Daily Archives: November 30, 2019

विरोधकांची एकजूट

महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि गोव्यातील विरोधकांच्या सत्ताकांक्षेला नवे अंकुर फुटू लागल्याचे दिसू लागले आहे. विशेषतः कॉंग्रेसपेक्षाही गोवा फॉरवर्ड यात आघाडीवर आहे. मुख्यमंत्र्यांनी सत्तेमधून अलगद हकालपट्टी केल्यापासून दुखावलेले विजय सरदेसाई राजकीय सूड उगवण्याच्या संधीच्या शोधात आहेत. गोवा फॉरवर्डचे तिन्ही आमदार विजय सरदेसाईंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ... Read More »

हिंद महासागरातील सागरी वर्चस्वाची महत्त्वाकांक्षा

कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) हिंद महासागरावर आणि त्यामधील आर्थिक उलाढालींवर आपले वर्चस्व असावे ही भारताची पारंपरिक महत्वाकांक्षा आहे आणि त्यात वावगे काहीच नाही. आपले सामरिक ध्येय प्राप्त करण्यासाठी भारताने आपल्या नौदलाला सामरिकदृष्ट्‌या सक्षम करण्याचा चंग बांधला आहे. यासाठी भारत केवळ आपले नौदलच सुदृढ करतो आहे असे नाही, तर भोवतालच्या देशांशी आपले आर्थिक व सामरिक संबंध बळकट करणे ही त्याची प्राथमिकता ... Read More »

विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करणार

>> विजय सरदेसाई-संजय राऊत चर्चा गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री व गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी शुक्रवारी सकाळी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन गोव्यात विरोधी पक्षांची एक आघाडी स्थापन करण्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, गोवा फॉरवर्ड व मगो पक्ष अशा पाच विरोधी पक्षांना एकत्र आणून गोव्यात एक आघाडी करणे शक्य असल्याबद्दल यावेळी वरील ... Read More »

सीझेडएमपीला ३१ मेपर्यंत अंतिम स्वरूप द्या ः लवाद

राष्ट्रीय हरित लवादाने केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला गोवा किनारी विभाग व्यवस्थापन आराखड्याला (सीझेडएमपी) ३१ मे २०२० पर्यत अंतिम स्वरूप देऊन अधिसूचित करण्याचा आदेश दिला आहे. गोवा सरकारने किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा तयार केलेला नाही. लवादाने गेल्या १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत सीझेडएमपी आराखडा तयार करण्याचा आदेश दिला होता. या काळात सीझेडएमपी आराखडा तयार करण्यात यश प्राप्त झाले नाही. ... Read More »

जीवरक्षकांचे आंदोलन २ पासून अधिक तीव्र करणार ः केरकर

>> प्रत्येक मतदारसंघात आंदोलनाचा इशारा राज्यात गेली दोन महिन्यापासून संपावर असलेल्या जीवरक्षकांच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यास सरकारी यंत्रणा चालढकल करीत असल्याने संपावरील जीवरक्षकांचे आंदोलन येत्या २ डिसेंबर २०१९ पासून तीव्र केले जाणार आहे, असा इशारा गोवा जीवरक्षक कामगार संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिला. जीवरक्षकांच्या आंदोलनाच्या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याला सरकारी यंत्रणा जबाबदार राहणार आहे. समुद्रात ... Read More »

कांद्याचे दर खाली न आणल्यास महिला कॉंग्रेस रस्त्यावर ः कुतिन्हो

कांद्याचे दर गोव्यात १२० रु. प्रती किलो असे भडकलेले असून गरिबांच्या डोळ्यांत या कांद्याने अश्रू आणलेले आहेत. मात्र, प्रमोद सावंत यांचे सरकार मात्र गरिबांना कोणताही दिलासा देण्याचा प्रयत्न करताना दिसत नसल्याचा आरोप काल महिला कॉंग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना केला. तसेच भाजप सरकारने हे दर खाली येत्या ७ दिवसांत खाली न आणल्यास महिला कॉंग्रेस या ... Read More »

उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारला

शुक्रवारी मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. काल शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले. तत्पूर्वी, त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. मंत्रालयातील महिलांनी औक्षण केल्यानंतर उद्धव यांनी पदभार स्वीकारला. Read More »

डेल्टीन कारावेला कॅसिनो वेरेला स्थलांतरित करण्याचा आदेश

>> मांडवीतील तीन जहाजे वेरेला नेणार मांडवी नदीतील डेल्टीन कारावेला हे कॅसिनो जहाज वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. मांडवीतील सहा कॅसिनो जहाजांपैकी तीन कॅसिनो जहाजे पणजी आणि तीन कॅसिनो जहाजे वेरेच्या बाजूने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी काल दिली. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मांडवी नदीतील कॅसिनो ... Read More »

२-० आघाडीसह भारताची दमदार सुरुवात

>> डेव्हिस कप : एकेरीचे पहिले दोन्ही सामने जिंकले रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल यांनी एकेरीचे दोन्ही सामने जिंकत कझाकस्तानच्या नूर-सुल्तान येथे तटस्थ ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या पाकिस्तानविरुद्ध बहुचर्चित डेव्हिस चषक स्पर्धेतील लढतीत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारत आतापर्यंत डेव्हिस चषकात अपराजित राहिलेला आहे. एकेरीतील दोन्ही सामने एकतर्फी राहिले. पहिल्या एकेरीत रामकुमार रामनाथनने १७ वर्षीय प्रतिस्पर्धी पाकी खेळाडू मोहम्मद ... Read More »

ऑस्ट्रेलियाचे पहिल्या दिवशी वर्चस्व; १ बाद ३०२ धावा

>> वॉर्नरचे नाबाद दीडशतक; लबुशेनचे शतक डावखुरा विस्फोटक फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे तडफदार नाबाद दीडशतक आणि मार्नस लबुशेनच्या नाबाद शानदार शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ओव्हल मैदानावर सुरु झालेल्या पाकिस्ताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर ७३ षट्‌कांच्या खेळात १ गडी गमावत ३०२ अशी अशी धावसंख्या उभारली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या सुरुवात खराब झाली. सलामीवीर ... Read More »