Daily Archives: December 12, 2019

पाकची भाषा

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून सरकारविरुद्ध आग ओकणार्‍या विरोधी पक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार यथास्थित कात्रीत पकडले आहे. समस्त विरोधक पाकिस्तानच्या भाषेत बोलत असल्याचा जोरदार प्रहार त्यांनी केला. बालाकोटची कारवाई आणि काश्मीरचे ३७० कलम हटविण्याच्या विषयामध्येही पंतप्रधान मोदींनी आपले विरोधक पाकिस्तानचाच सूर आळवीत असल्याची टीका केली होती. खरोखरच तेव्हा काही विरोधकांनी चालवलेले युक्तिवाद पाकिस्तानच्या भूमिकेशीच मिळतेजुळते राहिले होते आणि यावेळी ... Read More »

घसरता जीडीपी आणि अमेरिकेसोबतचा करार

शैलेंद्र देवळणकर देशाच्या अर्थव्यवस्थेत आलेली मरगळ कमी होण्याचे नाव घेत नाही. देशाचा आर्थिक विकासाचा दर पाच टक्क्यांवरुन ४.५ टक्क्यांवर घसरला आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाकडून करण्यात येणार्‍या विविध उपाययोजनांमध्ये अमेरिकेसोबतच्या एका प्रलंबित व्यापार कराराचाही समावेश आहे. हा करार झाल्यास दोन्ही देशातील व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत जाणार असून अमेरिकेची भारतातील गुंतवणूक वाढेल. भारताच्या आर्थिक विकासाचा दर म्हणजे जीडीपी ग्रोथ रेट हा ... Read More »

नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

>> विधेयकाच्या बाजूने १२५; विरोधात १०५ मते, शिवसेनेचा सभात्याग प्रचंड विरोधानंतरही लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १२५ मते पडली तर विधेयकाविरोधात १०५ मते पडली. दरम्यान, लोकसभेत विधेयकाच्या बाजूने मतदान करणार्‍या शिवसेनेने राज्यसभेत मतदानावेळी सभात्याग करून आपला विरोध दर्शविला. राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झाल्याने देशातील सर्व राज्यांमध्ये हे विधेयक लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे ... Read More »

गृह आधारच्या नवीन २२ हजार अर्जांची लवकरच छाननी ः मुख्यमंत्री

>> जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने मंजुरी देणार गोवा सरकारच्या गृह आधार योजनेसाठीच्या पडून असलेल्या नव्या २२ हजार अर्जांची लवकरच छाननी करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यापासून दर महिन्यांत टप्प्याटप्प्याने ५ हजार अर्ज मंजूर केले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. एप्रिल महिन्यांपर्यंत या २२ हजार अर्जांपैकी जेवढे अर्ज योजनेसाठी पात्र ठरतील ते सर्व टप्प्याटप्प्याने मंजूर केले जातील, असे सावंत ... Read More »

गोवा विधानसभा अधिवेशन फेब्रुवारीत होण्याची शक्यता

गोवा विधानसभेचे पाच दिवसीय अधिवेशन फेब्रुवारी २०२० महिन्याच्या सुरुवातीला घेतले जाण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या आगामी अधिवेशनाच्या तारखांवर चर्चा करण्यात आली असून ४ फेब्रुवारीपासून अधिवेशनाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोवा विधानसभेचे अधिवेशन १५ जुलै ते ९ ऑगस्ट २०१९ दरम्यान घेण्यात आलेले आहे. राज्य विधानसभेचे वर्ष २०१९ मध्ये केवळ २३ दिवस कामकाज घेण्यत आलेले आहे. वर्ष २०१८ मध्ये १६ दिवस ... Read More »

गेल गॅस व भारत पेट्रोलियमसाठी मडकईत जमीन संपादित करणार

>> मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मडकई येथे २२२८ चौ. मी. एवढी जमीन ‘गेल’ गॅस लिमिटेड व भारत पेट्रोलियमच्या संयुक्त प्रकल्पासाठी संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या जमिनीत सिटी गेट स्टेशन उभारण्यात येणार असून त्यासाठी येणारा ४३ लाख रु. एवढा खर्च वरील कंपन्या करणार आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ... Read More »

म्हादईप्रश्‍नी आता तीव्र आंदोलन करणार

>> हृदयनाथ शिरोडकर ः मुक्तिदिनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कर्नाटकला कळसा-भांडुरा प्रकल्पाबाबत दिलेले पर्यावरण दाखल्याचे पत्र त्वरित मागे न घेतल्यास येत्या गोवा मुक्तिदिनी १९ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जाब विचारला जाणार आहे. कर्नाटकला दिलेला पर्यावरण दाखला मागे घेण्यासाठी आणखीन मुदत दिली जाणार नाही. यापुढे म्हादई वाचवा गोवा वाचवा आंदोलन तीव्र केले जाणार आहे. या ... Read More »

नाफ्तावाहू जहाज बाहेर काढण्यास यश

दोनापावल मार्वेळ येथे दीड महिन्यापूर्वी खडकात रुतलेले नलिनी हे नाफ्तावाहू जहाज बाहेर काढण्यात अखेर काल यश प्राप्त झाले. ते जहाज मुरगाव एमपीटीमध्ये नेण्यात येणार असल्याची माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली. दोनापावल येथे समुद्रात रुतलेले जहाज गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचा विषय बनून राहिले होते. अरबी समुद्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या चक्रीवादळामुळे मुरगाव बंदरात ठेवलेले नलिनी हे जहाज दि. २४ ... Read More »

जगाला शांती देण्याचे सामर्थ्य भारतातच

>> कला अकादमीत दलाई लामा यांचे व्याख्यान भारतातील प्राचीन शिक्षण पद्धतीची आधुनिक शिक्षणाशी सांगड घातली तर अहिंसा व करुणेची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजतील असे सांगून तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा यांनी, सकारात्मक विचारांना बळकटी दिली तर विद्ध्वंसक विचारांचे प्रमाण निश्‍चितच कमी होण्यास मदत होईल याची जाणीव दिली व अंतर्गत शांततेतून जागतिक शांतीचा संदेश देण्याचे सामर्थ्य भारतात आहे याकडे लक्ष वेधले. कला अकादमी ... Read More »

यशपाल व इक्बालच्या अर्धशतकांमुळे सिक्किमने पराभव लांबवला

यशपाल सिंह आणि आणि इक्बाल अब्दुल्ला यांच्या अर्धशतकांमुळे सिक्किमने गोव्याविरुद्ध आपल्या दुसर्‍या डावात ८ बाद ३१७ धावा करीत पराभव चौथ्या दिवसावर लांबवला. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या प्लेट गट रणजी लढतीत सिक्किमने तिसर्‍या दिवसअखेर ३१ धावांची आघाडी मिळविलेली असून त्यांचे केवळ २ गडी बाकी आहेत. दुसर्‍या दिवसाच्या २ बाद २२ धावांवरून पुढे खेळताना सिक्किमची एकवेळ ६ बाद ६१ ... Read More »