Daily Archives: December 7, 2019

‘बरे झाले!’

संपूर्ण देश हादरवून सोडणार्‍या हैदराबादच्या तोंडापल्लीतील बलात्कार प्रकरणाचे चारही आरोपी पोलीस एनकाऊन्टरमध्ये काल ठार झाले. मानवतावादाचे स्वयंघोषित कैवारी आता या एनकाऊन्टरविषयी संशय व्यक्त करतील, संबंधित पोलिसांविरुद्ध कारवाईचा आग्रहही धरतील, बहुधा त्यांची न्यायालयीन चौकशीही होईल, परंतु हे दांभिक काहीही म्हणोत, संपूर्ण देशामध्ये या घटनेमुळे आज जी समाधानाची लाट उसळलेली दिसते आहे, त्याला अशा बलात्काराच्या घटनांमध्ये सर्रास प्रत्ययाला येणारा आपल्या एकंदर न्यायव्यवस्थेचा ... Read More »

हेरगिरीचा खटला आणि पाक अण्वस्त्रांची सुरक्षा

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या हेरगिरीच्या प्रकरणात पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचे लाडके सावज आणि आयएसआय, पाकिस्तानी सेना व सरकारचा आदिम शत्रू असलेल्या भारताचे नाव कुठेही आले नाही. या हेरगिरीचा उगमकर्ता, पाकिस्तानला १४५ बिलियन डॉलर्सची सैनिकी व आर्थिक मदत देणारा पाकिस्तानचा अनेक वर्षांपासूनचा मित्र, अमेरिका आहे. पाकिस्तान अमेरिकेपासून अनेक गोष्टी गुप्त राखतो असे अमेरिकेचे ठाम मत आहे. त्यासाठी अमेरिका ... Read More »

बलात्कार खून प्रकरणातील सर्व आरोपी एनकाऊंटरमध्ये ठार

गेल्या आठवड्यात हैदराबाद येथे एका पशुवैद्य असलेल्या २५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिला जाळून ठार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सर्व चारही आरोपी काल (शुक्रवारी) पोलिसांच्या कथित एनकाऊंटरमध्ये मृत्यूमुखी पडले. सायबराबादचे पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी ही माहिती दिली. घटनेनंतर देशभर मोठी खळबळ उडाली. देशाच्या विविध शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर येऊन मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. याप्रकरणी विविध थरातील नागरिकांनी ... Read More »

केंद्राच्या धोरणानुसारच मडगावमधील जिल्हा इस्पितळ पीपीपी तत्वावर

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणेंची माहिती मडगाव येथील दक्षिण जिल्हा इस्पितळ सार्वजनिक व खासगी तत्त्वावर (पीपीपी) चालवण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या धोरणानुसार घेण्यात आलेला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. एमसीआयच्या वैद्यकीय महाविद्यालय स्थापना नियम १९९९ मधील कलम २ (५) (२) नुसार सरकारी इस्पितळ सार्वजनिक व खासगी तत्त्वावर स्थापन करता येत असल्याचे राणे यावेळी म्हणाले व त्यानुसारच ... Read More »

सर्व विद्यालयांच्या अनुदानाचा विषय १५ दिवसांत निकालात

शिक्षण खात्याने राज्यातील अनुदानित विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालयांना अनुदान वितरित करण्यास सुरुवात केली असून येत्या पंधरा दिवसांत सर्व विद्यालयांच्या अनुदानाचा विषय निकालात काढला जाणार आहे. मागील दोन दिवसात सुमारे एक कोटी रुपयांचे विद्यालय व्यवस्थापन अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकार्‍यांनी काल दिली. राज्यातील अनुदानित माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयांना दरवर्षी व्यवस्थापन अनुदान दिले जाते. शिक्षण खात्याकडून ... Read More »

कोहलीच्या नाबाद खेळीमुळे टीम इंडिया विजयी

कर्णधार विराट कोहलीचे तडफदार नाबाद अर्धशतक आणि लोकेश राहुलच्या ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने हैदराबादेत झालेल्या पहिल्या वन-डेत वेस्ट इंडीजला ६ गड्यांनी पराभूत करीत तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडीजकडून मिळालेले २०८ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षट्‌कांत २०९ धावा करीत गाठले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा केवळ ८ धावा जोडून खॅरी पियेरेच्या गोलंदाजीवर ... Read More »

गोव्याची पहिल्याच दिवशी सामन्यावर पकड

>> कूच बिहार चषक क्रिकेट मडगाव क्रिकेट क्बबच्या मैदानावर कालपासून सुरू झालेल्या १९ वर्षांखालील कूच बिहार क्रिकेट लढतीत गोव्याने मणिपुरविरुद्ध पहिल्याच दिवशी मजबुत पकड मिळविलेली ओ. गोव्याच्या २०७ धावांच्या प्रत्युत्तरात मणिपुरच्या स्थिती ८ बाद ६४ अशी बिकट झालेली आहे. गोव्याकडून तेज गोलंदाज ऋत्विक नाईकने माणिपुरी फलंदाजी कापून काढताना केवळ १८ धावांत ६ गडी बाद केले. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना सर्व ... Read More »

पणजीतील अविस्मरणीय वास्तूंचे ऋणानुबंध

 रमेशचंद्र जतकर प्रसिद्ध संचालक (निवृत्त) गोवा सरकार असे हे माझे पणजीतील वास्तूंचे आणि त्यातील व्यक्तींचे ऋणानुबंध. हे संबंध म्हणजे एक इंद्रधनुष्यच आहे. आज पणजी पूर्वीसारखी नसली तरी या वास्तूंनी पणजीचे ऐतिहासिक महत्त्व आणि सौंदर्य टिकवले आहे. ते तसेच राहो अशी माझी विधात्याकडे प्रार्थना. आपण या जगात अवतरलो ती जन्मवेळ, जन्मस्थळ, शिक्षण, कार्यक्षेत्र, कार्यप्रदेश, त्यातील वास्तू आणि त्या राहणार्‍या व्यक्तींशी आलेले ... Read More »

प्रा. प्राची जोशी यांची कादंबरी-समीक्षा

 डॉ. वासुदेव सावंत प्रा. प्राची जोशी यांच्या समीक्षापर पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येत्या दि. ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पीईएस महाविद्यालय, फर्मागुढी येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, तसेच प्रकाशक स्नेहल तावडे व मराठी समीक्षक नीला पांढरे यांची उपस्थिती असेल. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास पिसुर्लेकर व विभागप्रमुख दीपक छत्रे असतील. ... Read More »

खिडकी

 गौरी भालचंद्र घराचा अविभाज्य भाग असणारी, घरात चैतन्य निर्माण करणारी, घराला जग दाखवणारी आणि भल्या मोठ्या जगाला आपल्या इवल्याशा चौकटीत बांधणारी ही खिडकी फार पूर्वीच्या काळापासून निरनिराळ्या रूपांमध्ये आपल्यासमोर आलेली आहे. माझी घरातील आवडती जागा म्हणजे खिडकी…. मला माझ्या घरातील हॉलची खिडकी फारच प्रिय आहे. खिडकीजवळ उभारून खाली रस्त्यावरून जाणार्‍या गाड्या पाहणे असो किंवा आजूबाजूचा परिसर… वेळ कसा मजेत जातो. ... Read More »