Daily Archives: December 9, 2019

ज्ञानतपस्वी

चंद्रमे जे अलांच्छन | मार्तंड जे तापहीन ॥ ते सर्वांहि सदा सज्जन | सोयरे होतु ॥ काल दिवंगत झालेले गोमंतकीय ज्ञानतपस्वी पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर यांच्या बाबतीत ज्ञानेश्वरीतील पसायदानाच्या या ओव्या शब्दशः लागू होतात. गोव्यातील भाषावादाच्या अवघ्या कोलाहलामध्ये, भाषा हे वादाचे नव्हे, तर संवादाचे माध्यम आहे यावर दृढ विश्वास ठेवून ‘एकला चलो रे’ या निष्ठेने आपले विधायक अनुवादकार्य एकहाती पुढे ... Read More »

खरेच देवेंद्रांचा पराभव झाला?

ल. त्र्यं. जोशी फडणवीस यांच्या भाजपाला निवडणुकीत बहुमत मिळाले नसेलही, पण त्यांनी शिवसेनेच्या सोबत महायुती म्हणून निवडणूक लढविली होती व तिला २८८ पैकी १६१ जागांचे बहुमत मिळाले होते. त्यामुळे हाही पराभव म्हणता येणार नाही. निकालांनंतर सत्तेसाठी शिवसेनेने भूमिका बदलली हा तिच्या रणनीतीचा भाग. पण त्यामुळे फडणवीस पराभूत ठरत नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात एबीपी माझा या ... Read More »

पद्मश्री सुरेश आमोणकर यांचे निधन

गोव्यातील सुप्रसिद्ध लेखक, शिक्षणतज्ज्ञ, अनुवादक, बहुभाषा कोविद अशी ओळख असलेले कोकणी अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री सुरेश गुंडू आमोणकर (८४) यांचे अल्पकालीन आजाराने काल पणजीतील एका खासगी रुग्णालयात दुपारी २ वा. निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. २२ मार्च १९३५ रोजी त्यांचा बोरी येथे जन्म झाला. गोवा मुंबई, पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले. विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर (एमए बीटी) ... Read More »

दिल्लीतील धान्य बाजाराला आग, ४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली येथील धान्य बाजार परिसरात असलेल्या कारखान्यांना काल रविवारी पहाटे आग लागून या आगीत आत्तापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत अनेकजण जखमी झाले असून जखमींना त्वरित एलएनजेपी, हिंदू राव आणि आरएमएल इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ३० बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळाले असून बचाव कार्य अजूनही सुरूच आहे. दिल्लीतील धान्य ... Read More »

भाजप प्रदेशाध्यक्षांची डिसेंबर अखेरीस निवड

भारतीय जनता पक्षाच्या नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड डिसेंबर २०१९ च्या अखेरीस केली जाणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांच्या नावांची चर्चा सुरू असली तरी केंद्रीय निरीक्षकांकडून प्रदेशाध्यक्षांची निवड बिनविरोध केली जाणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेश निवडणूक समितीचे प्रमुख तथा सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी दिली. राज्यात भाजपची मतदार व जिल्हा पातळीवरील पक्षीय निवडणूक प्रक्रिया येत्या १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. उत्तर गोव्यातील ... Read More »

नाफ्तावाहू जहाज ओढून बाहेर काढण्याचे प्रयत्न

दोनापावल मार्वेल येथे समुद्रात रुतलेले नूशि नलिनी हे नाफ्तावाहू जहाज एका टग जहाजाच्या साहाय्याने ओढून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. नेदरलॅण्डच्या मास्टर मरिना या कंपनीने या जहाजातील धोकादायक नाफ्ता बाहेर न काढता जहाज एका टग जहाजाच्या साहाय्याने ओढून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. जहाज बाहेर काढण्यापूर्वी जहाजातील नाफ्ता बाहेर काढण्यात येणार आहे, अशी माहिती यापूवी देण्यात आली ... Read More »

फलोत्पादन मंडळातर्फे स्वस्त दरात कांदा

गोवा फलोत्पादन मंडळाने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाशिक – महाराष्ट्र येथून सुमारे २५ टन कांद्यांची खरेदी केली असून सोमवारपासून ९० ते १०० रुपये प्रति किलो अशा माफक दरात कांद्यांची विक्री केली जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष, आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल दिली. राज्यातील बाजारपेठेत कांद्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. खुल्या बाजारात कांदा १५० ते १७० रुपये प्रति ... Read More »

रेईश मागुश ग्रामसभेत वेरेत कॅसिनोला विरोध

कॅसिनो वेरेत आणण्याच्या प्रश्‍नावर रेईश मागुश पंचायतीने काल रविवारी खास ग्रामसभा बोलावली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी वेरेत कॅसिनोला तीव्र विरोध दर्शवल्याने ही ग्रामसभा बरीच वादळी ठरली. ग्रामस्थांनी सरपंचांवर विध प्रश्‍नांचा भडिमार केला. तसेच पंचायतीने जो कसिनो मालकांना जेटी बांधण्यासाठी तात्पुरता परवाना दिला आहे तो त्वरित मागे घ्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्श् करीत होते. त्यामुळे आमदार जयेश साळगावकर यांना मध्यस्थी करावी ... Read More »

सुपर-सब मानवीरच्या गोलमुळे एफसी गोवाची बाजी

हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी एफसी गोवान हैदराबाद एफसीवर १-० अशी मात केली. दुसर्‍या सत्रात बदली खेळाडू मानवीर सिंग याने केलेला गोल निर्णायक ठरला. फेरॅन कोरोमीनास नसताना मानवीर हा गोव्यासाठी सुपर-सब ठरला. गोव्यासाठी हा विजय अत्यंत बहुमोल ठरला. स्पेनचा स्टार स्ट्रायकर कोरोमीनास सलग तिसर्‍या लढतीस दुखापतीमुळे मुकला. तो नसताना मागील दोन लढतींत त्यांना विजय मिळविता आला नव्हता. आधी जमशेदपूरविरुद्ध ... Read More »

विंडीजची भारतावर मात; मालिकेत बरोबरी

लेंडल सिमन्सने मिळालेल्या जीवदानाचा फायदा उठवित नोंदविलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे वेस्ट इंडीजने तिरुवनंतपुरमध्ये खेळविण्यात आलेल्या दुसर्‍या टी-२० लढतीत भारताचा २ गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. सलग दुसर्‍या सामन्यातील गचाळ क्षेत्ररक्षणाचा फटका टीम इंडियाला बसला. विंडीजने ७ पराभानंतर भारताविरुद्ध हा पहिला विजय नोंदविला आहे. भारताकडून मिळलेले १७१ धावांचे लक्ष्य विंडीजने १८.३ षट्‌कांत गाठले. विंडीजला हे ... Read More »