Daily Archives: December 13, 2019

अस्वस्थतेचा हुंकार

महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी परळीतील गोपीनाथगडावर आयोजिण्यात आलेल्या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये अखेर पंकजा मुंडे यांनी आपली अस्वस्थता सूचकतेने व्यक्त केली, तर एकनाथ खडसे यांनी रोखठोक शब्दांमध्ये भाजप नेतृत्वाला खडसावले. पंकजांची भाषा सौम्य होती, तर खडसेंची परखड, एवढा फरक सोडला तरी जो घरचा अहेर द्यायचा होता तो त्यांनी व्यवस्थित दिलेला आहे. पक्षामध्ये अस्वस्थ असलेले हे दिग्गज मागासवर्गीय नेते भारतीय ... Read More »

चोडण शैक्षणिक संस्थेचा सुवर्णमहोत्सव

सौ. मंजुषा सरदेसाई चोडण बेटावर शैक्षणिक प्रगतीची ज्योत तेवती ठेवणार्‍या चोडण शैक्षणिक संस्थेस या महिन्यात ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्ताने या संस्थेच्या आजवरच्या देदीप्यमान वाटचालीविषयी – आमच्या चोडण गावात सन १९७० साली समाजसेवक व्हिक्टर सिक्वेरा, जॉन अलबर्ट लोबो, कामिलो फुर्तादो, हेरकुलानो रॉड्रिक्स, रमाकांत शिरोडकर, एम. टी. जोजेफ, तेज बहादूर सिंग आणि शिवराम चोडणकर या सुपुत्रांनी एकत्र येऊन चोडण शिक्षण संस्थेची ... Read More »

नाफ्तावाहू जहाज मुरगावात ठेवण्यास स्थानिकांचा विरोध

>> आंदोलनाचा इशारा नुशी नलिनी हे नाफ्तावाहू जहाज पाण्यावर तरंगू लागल्याने बुधवारी रात्री टगांनी ओढून मुरगाव बंदरात धक्का क्र. ८ वर आणून ठेवले. या जहाजातील नाफ्ता रस्तामार्गे इतर ठिकाणी नेण्यात येणार असल्याचे एमपीटी अध्यक्षांनी सांगितले आहे. मात्र मुरगाव बंदरातून हे जहाज हटवावे अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी समुद्रात झालेल्या चक्रीवादळाच्या प्रवाहात मुरगाव बंदरात ... Read More »

दिल्लीत रविवारी कॉंग्रेसचे म्हादई आंदोलन

कॉंग्रेस पक्ष म्हादई आंदोलन आणखीन तीव्र करणार आहे. येत्या १५ डिसेंबर २०१९ रोजी नवी दिल्ली येथे जंतरमंतरवर म्हादई प्रश्‍नी धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. कॉंग्रेस पक्षाने म्हादई जनजागृतीसाठी तालुका पातळीवर आंदोलन सुरू केले होते. तथापि, राज्यातील जमावबंदीच्या आदेशामुळे बर्‍याच तालुक्यातील आंदोलन स्थगित ठेवावे लागले. म्हादई प्रश्‍नी राजभवनावर मोर्चा नेऊ राज्यपालांचे ... Read More »

जानेवारी अखेरपासून राज्यात नवीन मोटर वाहन कायदा ः वाहतूकमंत्री गुदिन्हो

राज्यात नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी जानेवारी महिन्याच्या अखेरपासून सुरू केली जाणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी रस्ता सुरक्षा मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकाराशी बोलताना काल दिली. राज्यात रस्ता सुरक्षा महत्त्वाची आहे. रस्ते योग्य नसल्याने अपघात होतात. केंद्र सरकारने नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्याचा निर्देश सर्व राज्यांना दिलेला आहे. तथापि, राज्यातील खराब रस्त्यांमुळे नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करण्यात ... Read More »

गोव्याचा शैक्षणिक हब म्हणून विकास करणार

>> मुख्यमंत्री ः दोनापावलमध्ये पर्रीकर विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य केंद्र लवकरच सुरू केले जाणार आहे, गोवा राज्याचा शैक्षणिक हब म्हणून विकास करण्याचा मानस आहे. अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना दोनापावल येथे काल दिली. या कार्यक्रमाला विज्ञान तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो, डॉ. के. विजय राघवन, मुख्य सचिव परिमल राय, एमआयओचे ... Read More »

आसामात पोलीस गोळीबारात ३ ठार

>> नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला तीव्र विरोध नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून आसाममध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. या विधेयकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गोळीबार केला असून यात ३ जण ठार झाले आहेत. गुवाहाटी क्लबच्या बाहेर पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली असून आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करतानाच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. पोलिसांच्या गोळीबारात पाच जण जखमी झाले होते. त्यापैकी तीन ... Read More »

अयोध्याप्रश्‍नी सर्व अठराही फेरविचार याचिका फेटाळल्या

>> अखेर अयोध्या खटला बंद अयोध्येतील राम जन्मभूमी प्रश्‍नावरून दाखल करण्यात आलेल्या सर्वच्या सर्व १८ ही फेरविचार याचिका काल फेटाळण्यात आल्या. या प्रकरणी देण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि निर्मोही आखाड्यासहीत इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. त्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील ५ न्यायाधीशांच्या संविधापीठीने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे ... Read More »

सिक्किमला ९ गड्यांनी नमविले; गोव्याने गमावली बोनस गुणाची संधी

गोव्याने सिक्किमवर ९ गडी राखून सहज मात करीत प्लेट गट रणजी चषक स्पर्धेतील आपल्या अभियानाचा प्रारंभ विजयश्रीने केला. सुयश प्रभुदेसाईची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. या सामन्यात गोव्याने बोनस गुण मिळविण्याची संधीही गमावली. विजयामुळे गोव्याने आपल्या पहिल्या लढतीतच पूर्ण ६ गुण मिळविले. आता गोव्याचा दुसरा सामना १७ ते २० डिसेंबरपर्यंत मेघालयाविरुद्ध होणार आहे. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्याच्या ... Read More »

लबुशेनचे सलग तिसरे शतक

>> ऑस्ट्रेलिया ४ बाद २४८ मार्नस लबुशेनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये खेळविण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ गडी गमावत २४८ अशी धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवशी दमदार सुरुवात करून देण्यात मार्नस लबुशेन १४ चौकार व १ षट्‌कारांसह २०२ चेंडूत ११० धावांवर नाबाद खेळत आहे. युवा लबुशेनचे हे सलग तिसरे शतक होय. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात ... Read More »