Daily Archives: December 6, 2019

नाराजांची खदखद

कोणत्याही संघटनेमध्ये सर्वांचे सदाकाळ समाधान शक्य नसते. त्यामुळे मतभेद निर्माण होणे हेही स्वाभाविक असते, परंतु सातत्याने असे मतभेद होत राहिले आणि ते मिटवण्याचा प्रयत्न होण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न चालत राहिले तर त्यामधून दुफळी निर्माण होते आणि त्याचे दुष्परिणाम त्या संघटनेला भोगावे लागतात. दुफळी हा झाला पुढचा टप्पा, परंतु त्याचे संकेत देणारी खदखद मात्र आधीपासून सुरू झालेली असते आणि वेळीच ... Read More »

संजीवनीला संजीवनी देणे गरजेचे

शंभू भाऊ बांदेकर गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्याला सर्व प्रकारची मदत करून झाली, पण अत्यंत निर्जीव अवस्थेत असलेल्या कारखान्याला पुन्हा पुन्हा संजीवनी देऊनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्यामुळे सरकारला नवीन कारखान्याचे पाऊल उचलावे लागत आहे. सहकारमंत्र्यांची स्तुत्य अशीच ही घोषणा असून त्याचे सर्वत्र स्वागत झाले पाहिजे. गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री कै. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सहकार क्षेत्राचे महत्त्व ओळखून गोव्यास सहकार क्षेत्रातील ... Read More »

मोपावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण ः निवाडा राखून

सर्वोच्च न्यायालयात मोपा ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पर्यावरण दाखल्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निवाडा राखून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयात जानेवारी २०१९ मध्ये एनजीओ रेनबो वॉरियर्स आणि हनुमंत आरोसकर यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) आदेशाला आव्हान देणार्‍या दोन याचिका दाखल केल्या आहेत. गेल्या मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोपा ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाचा पर्यावरणीय दाखला स्थगित ठेवून केंद्रीय पर्यावरण व ... Read More »

कांदा खरेदीसाठी फलोत्पादनला १५ कोटी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा फलोत्पादन महामंडळाला कांदा खरेदीसाठी १५ कोटी रुपये काल मंजूर केले. सरकारने मंजूर केलेला पंधरा कोटींचा निधी महामंडळाला प्राप्त झाल्यानंतर कांद्यांची खरेदी करून कमी दरात कांद्यांची विक्री केली जाणार आहे. महामंडळाने नवीन पुरवठादारांकडून कांदा खरेदीसाठीचा प्रयत्न थांबविला आहे. जुन्याच पुरवठादारांकडून कांद्याची खरेदी केली जाणार आहे, अशी माहिती फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रवीण झांट्ये यांनी काल ... Read More »

सोनसडा कचर्‍याला पुन्हा भीषण आग

>> वीज वाहिनीच्या लोखंडी सळईला स्पर्शामुळे आग; एक जखमी सोनसडा येथील कचर्‍याची पहाणी करताना लोखंडी सळईचा स्पर्श ३३ केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनाला झाल्याने त्या आगीची ठिणगी कचर्‍यावर पडून क्षणार्धात कचर्‍याने पेट घेला. तसेच वीज वाहिनीचा धक्का लागून वैभव फटवाल (४५) हा कर्मचारी भाजला. त्याला गोवा वैद्यकीय इस्पितळात दाखल केले आहे. ही घटना काल दुपारी १.३० वा. च्या दरम्यान घडली. ... Read More »

पर्यटन खात्याच्या संचालकपदी पुन्हा मिनिनो डिसोझा

>> नागरी सेवेतील १६ अधिकार्‍यांच्या बदल्या राज्य सरकारच्या नागरी सेवेतील १६ अधिकार्‍यांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला. पर्यटन खात्याच्या संचालकपदी पुन्हा एकदा मिनिनो डिसोझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरेंद्र नाईक यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी (१) दक्षिण, प्रसन्न आचार्य यांची सदस्य सचिव – रवींद्र भवन मडगाव, राजेंद्र मिरजकर यांची संचालक – सरकारी छापखाना, आग्रेलो फर्नांडिस यांची अतिरिक्त जिल्हाधिकारी (२) दक्षिण ... Read More »

आर्थिक स्थितीवरून चिदंबरम यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

तिहार तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्याच्या २४ तासांच्या आत खासदार तथा माजी केंद्रीय वित्त मंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन देशातील सध्याच्या आर्थिक स्थितीवरून केंद्रातील मोदी सरकारचे वाभाडे काढले. चुकीच्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. मात्र केंद्र सरकारला त्यातून सावरण्यासाठी काय करावे तेच कळेनासे झाले आहे. या सर्वांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही अशा शब्दात ... Read More »

‘कॅसिनो स्थलांतर प्रक्रिया मी मंत्री असताना झालेली नाही’

  वेरेत कॅसिनो स्थलांतराच्या विरोधकांना पाठिंबा ः कॉंग्रेस मांडवी नदीतील तीन तरंगते कॅसिनो वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्यासाठी विरोध करणार्‍या नागरिकांना कॉंग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते तुलियो डिसोझा यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे खोल समुद्रात स्थलांतरित करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. तथापि, तीन कॅसिनो जहाजे वेरेच्या दिशेने स्थलांतरित करण्याचा निर्णय ... Read More »

भारत-विंडीज पहिला टी-२० आज

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन लढतींच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळविण्यात येणार आहे. भारतीय संघ या सामन्यात विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार असून लोकश राहुल आणि ऋषभ पंत पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकात आपली जागा निश्‍चित करण्याच्या ध्येय बाळगून असतील. भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणार्‍या टी-२० विश्वचषकासाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भारताच्या बर्‍याचशा खेळाडूंचे स्थान ... Read More »

चौथ्या दिवशी भारताला ३० सुवर्णपदके

>> १३वी दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा येथे सुरू असलेल्या १३व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आपला धडाका सुरूच ठेवताना काल तब्बल ३० सुवर्णपदके मिळविली. काल मिळविलेल्या ३० सुवर्ण, १८ रौप्य व ८ कांस्यपदकांमुळे भारताने पदकतक्त्यात शंभरी पार केली आहे. ६२ सुवर्ण, ४१ रौप्य आणि २१ कांस्य मिळून भारत एकूण १२४ पदकांसह आपले अव्वल स्थान भक्कम केले आहे. यजमान नेपाळ ३६ ... Read More »