Monthly Archives: December 2019

आर्थिक तंगी

राज्याची आर्थिक स्थिती हळूहळू अधिकाधिक चिंताजनक बनू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत. गेले वर्षभर दरमहा कर्ज काढून सरकारचे गाडे हाकले जात असले तरी केंद्र सरकारकडून कटोरा भरला गेला नाही तर सरकारची वाटचाल दिवाळखोरीच्या दिशेने होणार नाही ना अशी शंका जनतेच्या मनाला ग्रासू लागली आहे आणि ती अनाठायी नाही. राज्य सरकारच्या महसुलाचा हुकमी स्त्रोत असलेला खाण व्यवसायही पुन्हा सुरू होऊ शकलेला ... Read More »

सावरकरांच्या बदनामीमागील सत्य

देवेश कु. कडकडे (डिचोली) सावरकरांनी लिहिले ते अगदी निर्भीडपणे आणि सडेतोड. कोण दुखावेल म्हणून हटले नाहीत किंवा कोणाला बरे वाटेल म्हणून वस्तुनिष्ठ लिखाणाकडे तडजोड केली नाही. त्यांनी आपल्या जीवनात स्वातंत्र्यनिष्ठा, हिंदुत्त्वनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा अशा तीन निष्ठा जोपासल्या. त्यांच्या साहित्यातून तत्त्वज्ञ सावरकर, कलावंत सावरकर आणि प्रबोधनकर्ते सावरकर अशी तीन व्यक्तिमत्त्वे अभिव्यक्त झाली आहेत. कॉंग्रेस पक्षाचे पदमुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली ... Read More »

सनबर्न महोत्सवात तिसर्‍या पर्यटकाचा मृत्यू

गोवा पोलिसांनी वागातोर येथील सनबर्न क्लासिकचा ईडीएम संगीत महोत्सव अमली पदार्थ मुक्त असल्याची घोषणा २९ डिसेंबरला २०१९ रोजी केल्यानंतर या संगीत महोत्सवात आणखी एका युवकाच्या संशयास्पद मृत्यूने गोवा पुन्हा एकदा हादरला आहे. या संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी दोघांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. संगीत महोत्सवात आणखी एका युवकाच्या मृत्यूचे वृत्त ३० डिसेंबरला पसरताच राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या संगीत ... Read More »

२२ लाखांचे अमली पदार्थ मडगाव रेल स्थानकावर जप्त

येथील अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) मडगाव रेल्वे स्थानकावर छापा घालून एका विदेशी नागरिकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून २२.४० लाखांचे अमली पदार्थ रविवारी रात्री जप्त केले. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, आंतोनियो मानुएल फारिया रामोस (४२ वर्षे) असे अटक केलेल्या पोर्तुगीज नागरिकाचे नाव आहे. त्याच्याकडून २४० ग्रॅम चरस, १०१ ग्रॅम एमडीएमए आणि ११० ग्रॅम कोकेन असे अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहेत. एएनसीने ... Read More »

नौदल परिसरात फेसबुक स्मार्ट फोन वापरावर बंदी

नौदलाचे सात कर्मचारी पाकिस्तानी गुप्तचरांना नौदलाविषयी संवेदनशील माहिती पुरवित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता नौदलाने आपल्या कर्मचार्‍यांवर नौदल परिसरात फेसबुक वापरण्यास बंदी घातली आहे. नौदल तळांवर, डॉक यार्ड व युद्धनौकांवर स्मार्ट फोन वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. ‘हनी ट्रॅप’ मध्ये अडकलेल्या सात नौदल कर्मचार्‍यांना भारतीय नौदलातील संवेदनशील माहिती सोशल मिडियावरून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना देताना पकडण्यात आले होते. त्यानंतर भारतीय नौदलाने हे ... Read More »

नवीन साखर कारखाना ः व्यवहार्यता सल्लागाराच्या नियुक्तीसाठी लवकरच निविदा

राज्यात नवीन साखर कारखान्याची व्यवहार्यता आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराच्या नियुक्तीसाठी येत्या आठ दिवसांत निविदा जारी केली जाणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. संजीवनी सहकारी साखर कारखान्याची यंत्रणा जुनाट झाल्याने यावर्षी गळीत हंगामाला कारखाना सुरू करण्यात आलेला नाही. शेतकर्‍यांचा ऊस खानापूर येथील एका साखर कारखान्यात पाठविण्यात येत आहे. आत्तापर्यंत ६ हजार ३५० मेट्रिक ... Read More »

उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाचा विस्तार

>> ३२ दिवसांनंतर ३६ मंत्र्यांचा शपथविधी ः अजितदादा उपमुख्यमंत्री अखेर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या विस्तारीत मंत्रिमंडळाचा शपथविधी काल विधीमंडळ परिसरात पार पडला. सरकार स्थापनेच्या ३२ दिवसांनंतर ३६ मंत्र्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांच्यासह अजित पवार, अशोक चव्हाण या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ३६ मधील २६ कॅबिनेट मंत्री असून १० जण राज्यमंत्री आहेत. दरम्यान, ... Read More »

दिल्लीतील ५३० विमान उड्डाणे पडली लांबणीवर

>> अत्यंत दाट धुक्याचा परिणाम कडाक्याच्या थंडीबरोबरच काल दिल्लीत अत्यंत दाट धुके कायम राहिल्याने दिल्ली विमानतळावरील तब्बल ५३० विमान उड्डाणे लांबणीवर पडली, ४० रद्द झाली व २१ उड्डाणे अन्य मार्गे वळविण्यात आली. इंडिगो एअरलाईन कंपनीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दिल्लीतील तसेच उत्तर भारतातील या खराब हवामानामुळे इंडिगोच्या विमान उड्डाणांवर मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर इंडिगोने आपल्या प्रवाशांना ... Read More »

रित्विज परबला बुद्धिबळाचे विजेतेपद

देसाई प्रतिष्ठानच्या सहाव्या लक्ष्मीकांत देसाई स्मृती अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रित्विज परब याने पटकावले. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने मंगेशी येथील वागळे हायस्कूलच्या सभागृहात या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रशांत जे. याने दुसरे तर सौरव खेर्डेकर याने तिसरे स्थान मिळविले. अभिषेक गिरी, दिमित्री बेझस्त्राखोव, नीलेश भंडारी, आयुष पेडणेकर, पार्थ ... Read More »

तनिशाला मिश्र दुहेरीचे सुवर्ण

गोव्याच्या तनिशा क्रास्टोने ४४व्या कनिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात छत्तीसगडच्या ईशान भटनागरच्या साथीने खेळताना सुवर्णपदकाची कमाई केली. १९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात त्यांनी अव्वल मानांकित नवनीत बोक्का व साहिती बंदी यांचा ३४ मिनिटांत २१-१८, २१-१३ असा पराभव केला. आंध्र प्रदेशमधील राजामुंद्री येथे ही स्पर्धा पार पडली. कनिष्ठ महिलांच्या दुहेरीत मात्र तनिशा व तिची उत्तराखंडची जोडीदार अदिती भट्ट ... Read More »