Daily Archives: December 10, 2019

फुटिरांचा विजय

कर्नाटकमधील विधानसभेच्या पंधरा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने काल निर्विवाद अग्रेसरत्व सिद्ध केले. परंतु कुमारस्वामी सरकार पाडत केवळ स्वार्थासाठी भाजपमध्ये सामील झालेल्या कॉंग्रेस व जेडीएसमधील या फुटिरांना जनतेने पुन्हा निवडून देणे हे केवळ उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याच्या मतदारांच्या मतलबी प्रवृत्तीमुळेच घडून आलेले आहे. त्यामुळे या विजयात शेखी मिरवण्यासारखे संबंधितांपाशी काही नाही. स्वार्थासाठी सरकार पाडून दुसर्‍या पक्षात सामील होणार्‍या फुटिरांना मतदारांनी उदार ... Read More »

महाराष्ट्रात नव्या समीकरणांचे संकेत

देवेश कु. कडकडे (डिचोली) अनुकूल परिस्थिती असताना मित्रपक्षांना तुच्छ लेखण्याचे आणि प्रतिकूल काळात असताना नमते घ्यायचे हीच रणनीती आजपर्यंत भाजपाने अवलंबवली. २०१४ साली केंद्रात केवळ एकच मंत्रिपद देऊन बोळवण केलेल्या शिवसेनेने भाजपाचा असली चेहरा ओळखला होता. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल हा शब्द अखेर उद्धव ठाकरेंनी खरा करून दाखवून भाजपाच्या नाकावर टिच्चून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संधान ... Read More »

कर्नाटकात येडियुरप्पा सरकार बहुमतात

>> पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय कर्नाटकमधील विधानसभेच्या १५ जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून १५ पैकी १२ जगांवर भाजपने विजय प्राप्त केला आहे. कॉंग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले असून कॉंग्रेसने पराभव मान्य केला आहे. राज्यातील १५ जागेच्या पोटनिवडणुकीसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान झाले होते. या विजयामुळे बीएस येडियुरप्पा सरकार आता बहुमतात आले आहे. कर्नाटकात एकूण २२३ ... Read More »

श्रीपाद नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीची ‘पंचविशी’ पूर्ण

>> व्हिडिओ संदेशाद्वारे मानले जनतेचे आभार उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला काल दि. ९ डिसेंबर रोजी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यासंबंधी काल जारी केलेल्या एका व्हिडिओ संदेशाद्वारे जनतेचे आभार मानतानाच नाईक यांनी काही आठवणींना उजाळा दिलेला आहे. ते म्हणतात की ९ डिसेंबर १९९४ या दिवशी पहिल्यांदाच भाजपने राज्यातील विधानसभेत प्रवेश केला. या दिवशी ... Read More »

आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांना एस्मा

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य खात्यामधील चतुर्थ श्रेणी (एमटीएस) कर्मचार्‍यांच्या नियोजित तीन दिवसीय संपाच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांसाठी एस्मा लागू करण्यात आला आहे. या संबंधीचा आदेश गृहखात्याचे अतिरिक्त सचिव अमरसेन राणे यांनी काल दि. ९ रोजी जारी केला आहे. या आदेशाद्वारे सरकारी इस्पितळ, दवाखान्यामधील कर्मचार्‍याच्या संपावर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍याच्या (एमटीएस) संपाच्या पार्श्‍वभूमीवर एस्मा लागू ... Read More »

माशांतील फार्मेलिन विषयीचा अहवाल ऑगस्टमध्ये अधिसूचित

>> उच्च न्यायालयात एङ्गएसएसएआयची माहिती माशांमध्ये नैसर्गिकरीत्या होणार्‍या ङ्गॉर्मल्डिहाइड विषयीचा अहवाल ऑगस्ट २०२० पर्यंत अधिसूचित केला जाईल, अशी माहिती एङ्गएसएसएएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अगरवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला काल दिली. येथील उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ङ्गार्मलिन-इन-ङ्गिश मुद्यांवर दाखल झालेल्या पाच जनहित याचिकेसंदर्भात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे (एङ्गएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पवन अगरवाल यांनी उच्च ... Read More »

गृहमंत्र्यांनी लोकसभेत मांडले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक

लोकसभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडले. यावेळी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक चुकीचे असल्याचे दाखवून द्या. आम्ही तात्काळ हे विधेयक मागे घेऊ, असे आव्हानच शहा यांनी काल विरोधकांना दिले. भारतातील अल्पसंख्याकांची जशी आपल्याला चिंता वाटते, तशीच चिंता आम्हाला शेजारील देशातून येणार्‍या अल्पसंख्याकांबाबत वाटत असल्याचे शहा यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, विधेयक मांडण्याच्या बाजूने शिवसेनेने मतदान केले आहे. भाजपच्या ... Read More »

गोवा फलोत्पादन मंडळातर्फे ९० रु.नी कांदा विक्री सुरू

>> खुल्या मार्केटमध्ये दरात घट गोवा फलोत्पादन महामंडळाने अखेर काल सोमवार दि. ९ डिसेंबरपासून ९० रुपये प्रति किलो दराने कांद्याच्या विक्रीला सुरुवात करून कांद्यांच्या दरवाढीमुळे त्रस्त बनलेल्या नागरिकांना दिलासा दिला. दरम्यान, गोवा फलोत्पादन महामंडळाने कमी दरात कांद्याची विक्री सुरू करताच खुल्या मार्केटमधील कांद्यांच्या दरात ३० ते ४० रुपये घट झाली आहे. राज्यातील फलोत्पादन महामंडळाच्या कांद्यांच्या विक्री दरात १२९ रुपये प्रति ... Read More »

पद्मश्री सुरेश आमोणकर यांना अखेरचा निरोप

पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर यांना काल सोमवारी मुख्यमंत्री, मंत्रिगण, चाहते, विद्यार्थी आणि अनेक प्रतिष्ठिक नागरिकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. म्हापसा येथील जी. एस्. आमोणकर विद्यालयाच्या सभागृहात पद्मश्री आमोणकर यांचे पार्थिव लोकांच्या दर्शनासाठी ठेवले होते. यावेळी पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी उपमुख्यमंत्री ऍड. दयानंद नार्वेकर, माजी पर्यटनमंत्री तथा थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, एलिना ... Read More »

सिक्किम १३६वर गारद; गोव्याची दमदार सुरुवात

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे गोव्याने प्लेट गट रणजी चषक स्पर्धेच्या आपल्या शुभारंभी लढतीत काल सिक्किमला १३६ धावांवर गारद केले. प्रत्युत्तरात स्मित पटेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पहिल्या दिवसअखेरपर्यंत ३ गडी गमावत १२४ धावा केल्या असून ते केवळ १२ धावांनी पिछाडीवर आहेत. पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर ही स्पर्धा खेळविली जात आहे. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला व त्याचा हा निर्णय ... Read More »