Daily Archives: November 29, 2019

अभिनव प्रयोग

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक नवा अनोखा अध्याय काल मुंबईत शिवतीर्थावर लिहिला गेला. सत्तेपासून दूर राहून प्रसंगी केवळ रिमोट कंट्रोल ठेवण्याची ठाकरे घराण्याची परंपरा मोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तेही समविचारी भाजपच्या बळावर नव्हे, तर विरोधी विचारांच्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठबळावर. मागल्या दाराने सत्तास्थापन करण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न हाणून पाडून केवळ भाजपला दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेल्या ... Read More »

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ चा तपोभूमीवर उद्घोष!

शंभू भाऊ बांदेकर शबरीमलासारख्या वादामध्ये स्त्रियांच्या देवदर्शनावर बंधने आणली जात असताना दुसरीकडे कुंडईच्या तपोभूमीमध्ये महिला पुरोहितांकरवी तुलसीविवाह सोहळा अगत्यपूर्वक पार पाडला जात असतो. स्त्री पुरुष समतेचे हे अनोखे उदाहरण स्पृहणीय ठरावे.. श्री दत्त पद्नाम पीठ, गोवा तथा ‘जय मॉं मिशन’ पंजाब यांच्या सहआयोजनाने नुकताच गोमंतकातील गुरुपीठ क्षेत्र तपोभूमी, कुंडई येथे श्री दत्त पद्नाभ पीठाचे पीठाधीश्‍वर सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या अधिष्ठानाखाली ‘यत्र ... Read More »

फ्रान्स-स्वित्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ला सुवर्ण मयुर

>> ‘जल्लीकडू’ला रौप्य मयुर, सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा शानदार समारोप पुढील वर्ष हे जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे २०२० सालचा इफ्फी हा त्यांना समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी काल इफ्फीच्या समारोप सोहळ्यात सांगितले. सत्यजीत रे हे  एक महान चित्रपट दिग्दर्शक होते असे सांगून ५१ वा इफ्फी हा ... Read More »

म्हादईप्रश्‍नी गोवा फॉरवर्डने घेतली राज्यपालांची भेट

राज्यपाल सत्यपाल मलिक यांची गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगावकर, उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी भेट घेऊन राज्यातील म्हादई आणि सरकारच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करून या दोन्ही प्रश्‍नात लक्ष घालण्याची मागणी काल केली. राज्यपालांना म्हादईच्या सद्यःस्थितीची सविस्तर माहिती दिली. सरकारकडून म्हादई प्रश्‍नाबाबत लोकांची दिशाभूल चालविली आहे. गोवा फॉरवर्डने राष्ट्रीय हरित लवादाकडे म्हादईप्रश्‍नी ... Read More »

कॉंग्रेसचे म्हादई जागोर आंदोलन यशस्वी ः डिमेलो

केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासमोर गोव्यातील जनतेच्या म्हादई नदीबाबतची तीव्र भावना मांडण्यासाठी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यात कॉंग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांना निदर्शने करावी लागली. कॉंग्रेसचे म्हादई जागोर आंदोलन यशस्वी झाल्याने केंद्रीय मंत्री जावडेकर यांना इफ्फीच्या समारोप सोहळ्यापासून दूर राहावे लागले, असा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेत काल केला. कॉंग्रेसचा इफ्फीच्या कार्यक्रमात अडथळा आणण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे केंद्रीय मंत्री जावडेकर हे ... Read More »

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री

>> शिवतीर्थावर रंगला शपथविधी सोहळा शिवाजी पार्क मुंबई येथील शिवतीर्थावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. हजारो लोकांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, कपिल सिब्बल, मल्लिकार्जुन खर्गे, अभिषेक मनु सिंघवी, मध्यप्रदेशचे ... Read More »

ओदिशाने चेन्नईनला गोलबरोबरीत रोखले

अरीडेन सँटानाने अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर ओदिशा एफसीने चेन्नईन एफसीला २-२ असे गोलबरोबरीत रोखत हिरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहाव्या मोसमात काल गुण विभागून घेतले. चारही गोल उत्तरार्धात झाले. त्यात ओदिशाने दोन वेळा पिछाडीवरून बरोबरी साधत एक गुण खेचून आणला. चेन्नईनकडून लिथुआनियाच्या नेरीयूस वॅल्सकीसने दोन्ही गोल केले, तर ओदिशाचे गोल झिस्को हर्नांडेझ आणि अरीडेन सँटाना यांनी केले. जॉन ग्रेगरी ... Read More »

अफगाणिस्तान पराभवाच्या छायेत

शामार्ह ब्रूक्सने आपल्या कारकिर्दीत नोंदविलेले पहिले शतक आणि ऑफस्पिनर रहकीम कॉर्नवेलने दोन दिवसात मिळविलेल्या १० बळींच्या जोरावर भारत दौर्‍यावर असलेल्या वेस्ट इंडीज संघ अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी जिंकण्याच्या उंरबठ्यावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानची दुसर्‍या डावात ७ बाद १०९ अशी स्थिती झाली असून दुसर्‍या दिवस अखेरपर्यंत त्यांना केवळ नाममात्र १९ धावांची आघाडी मिळालेली आहे. अफगाणिस्ताने आपल्या पहिल्या डावात सर्व गडी गमावत १८७ धावा ... Read More »