Daily Archives: December 5, 2019

अखेर जामीन

देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने काल आयएन एक्स मीडिया प्रकरणात शेवटी जामीन मंजूर केला. त्यामुळे तिहार तुरुंगातून सुटकेचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. अर्थात, जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना काही रास्त अटी घातलेल्या आहेत. दोन लाख रुपये जामीन भरावा, देश सोडून जाऊ नये यासाठी आपला पासपोर्ट सीबीआयच्या हवाली करावा, साक्षीदारांवर दबाव आणू नये, चौकशीला बोलावले जाईल तेव्हा हजर ... Read More »

इस्राईलमधील अस्थिरता आणि अमेरिकेची भूमिका

शैलेंद्र देवळणकर रिपब्लिकन पक्षाच्या काळात अमेरिकी सरकारवरील तेथील ज्यू लॉबीचा प्रभाव खूप सबळ झाला आहे. पण त्या दबावातून अमेरिका घेत असलेल्या निर्णयांमुळे आखाती प्रदेशातील राजकाऱणाला कलाटणी मिळून तिथे शांतता प्रस्थापित होण्याऐवजी कमालीची अस्थिरता, अशांतता प्रस्थापित होणार आहे. पॅलेस्टाईन आणि इस्राईल यांचा प्रश्‍न सुटण्याऐवजी तो अधिकच चिघळत जाणार आहे. इस्राईल हा भारताचा पारंपरिक मित्र देश. भारतात इस्राईलची चर्चा प्रामुख्याने शेती आणि ... Read More »

पी. चिदंबरम यांची जामीनावर मुक्तता

>> सर्वोच्च न्यायालयाने बाजूला सारला दिल्ली उच्च न्यायालयाचा निवाडा तिहार तुरूंगात तीन महिन्यांहून अधिक काळ घालविल्यानंतर अखेर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तथा माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना काल सर्वोच्च न्यायालयाने आयएनएक्स मिडिया प्रकरणी सशर्त जामीन मंजूर केला. न्यायालयीन प्रक्रियांच्या औपचारीक पूर्ततेनंतर रात्री उशिरा चिदंबरम यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. पुत्र तथा खासदार कार्ती चिदंबरम, त्यांचे समर्थक व कॉंग्रेस कार्यकर्ते यांनी ... Read More »

मंत्री असताना जयेश साळगावकर यांनी आक्षेप का घेतला नाही?

>> कॅसिनो स्थलांतरावर लोबोंचा सवाल साळगावचे आमदार जयेश साळगावकर हे बंदर कप्तान मंत्रिपदी असताना मांडवितील कॅसिनोच्या वेरेच्या बाजूने स्थलांतराची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यावेळी साळगावकर यांनी कॅसिनो जहाजाच्या स्थलांतराला आक्षेप घेतला नाही. आता, विरोधी पक्षात असल्याने कॅसिनोच्या स्थलांतराला विरोध करीत आहेत, असा आरोप बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल केला. बंदर कप्तान खात्याने मांडवी नदीतील तीन कॅसिनो ... Read More »

विजय सरदेसाई सरकारात असताना का गप्प बसले?

>> मेडिकल कॉलेजप्रश्‍नी विश्‍वजित राणे दक्षिण गोव्यातील नियोजन पीपीपी तत्त्वावरील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्‍नावरून आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. विजय सरदेसाई यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत विविध प्रश्‍न उपस्थित करून आरोग्य मंत्री राणे यांनी स्पष्टीकरण करण्याची मागणी केली आहे. तर, विजय सरदेसाई हे विरोधी पक्षात असल्याने खासगी महाविद्यालयाला विरोध ... Read More »

जवानाने गोळ्या झाडून ५ सहकार्‍यांना केले ठार

>> छत्तीसगडमधील आयटीबीपी छावणीतील घटना >> स्वतःलाही संपवले छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाच्या एका जवानाने काल बेछूट गोळीबार करीत आपल्या ५ सहकार्‍यांना ठार केले व स्वतःलाही संपवले. त्याच्या गोळीबारात आणखी दोघेजण जखमी झाले आहेत. रायपूर येथून ३५० कि. मी. अंतरावरील कडेनार या खेड्यातील आयटीबीपीच्या एका छावणीत सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक ... Read More »

पारोडा-केपेतील युवकाचा सुर्‍याने भोसकून खून

कोरीयाद-मुळस पारोडा येथे मिनीनो ऑलिव्हेरा या अडतीस वर्षिय युवकाचा मृतदेह त्याच्या घरा शेजारी धारदार सुर्‍याने भोसकून खून केल्याच्या स्थितीत काल आढळून आला. सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रामस्थांना सदर मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी केपे पोलिसांना सदर घटनेची कल्पना दिली. केपे पोलीस त्वरित घटनास्थळी हजर झाले. मयत ऑलिव्हेरा याच्या घरापासून साठ मीटर अंतरावर त्याचा मृतदेह पडून होता. मात्र त्याच्या पोटात खुपसलेला सुरा त्याच्या ... Read More »

सुदानमधील कारखान्यातील स्फोटात १८ भारतीय मृत्यूमुखी

सुदान देशातील एका सिरॅमिक कारखान्यात काळ एलपीजी टँकरच्या झालेल्या स्फोटात २३ जण ठार झाले असून त्यात १८ भारतीयांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. सुदानमधील भारतीय दुतावासाने या वृत्ताला दुजोरा दिला असून या दुर्घटनेत १३० जण जखमी झाले असल्याचे म्हटले आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पूर्णपणे जळालेले असल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले आहे. या स्फोटानंतर कारखान्यात कामावर असलेल्या, बेपत्ता झालेल्या ... Read More »

मुख्यमंत्र्यांची रेल्वे अधिकार्‍यांशी होस्पेट-वास्को मार्गावर चर्चा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांशी होस्पेट – तिनई घाट ते वास्को पर्यंतच्या रेल्वे मार्गाबाबत काल चर्चा केली. या रेल्वे मार्गाच्या विस्ताराचा प्रस्ताव विचाराधीन आहे. रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी वन विभागातील हजारो झाडांची कत्तल करावी लागणार आहे. राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत रेल्वे मार्गाच्या विस्ताराच्या प्रश्‍नावर चर्चा झाली. झाडांच्या कत्तलीबाबत अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर ... Read More »

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट पुन्हा नंबर १

कोलकातात झालेल्या बांगालदेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात केलेल्या १३६ धावांच्या शतकी खेळीचा फायदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला झाला असून त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान मिळविले आहे. शतकामुळे विराटचे ९२८ गुण झाले असून तो अव्वल स्थानी विराजमान झालेला आहे. अव्वल स्थानी असलेला ऑस्ट्रेलियन स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या स्थानी घसरला आहे. पाकविरुद्धच्या दुसर्‍या लढतीत त्याला पहिल्या डावात ४ व दुसर्‍या डावात ३६ ... Read More »