Daily Archives: December 3, 2019

सुगी संपली

देशातील आघाडीच्या मोबाईल सेवा पुरवठादारांपैकी वोडाफोन – आयडिया आणि भारती – एअरटेल यांचे मोबाईल कॉल व इंटरनेट दर आजपासून तब्बल पन्नास टक्क्यांनी वाढणार आहेत. तिसरी सेवापुरवठादार रिलायन्स जिओ देखील येत्या सहा डिसेंबरपासून नवे चढे दर लागू करणार असून तेही सध्यापेक्षा चाळीस टक्क्यांनी महागडे असतील. बीएसएनएनल तर गाशा गुंडाळण्याच्या मार्गावर आहे. दूरसंचार क्षेत्रातील हे सगळे चित्र पाहिले तर मोबाईल कॉल आणि ... Read More »

हवेतील प्रदूषणाचे अदृश्य संकट

देवेश कु. कडकडे (डिचोली) आपल्या देशातील नेते अशा विषयांवर जास्त चर्चा करून आपला किंमती वेळ वाया घालवतात, ज्याचा देशवासियांच्या सुरक्षित जीवनाशी काहीही संबंध नाही. वास्तविक हा एक गंभीर मुद्दा आहे. यावर हल्लीच संसदेत चर्चा झाली. मात्र त्यात सहभागी होण्यात अनेक सर्वपक्षीय खासदारांनी टाळले. यातच त्यांना याबद्दल किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. जमीन, हवा आणि पाणी या तीन घटकांवर सजीव ... Read More »

गोव्यात नव्या विरोधी आघाडीची शक्यता धूसर

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलीकडेच मुंबईत भेट घेतल्यानंतर राऊत यांनी गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणेच नव्या विरोधी आघाडीचे जाहीर सुतोवाच केले असले तरी गोव्यात अशी आघाडी होण्याची शक्यता धूसर असल्याची चर्चा सुरू आहे. गोव्यात गोवा फॉरवर्ड, कॉंग्रेस, मगोप व अपक्ष मिळून महाराष्ट्राच्या धर्तीवर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी स्थापन करण्याचे व त्यानंतर राजकीय भूकंप ... Read More »

पुन्हा मंत्रिपद मिळविण्यासाठी सरदेसाई यांचा खटाटोप : कॉंग्रेस

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणून गेलेले मंत्रिपद पुन्हा एकदा मिळविण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला. आमदार सरदेसाई यांच्याकडून शिवसेनेशी समविचारी पक्षाची आघाडी करण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे. सरदेसाई यांच्याकडून केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना टार्गेट केले जात आहे. ... Read More »

जानेवारीपासून प्लॅस्टिक बंदीची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी : काब्राल

>> गोवा प्लॅस्टिकमुक्त राज्य जाहीर करणार राज्यात प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी १ जानेवारी २०२० पासून टप्प्या टप्प्याने केली जाणार असून प्लॅस्टिक बंदीच्या कार्यवाहीसाठी नियमावली डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. राज्यात प्लॅस्टिक उत्पादन आणि वापराला बंदी करणार्‍या गोवा नॉन बायोडिग्रेडेबल कचरा (नियंत्रण) दुरुस्ती विधेयकाला गोवा विधानसभेत पावसाळी अधिवेशनात मंजुरी देण्यात आली. गोवा ... Read More »

फलोत्पादन महामंडळाला भेडसावते आर्थिक समस्या : प्रवीण झांट्ये

>> माल खरेदीनंतर पैसे देण्यात अडचण गोवा फलोत्पादन महामंडळ राज्यातील कांद्याच्या वाढलेल्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी परराज्यातील तीन मोठ्या कांदा व्यापार्‍यांकडून कांदा खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु या व्यावसायिकांनी कांद्याचा पुरवठा केल्यानंतर त्वरित रक्कम देण्याची अट घातलेली आहे. गोवा फलोत्पादन मंडळाला आर्थिक समस्या भेडसावत असल्याने कांदा खरेदीनंतर त्वरित पैसे देऊ शकत नाही. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून ... Read More »

३० लाखांचे दागिने चोरणार्‍यास शिताफिने अटक

मिरामार पणजी येथील गास्पर डायस सभागृहातील लग्नाच्या स्वागत सोहळ्याच्या सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेले संशयित मुख्य आरोपीचे छायाचित्र, मध्य प्रदेश पोलिसांकडून संशयिताबाबत मिळालेली अचूक माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पकडण्यासाठी केलेल्या साहाय्यामुळे ३० लाखांचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या टोळीतील प्रमुख संशयित आरोपी सावन सिसोदिया (मध्यप्रदेश) याला गुजरात येथे पकडण्यात पणजी पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. संशयित आरोपी सावन याने चोरीची कबुली दिली असून ... Read More »

आझाद मैदानावर चारशे जीवरक्षकांचे लाक्षणिक उपोषण

गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असलेल्या सुमारे चारशे जीवरक्षकांनी काल येथील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण करून सरकारी सेवेत सामावून घेण्याची मागणी केली. सरकारी यंत्रणेकडून जीवरक्षकांच्या संपाची दाखल घेतली जात नसल्याने येत्या ५ डिसेंबरला सकाळी १० वा. मडगाव येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. राज्यातील समुद्र किनार्‍यांवर जीवरक्षकांची संख्या अपुरी असल्याने पर्यटक बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोवा सरकारने दृष्टी या कंपनीशी ... Read More »

पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या वाटेवर ?

अलीकडेच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या व शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे काल (सोमवारी) पंकजा मुंडेंनी आपल्या ट्विटर अकौंटवरून भाजपचे नाव तसेच आपल्या आजवरच्या राजकीय प्रवासाच्या तपशीलाची माहिती काढून टाकल्यामुळे या अनुषंगाने संकेत मिळाले आहेत. दरम्यान पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या वृत्ताचे भाजपकडून खंडन करण्यात ... Read More »

अंडर-१९ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ घोषित

>> नेतृत्व प्रियम गर्गकडे पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेत रंगणार्‍या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी युवा टीम इंडियाची घोषणा काल बीसीसीआयने केली. संघाचे नेतृत्व प्रियम गर्ग याच्याकडे सोपविण्यात आले असून उपकर्णधारपदी धूरा ध्रुव चंद जुरेल याची निवड करण्यात आली आहे. अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा नवीन वर्षाच्या प्रारंभी १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान रंगणार आहे. स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार ... Read More »