Daily Archives: December 4, 2019

कांदा कडाडला

देशाच्या इतर भागांप्रमाणेच गोव्यातही कांद्याचे दर कडाडले आहेत. कांदा कापला जाताना गृहिणींच्या डोळ्यांत पाणी आणतो, परंतु खुल्या बाजारात शंभरी पार केलेल्या कांद्याने बाजारहाट करणार्‍या पुरुषांच्याही डोळ्यांत पाणी आणलेले दिसते आहे. कांद्याच्या दरांमधील ही वाढ काही प्रथमच झालेली नाही. गेली अनेक वर्षे अधूनमधून अशा प्रकारची परिस्थिती नानाविध कारणांनी निर्माण होत असते आणि त्यातून ग्राहकांची होरपळ होत राहते. मागील संयुक्त पुरोगामी आघाडी ... Read More »

राज्यपालांचे निर्णय आणि वाद

ऍड. प्रदीप उमप महाराष्ट्रातील सत्तानाट्य संपले असले, तरी गेल्या महिनाभरातील घटनाक्रम नेहमी चर्चेत राहील. विशेषतः राज्यपालांच्या भूमिकेवर घेण्यात आलेले आक्षेप आणि राष्ट्रपती राजवटीसंबंधी घटनात्मक तरतुदींचा ऊहापोह कायम होत राहील. आपल्या देशात राज्यपालांच्या भूमिकेवर असे आक्षेप अनेक राज्यांमध्ये, अनेकवेळा घेण्यात आले आहेत. न्यायालयानेही बरेच निर्णय घटनाबाह्य ठरविले आहेत. तरीही वारंवार अशा घटना घडतच आहेत, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात मोठ्या सत्तानाट्यानंतर सरकार ... Read More »

डिसेंबर २०२० पर्यंत नवा जुवारी पूल वाहतुकीस खुला करणार ः पाऊसकर

नव्या जुवारी पुलाचे ५० टक्के काम पूर्ण झालेले असून उर्वरित ५० टक्के काम नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी काल या प्रतिनिधीला सांगितले. डिसेंबर २०२० पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पुलाच्या खांबांवर कमानी बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहितीही पाऊसकर यांनी दिली. नोव्हेंबर २०२० पर्यंत ... Read More »

खाणबंदी ः फेरविचार याचिकेवर दोन आठवड्यात सुनावणी शक्य

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात खाण बंदी निवाड्याच्या विरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका पुढील दोन आठवड्यात सुनावणीला येण्याची शक्यता खाण खात्यातील सूत्रांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारची याचिका सुनावणीला आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका दाखल करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या खाण बंदीच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने १८ महिन्यानंतर पुनर्विचार याचिका गेल्या १९ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. खाण बंदीच्या निर्णयामुळे ... Read More »

विश्‍वजितांच्या प्रमाणपत्राची गरज नाही ः शिवसेना

शिवसेनेला अशा कोणत्याही राजकारण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही. जे स्वतः गोव्यातील राजकारणाचा दर्जा खालावायला कारणीभूत ठरले आहेत, असे प्रत्युत्तर शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी मंत्री विश्वजीत राणे यांनी शिवसेनेच्या दर्जाबद्दल केलेल्या टीकेला काल दिले. आपल्या विधानांनी राणे यांनी स्वतःचे अज्ञान पाजळल्याची टीका त्यांनी केली. गोव्यातील राजकारण्यांनी केलेल्या गलिच्छ राजकीय खेळीमुळेच पूर्ण देशात गोव्यातील राजकारण बदनाम झालेले असून गोव्याच्या राजकीय ... Read More »

ओल्ड गोवा ः सेंट फ्रान्सिस झेवियरचे वार्षिक फेस्त काल उत्साहात साजरे झाले. यानिमित्त चर्च परिसरात उसळलेली भाविकांची गर्दी. Read More »

एसपीजी सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मिळाली मंजुरी

>> सूडाच्या राजकारणाचा आरोप शहांनी फेटाळला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तथा एसपीजी कायद्यात सुधारणा करणार्‍या विधेयकाला राज्यसभेत काल मंजुरी मिळाली. एसपीजी हा पंतप्रधानांची सुरक्षा सांभाळणारा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आहे. या सुधारणा विधेयकाद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सूड भावनेचे राजकारण करीत आहेत हा विरोधकांचा आरोप काल शहा यांनी संसदेत फेटाळून लावला. गांधी कुटुंबाची एसपीजी सुरक्षा मागे घेण्यात आल्याच्या विषयावरून सध्या सत्ताधारी विरोधी ... Read More »

गांधी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा

गांधी कुटुंबाला आता झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. एसपीजी हे पंतप्रधानांची सुरक्षा पाहणारी अत्युच्च दल आहे. त्यात ३००० सुरक्षा अधिकारी आहेत. एसपीजी कायद्यातील नव्या सुधारणेनुसार आता एसपीजीकडे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची १९९१ साली हत्या झाली तेव्हापासून गांधी कुटुंबाला एसपीजीची सुरक्षा सेवा देण्यात आली होती. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ... Read More »

आरोग्य खात्याच्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची संपाची नोटीस

>> आरोग्य मंत्र्यांचा बडतर्फीचा इशारा आरोग्य खात्यामधील चतुर्थ श्रेणी (एमटीएस) कर्मचार्‍यांनी तीन दिवसांच्या संपाची नोटीस दिल्याने आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी या संपाच्या पार्श्‍वभूमीवर एस्मा लागू करून संपात सहभागी होणार्‍या कर्मचार्‍यांना कामावरून बडतर्फ करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, गोवा मजदूर संघाचे अध्यक्ष पुती गावकर यांनी आरोग्य मंत्री राणे यांच्या एस्मा लागू करण्याच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. आरोग्य खात्यातील बांबोळी येथील ... Read More »

पक्ष सोडणार नाही ः पंकजा मुंडे

भाजप नेत्या तथा महाराष्ट्राच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपला पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे काल स्पष्ट केले. मुंडे यांच्या फेसबुक पोस्ट आणि फेसबुक पेजवरून भाजपचे नाव व चिन्ह गायब झाल्यामुळे त्या भाजपचा त्याग करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. मात्र आता त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला असून भाजप सोडणार नसल्याचे म्हटले आहे. आपण भाजप ... Read More »