर, हा ‘लोकप्रिय धोका’ किती काळ कायम राहतो, हे पाहावे लागेल. टिक टॉक ... Read More »

प्रसंगी खाण महामंडळ स्थापन करणार ः मुख्यमंत्री

राज्यातील खाण भागातील लोकांच्या हितार्थ खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी प्रसंगी खाण महामंडळ स्थापन करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल एका मुलाखतीत दिली आहे. आपण खाण भागातील लोकांचे प्रतिनिधित्व करीत आहे. खाण बंदीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्येची जाणीव आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला आहे. कायदेशीर मार्गाने खाण प्रश्‍न सोडविण्यासाठी ... Read More »

सीएए रद्द मागणीचा ठराव केरळ विधानसभेत संमत

सिटिझन्स अमेंडमेंट ऍक्ट तथा सीएए कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारा ठराव काल केरळ विधानसभेत संमत करण्यात आला. अशी कृती करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याआधीच सीएएची अंमलबजावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे. केरळ विधानसभेतील सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट डावी आघाडी व कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटीक फ्रंट यांनी आपसातील मतभेद विसरून ... Read More »

राज्यात आर्थिक आणिबाणीची स्थिती ः कॉंग्रेस

>> आर्थिक स्थितीवर श्‍वेतपत्रिकेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आर्थिक नियोजनात अपयशी ठरल्याने राज्यात आर्थिक आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉंग्रेस पक्षाने २० ऑक्टोबर २०१९ रोजी आर्थिक विषयावर पत्रकार परिषद घेऊन योग्य खबरदारी न घेतल्यास आर्थिक संकट निर्माण होण्याची भिती व्यक्त केली होती. वित्त खात्याने आगामी तीन महिन्यांसाठी २५ टक्के खर्च कपात करण्याबाबत जारी केलेले परिपत्रक हे आर्थिक आणिबाणीचे ... Read More »

नववर्ष २०२० ः नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त सिंगापूर येथील अशा नेत्रदीपक आतषबाजीने सारा आसमंत असा उजळून निघाला. Read More »

राज्यात नववर्षाचे जल्लोषात स्वागत

राज्यात सरत्या २०१९ वर्षाला निरोप देत नवीन वर्ष २०२० चे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांसह स्वागत करण्यात आले. नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी नवीन वर्ष स्वागत सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते. येथील सांता मोनिका जेटीवर स्वागत कार्यक्रम पार पडला. यात स्वागत कार्यक्रमात देशी-विदेशी पर्यटक तसेच नागरिकांनी सहभागी घेतला. सरत्या वर्षानिमित्त पर्यटक आणि नागरिकांनी समुद्रकिनार्‍यांवर गर्दी केली होती. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त विविध शहरे व ... Read More »

रुद्रेश्वर, पणजीचे पालशेतची विहीर प्रथम

>> कला अकादमी ‘अ’ गट मराठी नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर कला अकादमीने आयोजित केलेल्या ५२ व्या ‘अ’ गट मराठी नाटयस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून रुद्रेश्‍वर, पणजी यांनी सादर केलेल्या पालशेतची विहीर या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदिवडे यांच्या यळकोट या नाटयप्रयोगास पंचाहत्तर हजार रुपयांचे व्दितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले ... Read More »

टेबल टेनिस संघ करणार जर्मनीत सराव

जानेवारी महिन्यातील २२ तारखेपासून पोर्तुगालमधील गोंडोमार येथे होणार्‍या ऑलिम्पिक सांघिक पात्रता स्पर्धेपूर्वी भारताचा टेबल टेनिस संघ आपल्या जर्मन प्रतिस्पर्ध्यांसह सराव करणार आहे. भारताच्या पुरुष संघात जी. साथियान (३०), शरथ कमल (३४) या दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये संघ म्हणून प्रथमच पात्रता मिळविण्याची नामी संधी भारताला प्राप्त झाली आहे. टेबल टेनिस क्रमवारीत भारतीय संघ आठव्या स्थानी असून पात्रता स्पर्धेच्या केवळ उपांत्यपूर्व ... Read More »

गिरीश लायन्स, एव्हेंजर्सची घोडदौड

कुडचडे येथील वॉरिअर्स क्लबने आयोजित केलेल्या पहिल्या सांगे, केपे, धारबांदोडा मर्यादित टी-ट्वेंटी प्रीमियर लीग स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या सामन्यांत गिरीश लायन्स व एव्हेंजर्स यांनी विजयाला गवसणी घातली. कुडचडे येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात एव्हेंजर्सने ‘दामबाब’ संघावर तीन गड्यांनी विजय प्राप्त केला. प्रथम फलंदाजी करताना दामबाब संघाने २० षटकात नऊ गडी गमावून १२२ धावा केल्या. त्यांच्या राजेश वायंगणकरने ३०, ... Read More »