Monthly Archives: January 2020

ध्रुवीकरणाचा लाभ

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात पसरलेले विरोधाचे आणि हिंसाचाराचे लोण हळूहळू कमी होत गेले असले तरी दिल्लीतील शाहीन बाग परिसरामध्ये अहोरात्र सुरू असलेले ठिय्या आंदोलन मात्र अजूनही सुरू आहे. त्या प्रदीर्घ आंदोलनापासून प्रेरणा घेऊन मुंबई, बेंगलुरूसह देशाच्या अनेक शहरांत नव्याने अशा प्रकारच्या आंदोलनांस काही घटक चिथावणी देताना दिसत आहेत. गोव्यातही असे आंदोलन भडकवण्याचा नुकताच प्रयत्न झाला, परंतु विशिष्ट घटक सोडल्यास आम ... Read More »

जिल्हा पंचायत निवडणुकांची उपांत्य फेरी!

शंभू भाऊ बांदेकर आता भाजपचे बळ आणखी कॉंग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपप्रवेश केल्यामुळे वाढले आहे. अर्थात यामुळे भाजपचे मतदार अधिक बळकट बनले आहेत की सत्तास्पर्धेसाठी पदनिष्ठा, तत्वनिष्ठा, बाजूला ठेवल्यामुळे भाजपचे ‘बळ’ ‘कट’ झाले आहे. याचा प्रत्यय निवडणुकीनंतरच येणार आहे. सर्व राजकीय पक्ष जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तारखेच्या प्रतीक्षेत असतानाच जिल्हा पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आणि सर्व राजकीय पक्षांसकट अपक्षांनीही निवडणुकीच्या लगबगीस सुरुवात ... Read More »

खनिज माल वाहतुकीस सुप्रिम कोर्टाची परवानगी

>> खाणबंदीपूर्व उत्खनन केलेल्या व रॉयल्टी भरलेल्या खनिजाच्या वाहतूकीस मान्यता सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील रॉयल्टी भरलेल्या आणि खाण बंदीच्यापूर्वी उत्खनन करून खाण क्षेत्र आणि खाण क्षेत्राबाहेर जेटी, प्लॉट येथे साठवून ठेवलेल्या खनिज मालाची वाहतूक करण्यास काल हिरवा कंदील दिला आहे. न्यायालयाने खनिजाची वाहतूक करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे. राज्यातील खाण क्षेत्र आणि खाण क्षेत्राबाहेर सुमारे ९ दशलक्ष टन खनिज पडून ... Read More »

फातोडर्यातील जाहीर सभेत सीएए मागे घेण्याची मागणी

केंद्र सरकारने संमत केलेला नागरिकत्व दुरुस्ती तथा सीएए हा कायदा मागे घ्यावा व एनपीए व एनआरपी यासाठीच्या हालचाली त्वरीत बंद कराव्यात अशी मागणी करणारा ठराव काल फातोर्डा येथे सीएएविरोधात आयोजित जाहीर सभेत संमत करण्यात आला. सिटीझन ऑफ गोवा यांच्या नेतृत्वाखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला आमदार विजय सरदेसाई, चर्चिल आलेमाव, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो उपस्थित होते. या ... Read More »

कोरोनाव्हायरसचा पहिला रुग्ण सापडला केरळात

भारतातील पहिला कोरोनाव्हायरसचा रुग्ण केरळमधील एक तरुणी असल्याचे काल अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. सदर तरुणी चीनमधील वुहान विद्यापीठात शिक्षणासाठी होती. सध्या तिची प्रकृती स्थिर असून इस्पितळात तिच्यावर उपचार करणारे तज्ज्ञ तिच्यावर लक्ष ठेवून आहेत. या वृत्ताला केंद्राच्या पत्र सूचना कार्यालयाने एका निवेदनाद्वारे पुष्टी दिली आहे. इस्पितळातील एका वेगळ्या खास वॉर्डमध्ये सदर युवतीवर उपचार केले जात आहेत, असे या निवेदनात म्हटले ... Read More »

शाहीन बाग आंदोलनाला ‘आप’ची फूस ः भाजप निवडणूक

>> आयोगाकडे तक्रार दिल्लीतील शाहीन बाग येथे गेल्या दिड महिन्यापासून सुरू असलेल्या सीएएविरोधी आंदोलनाला तेथील आम आदमी पक्षाची फूस असल्याची तक्रार भाजपच्या एका शिष्टमंडळाने काल निवडणूक आयोगाकडे केली. केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन, मुख्तार अब्बास नकवी, भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव व अन्य ज्येष्ठ भाजप नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यादव यांनी निवडणूक आयोगाला माहिती दिली की शाहीन बाग येथील सीएए विरोधी ... Read More »

दिल्लीत सीएएविरोधी निदर्शकावर युवकाचा गोळीबार; विद्यार्थी जखमी

जमिया नगर येथे काल सीएएविरोधात निदर्शने सुरू असताना त्या निदर्शकांच्या दिशेने एका व्यक्तीने पिस्तुलाने गोळीबार केल्यामुळे त्या ठिकाणी वातावरण अत्यंत तणावपूर्ण बनले. या गोळीबारात जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचा एक विद्यार्थी जखमी झाला. पिस्तुलधारी व्यक्तीने सदर विद्यार्थ्याच्या डोक्यावर पिस्तुल लावून ‘ये लो आजादी’ असे उद्गार काढले असे वृत्त आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडली. जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर ही निदर्शने सुरू ... Read More »

गावकर्‍यांच्या मदतीने गावचा घडवला कायापालट

>> कोसंबी महोत्सवाच्या समारोप व्याख्यानात डॉ. राजावत गावाच्या विकासासाठी आपल्या शिक्षणाचा वापर करून गावकर्‍यांच्या मदतीने गावाचा कायापालट घडवून आणला, असे प्रतिपादन राजस्थानमधील टोक जिल्ह्यातील मालपुरा तहसिलमधील सोडा गावाच्या पहिल्या महिला सरपंच डॉ. छावी राजावत यांनी येथे काल केले. कला व संस्कृती संचालनालयाने आयोजित १३ व्या डी.डी. कोसंबी विचार महोत्सवात डॉ. राजावत यांनी चतुर्थ पुष्प गुंफले. आपल्या शिक्षणाचा समाजाच्या विकासासाठी वापर ... Read More »

गोमंतकीयांस १ फेब्रुवारीपासून कॅसिनोंवर प्रवेश बंदी

कॅसिनोमध्ये प्रवेश करण्यास गोमंतकीयांना १ फेब्रुवारी २०२०पासून बंदी घालण्यात येणार आहे. यासंबंधीचा आदेश एक – दोन दिवसात जारी केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आझाद मैदानावरील हुतात्मा दिन कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. कॅसिनोमध्ये गोवेकरांना प्रवेश बंदी करण्याची मागणी केली जात आहे. राज्य सरकारने गोवेकरांना कॅसिनोमध्ये ... Read More »

जोकोविच अंतिम फेरीत

>> केनिनने बार्टीला नमविले, मुगुरुझाचा हालेपला धक्का सर्बियाच्या अव्वल मानांकित व विद्यमान विजेत्या नोवाक जोकोविच याने स्वित्झर्लंडचा दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर याचा सरळ तीन सेटमध्ये ७-६ (१), ६-४, ६-३ असा पराभव करत आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. टेनिस सँडग्रॅन याच्याविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळताना फेडररच्या जांघेला दुखापत झाली होती. त्यामुळे बुधवारच्या सराव सत्रात फेडरर सहभागी झाला नव्हता. ... Read More »